"कटप्पा ने बाहुबली ला का मारलं?" या संपूर्ण जगाला पडलेल्या प्रश्नाच उत्तर देणारा बाहुबली २ हा चित्रपट आज प्रदर्शित होतोय.पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर आणि शेवटच्या प्रसंगामुळे दुसऱ्या भागाची उत्सुकता खूप प्रमाणत ताणली गेली होती आणि त्या ताणलेल्या उत्सुकतेचा फलित आज चित्रपटगृहात होणाऱ्या गर्दीतून स्पष्टपणे दिसतंय देखील.चित्रपटाची कथा बऱ्यापैकी प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते पण मध्ये मध्ये काही प्रसंग खरतर घेतले नसते तरी चाललं असतं असं राहून राहून वाटतं.पहिल्या भागाप्रमाणे मात्र या भागातली गाणी विशेष मनात घर रहाण्यासारखी नाहीत. एक दोन गाणी नसती तरी चाललं असत असच सारखं वाटत राहतं, पण तरी चित्रपट बघताना तो लोकांना बोर होऊ नये याची मात्र पूर्णपणे काळजी राजमौली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलीय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. काही काही दृश्यातून आपल्याला चित्रपटात पुढे काय घडेल या घटनांचा अंदाज बांधता येतो ,पण हा मुद्दा तितकासा महत्वाचा ठरत नाही.
चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स ,चित्रपटाचा एकूणच भव्यदिव्य पणा डोळ्यांच पारणं फेडतो आणि ती सारी दृश्य मनात घर करून आपण चित्रपटगृहाबाहेर पडतो.बाकी कलाकारांचा अभिनय ,एडिटिंग वगरे गोष्टी फक्कड जमल्यात असं म्हणायला हरकत नाही.ज्या गोष्टी आपल्याला करायला जमत नाहीत किंवा स्वप्नात किंवा पुस्तकात आपण वाचलेल्या असतात अश्या गोष्टी आपल्याला बाहुबली ७० mm च्या पडद्यावर दाखवतो आणि आपल्याला त्याच्या या दुनियेत रमायला आणि आपसूक टाळ्या आणि शिट्ट्या मारायला भाग पाडतो.आणि प्रेक्षागृहातून बाहेर पडताना आपल्या चेहऱ्यावर असतो तो म्हणजे आपण चित्रपट बघितल्याचा निखळ आनंद ...
©मिहीर कुलकर्णी