Sunday, 10 February 2019

लघुकथा - Promise Day

आंटी जी आंटी जी गेट अप अन डान्स sssss

        जसं गाणं संपलं तसं त्यांनी बाथरूम मधल्या स्पीकर चा व्हॉल्युम थोडासा कमी केला होता, आणि नंतर प्ले झालेल्या सुंदर अश्या रोमँटिक गाण्याच्या धुंदीत त्याने बाथरूम मधला आरसा टॉवेल ने पुसून त्याच्या सिल्की केसांवर हॅट फिरवून न्याहाळू लागला होता ,एव्हाना त्याची अंघोळ झाली होती आणि तो बाथरूम मधून बाहेर येऊन ड्रेसिंग टेबल पाशी पुढचे सगळे सोपस्कार आवरण्यात व्यस्त झाला.

        बॅचलर लाईफ आणि त्यात कपडे धुण्याचा कंटाळा यामुळे त्याच्या आवडीचे सगळे शर्ट मळके आणि धुण्याच्या प्रतीक्षेत पडलेले होते, त्यामुळे त्याने कपाटातून नवीन शर्ट काढत असताना त्याला तिथे एक चिट्ठी सापडली ,ही कसली चिट्ठी म्हणून त्याने ती घडी केलेली चिट्ठी उघडली आणि पहिले काही वाक्य वाचायचं अवकाश की तो ताडकन भूतकाळात फेकला गेला , आणि सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आठवू लागला.

         तिची भेट , प्रेमात पडणं त्यासाठी अनेक गोष्टींचा आटापिटा करणं आणि मग प्रेमात पडल्यावरचे गुलाबी क्षण भरभरून जगणं सगळं त्याच्या काही क्षणांत त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं . तिचा त्याच्या आयुष्यातलमधलं तेव्हा असलेलं महत्व हे सारं काही आठवून नकळत स्मित ही त्याच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. पण जसा त्याला भूतकाळात जायला वेळ लागला नाही तसाच वेळ त्याला वर्तमानकाळात यायला देखील लागला नाही.अगदी क्षणार्धात तो भानावर आला.

         त्याला सापडलेल्या त्या पत्रात शेवटी एक वाक्य लिहिलं होतं , "काहीही झालं ,तरी मी तुला सोडून जाणार नाही प्रॉमिस"  हे वाक्य त्याने वाचलं आणि मात्र त्याला हसू फुटलं, "प्रॉमिस म्हणे" असं म्हणून त्याने ती चिट्ठी टेबलाखाली असलेल्या dustbin मध्ये फेकली आणि दरवाजाच्या मागे अडकवलेल्या हुक मधून गाडीची किल्ली काढून गाडीला किक मारून त्याच्या कामासाठी रवाना झाला...

(समाप्त)

#Promise_Day

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...