सामान्यतः मराठी माणसांच्या असणाऱ्या श्रीमंतीच्या व्याख्या या साधारणतः मोठं घर ,आलिशान गाड्या ,झालंच तर घरामध्ये एखादा स्विमिंग पूल,वगैरे वगैरे. नेमकं हेच चित्र राजवाडे अँड सन्स मध्ये आपल्याला पहायला मिळतं.
Saturday, 28 October 2017
राजवाडे अँड सन्स
सामान्यतः मराठी माणसांच्या असणाऱ्या श्रीमंतीच्या व्याख्या या साधारणतः मोठं घर ,आलिशान गाड्या ,झालंच तर घरामध्ये एखादा स्विमिंग पूल,वगैरे वगैरे. नेमकं हेच चित्र राजवाडे अँड सन्स मध्ये आपल्याला पहायला मिळतं.
Sunday, 22 October 2017
कथा :- शेवटची एसटी
"प्रत्येक महिन्यातील साधारणतः चौदा किंवा पंधरा तारीख म्हणजे माझ्यासाठी जणू सुवर्ण दिवस असतो,तुझ्यासाठी तो कसा दिवस असतो हे मला ठाऊक नाही,पण मी तो दिवस अगदी भरभरून जगतो.इतका भरभरून जगतो कि त्या दिवशीच्या आठवणी मला पुढचा महिनाभर पुरतात.तुझं मला भेटण्यासाठी मुंबई सेन्ट्रल वर येणं असो किंवा आपली तिथे होणारी अगदी छोटीशी भेट असो.आपल्यात फारसं बोलणं हि होत नाही,पण आपला एकमेकांचा सहवास माझ्यासाठी इतका महत्वाचा आहे की त्याशिवाय आता मला चैनच नाही पडत.खरंतर आज पर्यंत आपल्या नात्याला नाव असं कोणत्याच प्रकारचं नाही आणि त्याची आपल्याला कधीही गरज पण वाटली नाही पण आता मात्र मला आपल्या या नात्याला काहीतरी नाव देण्याची गरज वाटतेय,अन हे शब्दात व्यक्त करणं माझ्यासाठी कठीण आहे,म्हणून या छोट्याश्या पत्रातून व्यक्त होतोय".
.........
पत्र लिहून झाल्यावर त्याची घडी घालत त्याने घड्याळाकडे नजर टाकली ,रात्रीचे 8.30 वाजून गेले होते ,ते पाहून तो खाडकन भानावर आला आणि त्याने आवराआवर करायला सुरुवात केली.आवराआवर आणि जेवण वगरे सोपस्कार आटपून झाल्यानंतर त्याने एका छोट्याश्या पिशवीत थोडं सामान बांधायला घेतलं,सामान भरून होत असतानाच त्याची आई त्याच्या खोलीत आली आणि त्याला उद्या दिवस खाण्यासाठी डबा बांधून दिला.हा बांधलेला डबा आणि सामानात ठेवल्यानंतर त्याने परत एकदा घड्याळाकडे नजर टाकली,त्यावेळी त्याला जाणवलं की आपल्याला आता उशोर होत आलाय आणि आपण लवकर स्टॅन्ड वर नाही पोहोचलो तर आपली शेवटची एसटी सुद्धा निघून जाईल.मग त्याने तडक समानासाहित सायकल भराभर हापसत हापसत स्टॅन्ड गाठलं आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे बस तिथे उभी होतीच ,त्यामी शेजारी एका ओळखीच्या घरात सायकल लावून तडक बसच्या दिशेने प्रयाण केलं, बस मध्ये चढल्यानंतर ,त्यानी एका खिडकीशेजारी बसणं पसंत केलं.कंडक्टर काढून एक मुंबई सेन्ट्रल च तिकिट काढलं आणि एक हाताचा कोपरा जरासा मुडवून खिडकीत ठेवून गाडी चालू झाल्यावर येणारं गर वार्याचा मनमुराद आनंद घेत असताना त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही आणि तो स्वप्नात रममाण होत होत मुंबई सेन्ट्रल येण्याची वाट बघत बघत झोपी गेला.
तो स्वप्नात इतका रममाण झाला होता की त्याला थेट पहाटे मुंबई सेन्ट्रल आल्यावरच जाग आली,७ तासाच्या प्रवासामुळे नाही म्हणलं तरी अंग अवघडल्यासारखं झालं होतं,पण त्याला पर्याय नव्हता त्यामुळे त्यानी थोडावेळ मुंबई सेन्ट्रल वर बसून जरा अंग मोकळं करायचा प्रयत्न केला. बसल्याबसल्या थोडीशी झोप झाल्यानंतर त्याने तिथल्याच स्वच्छतागृहात आवरून मुंबई सेन्ट्रल च्या समोरच असलेल्या नायर हॉस्पिटल कडे प्रस्थान केलं, तिथे कराव्या लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करून त्याच तिथे असलेलं काम चालू केलं.त्याच काम पूर्ण व्हायला जवळपास दुपार उलटून गेली त्याला जाम भूक लागुन गेली होती पण बरोबर आणलेल्या डब्यापैकी त्याने निम्मा डबा त्याने सकाळी नाश्त्यालाच फस्त केला होता,उरलेला डबा अत्ता त्याने खाल्ला खरा पण त्याची भूक भागली नव्हती. पण बाहेरच त्याला खायची सोय नव्हती कारण बाहेरच खाण्याचा त्याला त्रास होई.अश्यातच अर्धवट भुकेत तो पुन्हा मुंबई सेन्ट्रल वर येऊन थांबला कारण आता तिच्या येण्याची वेळ जवळपास होत आली होती.
तिची वेळ व्हायच्या ५ मिनिटं आधीच ती तिथे आली, आल्यावर तिला लांबून पाहून दोन मिनिटं याला इतकं समाधान वाटलं,आणि तिला पण काहीतरी वाटलं,इतकं कि पुढची अनेक मिनिटं हे दोघे एकमेकांकडे फक्त बघत होते,ना बोलत होते ना काही हालचाल करत होते,थोड्यावेळानंतर मात्र मागे आलेल्या बसमुळे त्यांच्या या तपश्चर्येत भंग झाला आणि ते दोघेही भानावर आले.त्यानंतर त्याने तिला "चल जायचं का?" असा प्रश्न विचारला आणि तिनेही होकारार्थी मान डोलावून त्याला संमती दिली,आणि परस्परांची समंती मिळाल्यानंतर ते दोघे तडक रेल्वे स्टेशन कडे रवाना झाले आणि नंतर तिथून लोकल नि चर्चगेट ला रवाना झाले.चर्चगेट ला पोचल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिथून मरीन ड्राईव्ह गाठणं पसंद केलं आणि तिथे चालत चाल फिरत असताना गार वारा अनुभवत गप्पा मारू लागले,गप्पा मारत असताना एका ठिकाणी बसले असताना त्यानी तिला भूक लागल्याची खूण केली,तोच तिने तिच्या ऑफिस साठी नेलेल्या डब्यातल्या तिने मुद्दाम याच्यासाठी ठेवलेले पोळीचे रोल याला खायला दिले,ते रोल जास्त नव्हते पण त्यामागच्या प्रेमामुळे त्याच पोट भरलं. नंतर खूप वेळ गप्पा मारत आणि गर वारं अनुभवत ते तिथेच बसत राहिले आणि त्याने परत घड्याळात वेळ बघितली आणि ते तिथून उठून चर्चगेट आणि नंतर तिथून पुन्हा मुंबई सेन्ट्रल कडे मार्गस्थ झाले,या सागक्या प्रवासादरम्यान दोघांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान आणि सुख दिसत होतं जणू काय ते दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत ,असे हावभाव दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि मुंबई सेन्ट्रल ला पोचल्यावर ,अखेर त्याला खरतर दोघांनाही नको असलेला तो निरोपाचा क्षण आला ,पण काय करणार निरोप घेणं अपरिहार्य होतं, मग तिने निघते म्हणल्यावर याला चटकन आठवलं कि याने चिट्ठी लिहिली आहे ,त्याने तडक खिशात ठेवलेली चिट्ठी काढली आणि तिला दिली ,पण ही चिट्ठी नंतर वाचायचीस असं वचन तिच्याकडून घेतलं आणि तेवढ्यात त्याची त्याच्या गावी जाणारी शेवटची एसटी लागली आणि तो त्यात बसून पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाला त्या शेवटच्या एसटी ने....
(समाप्त)
©मिहीर कुलकर्णी
Friday, 20 October 2017
कथा :- फोटो अल्बम
"बाबा,माझी रॅकेट कुठे ठेवलीय ?? सापडत नाहीये" नीरज बाबांना हाका मारू लागला. बाबा त्यांचं काम चालू असतानाच तिथून
Sunday, 1 October 2017
बापजन्म - Film Review
आठवणींचे उसासे
खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...
-
या कथेसाठी पटकथेच्या पद्धतीचा वापर केला आहे तरी प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात... .............................................................
-
रात्रीची वेळ ,११ वाजत आलेत घड्याळाचा सेकंद काटा "टिक" "टिक" असा आवाज करतोय,शांतता इतकी आहे की हा टिक टिक आवाज...


