१९८२ साली दिल्ली मध्ये झालेल्या ९व्या एशियन गेम्स च प्रक्षेपण हे भारतातील पहिलं रंगीत प्रक्षेपण ठरलं.१९८५ सालापासून दूरदर्शन खासगी लोकांच्या जाहिराती स्वीकारण्यापासून पूर्णतः व्यावसायिक बनायला सुरुवात झाली.
मेक्सिकन "सोप ऑपेरा" या संकल्पनेवर बनलेली "हमलोग" हि पहिली कोलगेट आणि नेस्ले प्रस्तुत सिरिअल ठरली आणि या मेक्सिकन सोप संकल्पनेमुळे मालिकांना "डेली सोप" म्हणायला सुरुवात झाली ती आजही कायम आहे.
१९८७ साली दूरदर्शन वर प्रदर्शित झालेली "रामायण" हि मालिका भारतीय टेलिव्हिजन सृष्टीतील पहिली हिट मालिका ठरली,आजही हि मालिका लोकांच्या मनात घर करून आहे.१९९० साल येईपर्यंत भारतामध्ये साधारणतः ३४५० पेक्षा जास्त केबल टीव्ही networks होते जे प्रामुख्याने मुंबई,दिल्ली, कोलकता,चेन्नई या ४ विभागात विखुरले गेले होते.
१९९१ साली केबल नेटवर्क सॅटेलाईट शी जोडलं गेल्यामुळे CNN,BBC,Star Tv या सारख्या चॅनल च भारतात प्रक्षेपण सुरु झालं,आणि याच वर्षी भारतातील लोकांना या चॅनेल्स च्या माध्यमातून "पर्शियन गल्फ वॉर" च थेट प्रक्षेपण बघता आलं.
१९९२ साली भारतातील पहिल्या खासगी हिंदी चॅनेल ची म्हणजेच "झी टीव्ही" ची सुरुवात झाली.
१९९३ साली १०बॉम्बस्फोटाच्या शृंखलेमूळे मुंबई अक्षरश: हादरून गेली,या स्फोटांमध्ये ३१७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.याच वर्षी म्हणजे १९९३ साली संजय दत्त याना बेकायदेशीरपणे AK-५६ रायफल बाळगल्यामूळे "TADA ACT" या कायद्याखाली अटक करण्यात आली आणि यातून बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड मधले एक एक संबंध उघड व्हायला सुरुवात झाली.१९९३ साली रिलिज झालेल्या सुभाष घाई दिग्दर्शित "खलनायक" चित्रपटमधल्या "चोली कि पीछे" या गाण्यातील बोलांमुळे वादंग निर्माण झाला,या चित्रपटात संजय दत्त यांची प्रमुख भूमिका होती.
१९९४ साली जुरासिक पार्क हा हॉलिवूड चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला आणि त्यावेळी त्याने १२ कोटींच्यावर कमाई केली,हि आत्तापर्यंत डब चित्रपटाने केलेली सगळ्यात मोठी कमाई होती ,त्याच वर्षी अनेक हॉलिवूड चित्रपटांनी चित्रपट हिंदी मध्ये डब करून रिलिज केले पण त्या कोणालाच जुरासिक पार्क एवढी कमाई नाही करता आली.
१९९४ साली प्रदर्शित झालेला "हम आपके है कौन" हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या आत्तापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला ,या चित्रपटाने 67 कोटींची कमाई केली. याच वर्षी म्हणजे १९९४ साली शेखर कपूर दिग्दर्शित "बँडीट क्वीन" या चित्रपटावर सेन्सॉर नि बंदी घातली.
🎥© मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment