रात्रीची वेळ ,११ वाजत आलेत घड्याळाचा सेकंद काटा "टिक" "टिक" असा आवाज करतोय,शांतता इतकी आहे की हा टिक टिक आवाज बिनदिक्कतपणे कोणालाही ऐकू जाईल,अश्यातच १० वाजून ५९ मिनिटं झाल्यानंतर जेव्हा हि टिक टिक पुन्हा सुरु होते आणि जेव्हा सेकंद काटा बरोबर १२ वर येऊन ठेपतो तत्क्षणी मोबाईल ब्लीन्क होऊन व्हायब्रेट होतो,आणि शेजारी बसलेल्या अनिश चटकन मोबाईल बघण्यासाठी डेस्कजवळ जातो.रात्रीचे ११ वाजलेत म्हणल्यावर तो मेसेज कुणाचा असणार हे त्याला पक्क ठाऊक होतं,आणि गेल्या एका महिन्यापासून हा त्याचा दिनक्रमच झाला होता.त्याने फोन चेक केला तर तिथे 'स्नेहा' चा "Hi , आहेस का?"
असा मेसेज आला होता,आणि हा मेसेज बघून तो सुखावला आणि त्याने लगेच "हो,हो आहे बोल" असा मेसेज केला.बस त्यानंतर नॉर्मल बोलणी सुरू झाली "आज दिवसभर काय काय केलं,काही स्पेशल वगरे केलं का" हे असे दररोजचे ठरलेले प्रश्न आणि त्यांची दररोजची माहिती असलेली उत्तरं, एकमेकांना विचारण्यात आणि देण्यात आली.
एका महिन्यानंतर आताशा त्या दोघांच्या बोलण्यात काहीसा मोकळेपणा आला होता,तरी अजून त्यांनी एकमेकांना ,कोणात Interested आहेत का असा विचारलं नव्हतं ,कारण पुढाकार कोण घेणार अन कस विचारायचं हा यक्षप्रश्न हि होताच.पण त्याचं बोलणं जर कोणी तिऱ्हाईताने वाचलं असत तर ते वाचून कोणीही सांगितलं असत कि ते दोघे एकमेकांत intrested आहेत,अन का कोण जाणे त्यांनाही हे कळलं असावं.पण व्हाट्सअप्प गृप वर झालेली ओळख असो किंवा एका महिन्यातील हे सगळं बोलणं पण एक गोष्ट होती त्यामुळे कदाचित हे दोघे माघार घेत असावेत,ती म्हणजे हे दोघे अजून एकमेकांना एकदाच भेटले होते आणि ती भेट म्हणजे ग्रुपच्या घोळक्यात अशी होती तरी या दोघांनी एकमेकांना त्या वेळी मनात साठवलं होतं,आणि हे जेव्हा अनिश ने त्याच्या एका मित्राला सांगितलं तेव्हा त्याने "अरे मग भेट कि एकदा,जा डेट वर तिला घेऊन ?" असं फर्मान सोडलं.पण आता तिला विचारायचं तरी कसं ? आणि ती नाही म्हणाली तर? वगरे अश्या बऱ्याच प्रश्नांनी अनिश च मन गच्च भरलं होतं, पण काय होईल ते होईल असं म्हणून त्याने विचारायचं ठरवलं,आणि थोड्यावेळाने त्यानी तिला विचारलं "अग उद्या मी गावात येणारे? तुला वेळ आहे का? असेल तर सांग आपण इतके दिवस नुसतं बोललोय,निवांत भेटलो असतो" या प्रश्नावर दोन मिनिटं काहीच रिप्लाय आला नाही.हे बघून मात्र अनिश ला आपण माती खाल्ली असं वाटलं,पण स्नेहा ला हि हेच काहीसं हवं होतं, त्यामुळे तिने याची छोटीशी परीक्षा पाहावी म्हणून रिप्लाय केला नव्हता,याने मात्र काही रिप्लाय नाही म्हणल्यावर "सॉरी ,मी असं डायरेक्ट विचारलं" हे पाहून मात्र तिने हसण्याच्या स्मायलीज पाठवल्या ,आणि "अरे भेटूयात,मी गंमत बघत होते तुझी,म्हणून रिप्लाय नाही केला ,उद्या तू ये गावात तिथे कॅफे मध्ये भेटूयात आपण,मी सकाळी तुला कुठे भेटायचं त्याचा पत्ता मेसेज करते" असा मेसेज पाठवला . आता मात्र अनिश चा आनंद गगनात मावेना, तो उद्याच्या भेटण्याची तीव्रतेने वाट बघत होता,आणि त्याने उद्या आपण विचारून टाकूया असं मनाशी पक्क केलं.
उद्या ठरलेल्या कॅफे च्या बाहेर तो वेळेच्या आधी येऊन थांबला,आणि वेळ होताच ती आली,दोघांनाही काहीसं गांगरल्यासारखं झालं,पण नंतर दोघे काहीसे comfortable झाले,आणि कॉफी चा आस्वाद घेत दोघे गप्पा मारू लागले,एव्हाना नजरेतून दोघेही एकमेकांना हिंट्स देऊ लागले होते,आणि तेवढ्यात शेजारी चालू असलेल्या रेडिओ वर गाणं चालू झालं आणि त्याचे बोल अशे होते
"कॉफी आहे एक बहाणा
नुसते अबोल राहू
बोलायचं ते बोलू आधी
पुढचं पुढे मग पाहू
नुसते अबोल राहू
बोलायचं ते बोलू आधी
पुढचं पुढे मग पाहू
बोला तुम्हीही भिता कशाला
उगाच टेन्शन घेता कशाला
मनी जे आहे सांगा स्वतःला
How it's awesome"
उगाच टेन्शन घेता कशाला
मनी जे आहे सांगा स्वतःला
How it's awesome"
हे बोल एकूण स्नेहा म्हणाली ,"किती बोलकं आहे ना हे गाणं" यावर काय समजायचं ते समजून अनिश ने स्मितहास्य केलं आणि दोघे पुन्हा कॉफी चा आस्वाद घेत घेत गप्पा मारू लागले.
©मिहीर कुलकर्णी
©मिहीर कुलकर्णी

Hir lihit raha...
ReplyDeleteYeah
DeleteCoffee ahe ek Bahana......
ReplyDelete