Saturday, 31 December 2016

फ्रेंडशिप सिझन ४

भाग १:-
          
          खरं तर फ्लर्टींग चा टॉपिक संपला असं वाटत असला तरी इतक्या सहजा सहजी संपणार नाही ह्याची मला खात्री होती म्हणून मी नकळत का होईना त्याचा दररोज अंदाज घेऊ लागलो एव्हाना आमची म्हणावी तशी घट्ट मैत्री झाली होती त्यामुळे तसा मी थोडासा निर्धास्त असलो तरी मला थोडी का होईना धाकधूक होतीच. पण मी तूर्तास त्या कडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आणि इतर गोष्टींवर रात्री रात्री जागवत गप्पा मारणं सुरूच ठेवलं. आता मला इच्छा होती ते तिला भेटायची तसही आमची भेट एकाच कॉलेज मध्ये असून डिपार्टमेंट वेगवेगळे असल्यामुळे तशी अभावानेच होत असे आणि जेव्हा केव्हा भेटू त्यावेळी सतत कोण ना कोण हे असेच त्यामुळे आम्हा दोघांची भेट वगरे कधीच झाली नाही आता मला ही तिला भेटायची इच्छा होत होती पण विचारणार कसं? हा प्रश्न भेडसावत होता पण ठरवलं की आज रात्री जेव्हा ती ऑनलाइन येईल त्यावेळी तिला हा प्रश्न विचारायचा आणि कसा विचारायचा ह्या विचारात दिवस निघूनही गेला. दिवसभरात कधी घरी सुद्धा सांगितली नसतील एवढी कारण शोधून काढली कि जेणेकरून ती भेटायला नको म्हणणार नाही आणि कसं विचारायचं ह्याची थोडीशी प्रॅक्टिस पण केली आणि संध्याकाळी नेहमीच्या वेळी आमच्या कट्ट्यावर गेलो असताना सुद्धा माझ्या मनात सतत हाच प्रश्न घोळत होता.
          रात्री नेहमीच्या वेळेला म्हणजे साधारणतः 11 च्या पुढे नेहमीप्रमाणे चॅटिंग सुरु झालं आणि नेहमीच्या पायंड्याप्रमाणे नेहमीचे प्रश्न त्यांची ठरलेली उत्तरं हे सगळं झाल्यानंतर मला समजत नव्हतं कि आता भेटायचा विषय कसा काढावा ह्याचाच मी विचार करत होतो आणि ते पुन्हा म्हणतात ना किसी चीझ को सच्चे दिल से चाहो वगरे वगरे ते कधी कधी फिल्म्स च्या व्यतिरिक्त पण work करत किंवा आपल्या मनाला तरी तस वाटतं.अगदी तसेच झालं मला विषय काढायची गरजच पडली नाही कारण तो दिवस होता 31 डिसेंबर चा आणि त्यामुळे तू आज काय काय केलं ?वगरे असं तिने मला विचारलं त्यावर मी ,"काहीच स्पेशल नाही ,अत्ता गरमागरम कॉफी पितोय" असं म्हणालो आणि तू काय केलं आज स्पेशल असा प्रतिप्रश्न केला त्यावर तिनेही , " आज मी पिझ्झा खाल्ला" असं उत्तर दिलं , त्यावर मी "घरी केला की बाहेरून मागवला? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर "घरीच केला ते हि पॅन वर" असं उत्तर तिच्याकडून आलं आणि मी हळूच "मग मला बोलावलं नाहीस खायला एकटी एकटीच खा तू!" असं म्हणालो त्यावर ती "तुला बोलवायची गरज आहे का? ये कि तू" असं आश्वासक उत्तर देऊ केलं . ह्यामुळे माझ्या मनात कमालीचा उत्साह निर्माण झाला होता आणि त्या उत्साहाच्या भरातच मी म्हणालो "मग कधी देणार मला पिझ्झा खायला ?मला खायचाय पिझ्झा तुझ्या हातचा " असा प्रतिप्रश्न केला त्यावर "तू सांग कधी देऊ ? " असं उत्तर तिच्याकडून आलं" "पुढच्यावेळी भेटलो कि येताना नक्की करून आण " असं मी म्हणालो. "आणते पण आता आपली भेट कधी होईल काय माहिती?" हे असं बोलून तिने भेटीची हिंटच दिली जणू म्हणून मी म्हणालो "भेट काय ती तर उद्या पण होईल ,बोल भेटायचं का?" "ह्यावर भेटूया कि पण मला जास्ती वेळ माही मिळणार कारण घरी काहीतरी वेगळं कारण सांगून यायला लागेल आणि त्यामुळे जास्ती वेळ नाही थांबता येणार आणि कोणाला तरी बोलवायचं का?" असा प्रश्न तिने विचारला मग त्यावर मी आपल्या कॉमन फ्रेंड्स ना बोलवू असं नुसतं म्हणलं खरतर मी कोणालाच बोलावणार नव्हतो आणि ऐनवेळेस काहीतरी कारण सांगून वेळ मारून न्यायची असं ठरवलं आणि तस आमच्या कॉमन फ्रेंड्स ना पण सांगून ठेवलं. तिचा भेटीसाठी होकार आल्यावर आता मला उत्सुकता लागली होती ती तिच्या भेटीची तिने उद्या सकाळी आपण ठिकाण आणि व्हरल याबद्दल सविस्तर बोलू असं सांगून आम्ही दोघेही झोपून गेलो पण मनात उत्सुकता कायम होतीच ती भेटीची.....

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

Tuesday, 20 December 2016

"BC" एक कलाप्रकार

हल्ली सोशल मीडिया वर वापरला जाणाऱ्या अनेक प्रचलित शब्दांपैकी दोन प्रमुख शब्द म्हणजे "Yz" आणि "BC" ह्यातल्या "Yz" ह्या शब्दच माहात्म्य आपण चित्रपट रुपात पाहिलंच. Yz हि एक आर्ट आहे वगरे वगरे वगरे ...
त्याचप्रमाणे "BC" हि सुद्धा एक आर्ट आहे अनेक लोकांची मानसिकता आहे  असं म्हणूया! आता हे कसं हे जाणून घेण्यासाठी आधी आपण "BC" ह्या कला प्रकारातल्या types बद्दल जाणून घेऊ ...

(1)ढासू :-
         ह्या कॅटेगरी मधले लोक फक्त ग्रुप ला ऍड होतात त्यांना फेमस होण्यासाठी वेगळं काही करावं लागतं नाहीत तर स्वतःच्या चॅटिंग च्या शैलीने लोकांची मनं जिंकून घेतात..

(2)वासू :-
          ह्या कॅटेगरी मधले लोक फक्त मुली असलेल्या गृप मध्ये ऍड होण्यास इच्छुक असतात किंवा ग्रुप मध्ये कोणती मुलगी अजून ऍड होत नाही तोवर किंवा तिने ग्रुप वर कितीदा जरी इन्ट्रो दिला असेल तरी हे इन्ट्रो चा बहाणा करून pc वर मेसेज करतात.

(३)बसू:-
         ह्या कॅटेगरी मधल्या लोकांना बाकी कोणत्याही गोष्टीत रस असो अगर नसो बसण्याचा विषय आला की हे लोक ग्रुप वर हजर...

(४)सासू :-
         ह्या कॅटेगरी च्या लोकांना दुसऱ्यांवर उगीच दादागिरी करायची हौस असते जे जे गोष्टी गृप वर करू नका असे हे दुसर्यांना सांगतात त्या त्या गोष्टी हेच लोक दुसऱ्या गृप वर करत असतात.

(५)हसू:-
          ह्या कॅटेगरी च्या लोकांना ग्रुप मेंबर्स ना हासवण्यात रस असतो आणि त्या गोष्टीत ते बऱ्यापैकी यशस्वी पण होतात. एखादा टुकार जोक सुद्धा हे अश्या पद्धतीने पेश करतात की लोक त्यावर हसतात.

(६)गप्प बसू :-
         ह्या कॅटेगरी चे लोक ग्रुप मध्ये तर ऍड होतात पण त्यांना ग्रुप वरचे मेसेज वाचण्याखेरीज दुसऱ्या कष्ट रस नसतो. ते फक्त मेझेज वाचतात पण कधीच गृप वर बोलत नाहीत .

(७)जिज्ञासू:-
         ह्या कॅटेगरी मधल्या लोकांना गृप मध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत गॉसिप करायची सवय असते त्याबद्दल ते सतत उत्सुक असतात.

टीप:- सदरील प्रकार निरीक्षणातून नोंदवले गेलेले आहेत त्यामुळे ते वास्तव्यात आढळून येऊ शकतात त्यामुळे योगायोग वगरे काही नाही ह्याची नोंद घ्यावी

#मिहीर कुलकर्णी

फ्रेंडशिप सिझन 3 Flirtationship


भाग ५ :-

            संध्याकाळी माझ्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच थोडक्यात कट्ट्यावर जाऊन मित्रमंडळींसोबत चहा आणि गरम चा प्रोग्रॅम आटपून झाल्यानंतर मी नेहमीच्या वेळी घरी येऊन आणि जेवण करू तिच्या मेसेज ची वाट बघत होतो. खरंतर मला दुपारीच हा विषय बोलायचा होता पण दुपारी तिलाही निवांत वेळ नव्हता आणि मला होता पण मला दाखवायचा नव्हता म्हणून रात्रीच ह्या विषयावर बोलणं मला इष्ट वाटलं. रात्री थोडावेळ tv बघितल्यानंतर मी आमच्या नेहमीच्या वेळेस म्हणजे साधारण 11 नंतर तिच्या मेसेज ची वाट बघू लागलो.
           नेहमीच्या वेळेला ठरल्याप्रमाणे तिचा मेसेज आला पण मी ठरवलं की आल्या आल्या डायरेक्ट तोच विषय सुरु करायला नको म्हणून मी सुरुवातीला तिला आज दिवसभर काय काय केलं ?कॉलेज मध्ये काय काय झालं वगरे असे जनरल प्रश्न विचारले आणि तिनेही मला जनरल प्रश्न विचारले आणि मग मी किंचितपणे त्या विषयाला सुरुवात केली. मी तिला हळूच विचारलं "कि आग तो नवीन ऍड झालेला मुलगा त्याचा काही तुला मेसेज वगरे आला नाही ना? किंवा बोलतेस का त्याच्याशी वगरे ?" हे असं विचारण्यामागे मला jealousy वगरे नाही हं ,केवळ मैत्रिखातर विचारतोय " असही पुणेरी स्टेटमेंट मी त्यावर केलं. त्यावर तिने मला सांगितलं की "हो त्याचा ऍड झालेल्या दिवशीच मला मेसेज आला होता आणि मी पहिल्यांदा बोलत नव्हते पण तो खूपच मेसेज करू लागला म्हणून बोलले तर जरा बरा वाटला आणि म्हणून थोडंफार त्याच्याशी चॅट केलं , का रे चांगला नाहीये का तो मुलगा? असा प्रतिप्रश्न तिने केला. आता ह्यावर मी काय बोलायचं हा प्रतिप्रश्न मला पडला मग मी म्हणालो कि हो त्याच्याविषयी अनेक गोष्टी कानावर आल्या माझ्या म्हणूनच तुला बोललो" ह्यावर ती म्हणाली "कोणत्या गोष्टी?", "काही नाही हेच फ्लर्टींग वगरे", "फ्लर्टींग काय ते तर तू पण करतोसच कि" असं ती मिश्किल पणे म्हणाली लगेच मी स्वतःला सावरून घेण्यासाठी "मी कुठे करतो फ्लर्टींग?" असा प्रतिप्रश्न केला आणि मग ह्यासार थोडी मजामस्ती झाल्यानंतर पुन्हा मी गाडी हळूच त्या विषयाकडे वळवली आणि तिला indirect असं सांगितलं की "तो मुलगा तुला प्रोपोज वगरे करेल फक्त जरा सांभाळून राहा" त्यावर ती हो म्हणाली आणि त्या दिवशीच आमचं चॅटिंग अन तो विषय संपला.
           काही दिवसांनंतर तिचा मला एके दिवशी रात्री अचानक मेसेज आला आणि ती म्हणाली ,"कि अरे तू बोललास तसेच झालं ,त्या मुलानी सरळ मला प्रपोजच केलं" ह्यावर मी थोडा दचकून म्हणालो "मग तू काय म्हणालीस?", ह्यावर ती म्हणाली "मी काय म्हणणार ,मी नाहीच म्हणाले तर तो म्हणाला की त्याची कोणतरी बेस्ट फ्रेंड आहे तिच्या तू एकदा बोल आणि मगच होकार किंवा नकार दे". हे ऐकल्यानंतर मला थोडासा धक्का बसल्यासारखं झालं कारण मी विचार केला त्यापेक्षा मला चित्र वेगळं दिसत होतं म्हणून मी तिला विचारलं ," कि मग तू बोललीस का तिच्याशी?" त्यावर ती म्हणाली ,"हो बोलले आणि तिला स्पष्टपणे सांगून टाकलं कि मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आणि एकदाचा  विषय संपवून टाकला" हे ऐकल्यावर माझा जीव भांड्यात पडला आणि मग थोडा निर्धास्त झालो आणि तिपण म्हणाली की "मी त्याला ब्लॉक करून टाकलंय आणि आता मी त्याच्याशी बोलणार पण नाही" आणि अश्या तर्हेने सांगता झाली ती माझ्या लाईफ मधल्या Flirtationship चॅप्टर ची ....

(समाप्त)

©मिहीर कुलकर्णी

Sunday, 18 December 2016

फ्रेंडship सिझन 3 Flirtationship


भाग ४ :-

           दुसऱ्या दिवशी दुपार होत आलेली तरी तिचा एकही मेसेज न आल्यामुळे मला मी काल रात्री काही जास्ती तर बोललो नाही ना असं वाटू लागलं म्हणून मी पुन्हा पुन्हा आमचे चॅट्स वाचत होतो , एरवी चॅट्स वाचणं हा एक सुखद प्रकार असतो चॅट्स वाचत असताना किंचित गालातल्या गालात हसणं असेल किंवा आपण कधीकधी किती बालिश बोलतो ह्याची जाणीव जुने चॅट्स करून देतात पण त्या त्या वेळी ते सगळं चालतच आणि त्याची मजा काही औरच असते पण आता मला मी विचारलेल्या प्रश्नामुळे ती नाराज झाली की काय असं वाटू लागलं होतं आणि म्हणून मी तीच लास्ट सिन चेक केलं तर ते 9.30 am दाखवत होत म्हणजे तिचा मोबाईल चालू आहे नाहीतर मागच्या वेळेसारखा काही मोबाईल प्रॉब्लेम नाही झाला ह्याची खात्री झाली. मग तरी आज मेसेज कसा नाही एरवी तर मी करायच्या आधी मेसेज येतो आणि आजच कसा नाही ह्या प्रश्नाने मला हैराण करून सोडलं होत आणि मग आता करावं तरी काय ? हा विचार सुरू झाला आणि मग मी ठोठावला ते आमच्या एल कॉमन फ्रेंड च दार मी तिला मेसेज केला आणि मला खात्री होती की तिच्यासोबत कॉलेज मध्ये असणारच त्यामुळे ती सांगू शकेल. असं म्हणून मी कॉमन फ्रेंड ला मेसेज केला त्यावर तिच्याकडून असं समजलं की ती आज वेळेवर कॉलेज ला आली होती आणि तिच्या वागण्याबोलण्यावरून काही प्रॉब्लेम झाला असावा असं दिसतं नाहीये असं म्हणून तिने मला विचारलं की ,"काय रे, काही झालंय का?" मी म्हणलं "कुठे काय? काहीच नाही झालं. सहजच चौकशी केली" असे म्हणून मी वेळ मारून नेली. काही प्रॉब्लेम तर झालेला नाही मग तरी का मेसेज नाही पुन्हा हा प्रश्न सतावू लागला मग तिला घरी काहीतरी काम आलं असेल आणि त्यामुळे मेसेज केला असं समजून मी मनाची समजूत घातली आणि मेसेजची वाट बघू लागलो..
            तसा दिवसातला बराच काळ तिच्याशी चॅट करण्यात जात असल्यामुळे नेहमी दिवस पटकन संपत असे आणि आज तिचा मेसेज न आल्यामुळे मला खूप बोर होत होत आणि टाईमपास करायला काहीच नव्हतं म्हणून मी लॅपटॉप चालू केला आणि त्यावर कॉफी आणि बरच काही सिनेमा लावला. खरंतर मला हा चित्रपट आधी माहितीही नव्हता पण नंतर तिने सांगितल्यावर मी पहिला आणि मला इतका आवडला कि त्यानंतर मी तो जेमतेम 10-15 वेळा पाहिला असेल. थोडा वेळ सिनेमा चालू असताना मोबाईल vibrate झाला म्हणून मी चेक केला तर तिचा मेसेज आला होता आणि अश्या अर्थाने हा चित्रपट पुन्हा एकदा मला लकी ठरला असं म्हणायला हरकत नाही.
           मेसेज आल्यावर मी विचारलं की सकाळपासून कुठे गायब होतीस?त्यावर ती म्हणाली की तिचे आईबाबा गावाला गेलेत त्यामुळे तिला घरातली काम होती. हे ऐकून माझा जीव अक्षरश भांड्यात पडला कारण माझ्या कालच्या बोलण्यामुळे ती गेली नव्हतं हे ऐकून मला बरं वाटलं आणि मग मी ठरवलं की अत्ता तसही तिला घरची काम असतील त्यामुळे अत्ता तो विषय काढणं इष्ट नाही म्हणून मी ठरवलं की रात्री निवांत असताना ह्या संबंधी तिच्याशी निवांत पणे चर्चा करावी असा म्हणून थोडावेळ चॅट केल्यानंतर ती ऑफलाईन गेली आणि मग माझ्या मनात असलेली हुरहूर हि तिच्याशी स्पष्टपणे बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्याशिवाय संपणारी नव्हती त्यामुळे आता मला प्रतीक्षा होती ती म्हणजे रात्री तिचा मेसेज कधी एकदा येतो....

(क्रमश:)
©मिहीर कुलकर्णी

फ्रेंडship सिझन 3 Flirtationship


भाग ३ :-

           मी आपणहून काही विचारायचं नाही असं ठरवलं होतं पण माझं मन काही केल्या मला स्वस्थ बसू देत नव्हतं पण तरी कसाबसा मी कंट्रोल करत होतो. चॅटिंग करत असताना अनेकदा अशी वेळ आली की ज्यावेळी हे पटकन माझ्या तोंडून निघालं असतं पण ऐनवेळेस काही ना काही करून मी वेळ मारून नेली. पण हे सगळं झालं तरी मनातली अस्वस्थता काही केल्या कमी येत नव्हती आणि त्यातूनच नाही नाही ते विचार उत्पन्न होत होते आणि हे सगळं कुणाला सांगण्याची सोय पण नव्हती कारण कुणाला सांगायला गेलं तर त्यांचा पहिला प्रश्न हाच असे की , " खरंच तुमचं काही चालू आहे का?," "चालू असेल तर आम्ही मदत करू अन्यथा मदत तरी कशी करणार?" ह्या प्रश्नाला द्यायला माझ्याकडे समर्पक असं उत्तरच नव्हतं म्हणून कोणाला काही सांगणं हे मला सोईस्कर वाटत नव्हतं आणि एवढं असूनही कोणाला सांगितलं आणि तिला कळलं की मी कोणाला तरी सांगितलंय तर पुन्हा ती रागावण्याची अथवा संबंध तोडायची भीती म्हणून हा विचार मी सर्वस्वी बाजूला ठेवला.
           असच एकदा चॅट करताना रात्रीचे 1.30 वगरे वाजले असतील तेव्हा तिचे रिप्लाय लेट येत होते आणि मग मी सहज चेक केलं की तिने मला ती ज्यांच्याशी बोलते हे सांगितलं होतं ते सगळे केव्हाच ऑफलाईन गेले होते आणि रात्री 1.30 हि ना तिची अभ्यासाची वेळ होती ना वेळेला कोणाकडे घरी काम असतं, मग नक्की हि कोणाशी बोलते इतका वेळ? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि आता मात्र माझा संयम सुटायला लागला मी पूर्णतः कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतो पण तरी मला दिवसेंदिवस ते अवघड होत चाललं होतं..
           मग शेवटी असह्य झाल्यामुळे मी त्या दिवशी रात्री 2 च्या सुमारास तिच्या लेट रिप्लाय नि वैतागून तिला " तू कोणाशी बोलतेय का ? तस असेल तर मी झोपतो उगीच तुला डिस्टर्ब नको !" असा खोचक प्रश्न केला. हा प्रश्न केल्यानंतर मला योग्य उत्तराची अपेक्षा होती पण तिने कोणाशी नाही असं उत्तर दिलं पण मला शंका येत होती आणि आत्ताच ती योग्य वेळ आहे असं मला वाटलं म्हणून मी तडक विचारलं " तू त्या काही दिवसांपूर्वी ऍड झालेल्या (त्या)मुलाशी बोलतेय ना?" हे ऐकून ती थोडी निरुत्तर झाल्यासारखी झाली आणि नकळत तिच्या कडून नकळत रिप्लाय आला " की तुला कसं कळलं?" हे उत्तर ऐकून तर मला माझा राग आवरेना पण मी म्हणलं उगीच रागावून बोलण्यात काही अर्थ नाही आता ती बोलतेच आहे तर तिच्याकडून अजून काही माहिती मिळते का बघू असं म्हणून मी रागावलेला असताना सुद्धा रागावलेलो नाही असा आव आणून बोलायला सुरुवात केली दरम्यान कदाचित तिच्या फोन ची बॅटरी संपत आल्यामुळे ती म्हणाली कि मी अत्ता झोपते माझ्या फोन ची बॅटरी कोणत्याही क्षणी संपेल आणि फोन स्वीच ऑफ होईल असं म्हणून ती ऑफलाईन गेली पण ते अनेक प्रश्न निर्माण करून......

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

फ्रेंडशिप सिझन 3 Flirtationship


भाग २:-

           माझ्यातला डिटेक्टिव्ह उफाळून आल्यावर मी पुन्हा सुरु केली ती शोधाशोध,खरतर ह्या शोधामागे माझ्या मनात असलेली थोडीशी जेलसी कारणीभूत होती किंवा माझा क्षमतेवर नसलेला विश्वास पण हा विचार अत्ता करण्याची गरज नव्हती म्हणून मी शोधाशोध सुरु केली. माझ्या शोध मोहिमेतले माझे पहिले सूत्र म्हणजे आमचे कॉमन फ्रेंड्स पण त्यांना डायरेक्ट विचारायला जावं तर ते पण संशय घेणार किंवा उगीच त्यांच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाले आणि त्यांनी त्यातून मी केलेली ही चौकशी असेल किंवा ह्याधी तिच्या घरच्यांविषयी केलेली चौकशी जर तिला समजली अन तिने बोलणं बंद केलं तर अशी भीती मला सतावू लागली आणि ह्यातूनच मला आठवण झाली ती माझ्या मित्राची जो मला काही माहिती मिळते का हे बघून सांगतो म्हणाला होता . मग खिशातून फोन काढून मी त्याला फोन केला आणि आमच्या नेमहिच्या ठिकाणी नेहमीच्या वेळेला भेटायला बोलावलं. दरम्यान काहीवेळांतर माझ्या असं लक्षात आलं की आपण त्याला आपल्या नेहमीच्या वेळेला बोलावलं आहे खरं पण त्यावेळी तिथे आपले अजून मित्रपण असतील त्यांच्यासमोर नीट बोलता येणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा त्याला फोन लावला आणि आमच्या नेहमीच्या वेळेच्या थोडं आधीच बोलावून घेतलं. मला दुपारभर वेगवेगळ्या शंकांनी आणि प्रश्नांनी हैराण करून सोडलं होत त्यामुळे एरवी शक्यतो उशिरा जाणारा मी आज वेळेच्या खूप आधीच आमच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसलो. थोड्यावेळानंतर मित्र आला तो म्हणाला ,"अरे काय झालं ?आज अचानक वेळेच्या आधी का बोलावलं ? काही झालं तर नाहीये ना?" अश्या अनेक प्रश्नांची सरबत्ती त्याने माझ्यावर केली आणि त्याचे प्रश्न संपल्यानंतर मग मी त्याला विचारलं "अरे मी तुला त्या नवीन ऍड झालेल्या मुलाबद्दल माहिती काढायला सांगितली होती त्याच काय झालं?काही काढली का तू माहिती?". दरम्यान त्याला आणि मला आम्हाला दोघांना चहाची हुक्की आली आणि आम्ही आमच्या कट्ट्याच्या समोरच असलेल्या चहा वाल्या काकांना इशारा करून 2 कटिंग ची ऑर्डर दिली आणि कटिंग आल्यावर खिशातली एक गरम पेटवून चहाचा घोट घेत आणि झुरका मारत आम्ही चर्चा करू लागलो आणि बोलण्या बोलण्यातून त्याच्या नकळत मला समजलं की त्या नव्याने ऍड झालेल्या मुलानी तिला मेसेज केलाय आणि तो तिच्यासोबत फ्लर्ट पण करतो हे ऐकून मला राग आला पण मी जोपर्यंत ती मला ह्याविषयी सांगत नाही तोपर्यंत आपण काही बोलायचं नाही असं ठरवलं आणि परत घरी आलो..

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

Saturday, 17 December 2016

फ्रेंडship सिझन 3 Flirtationship

भाग 1:-

             पुन्हा सुरु झालेलं चॅट तस काहीसं स्थिरस्थावर झालेलं होत आणि दरम्यान आमच्या दोघांची परीक्षा ही आवरली होती त्यामुळे सुट्टी असल्यामुळे आमच्यात तस नेहमीपेक्षा थोडस चॅटिंग वाढलेलं होत. मी पण थोडासा रिलॅक्स झालो होतो आणि माझ्या तिच्यासोबत चॅटिंग हा आता माझा दिनक्रमच झाला होता. असेच मजेत दिवस सरत होते.. पण कायमच सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तशाच घडतील असं नाही त्यामुळे थोडे दिवस गेले की काही ना काही घडणारच हे जणू आता नक्की झालं होतं आणि काही दिवसांनी तसंच काहीसं घडायला सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही..
             त्याच झालं असं की ज्या व्हाट्सअप्प गृप द्वारे आमची ओळख झालेली त्यावर असणारे अनेक जण माझे आधीपासूनच मित्रमैत्रिणी होते पण मध्यंतरी त्यात एक मुलगा ऍड झाला होता पण माझ्या ह्या सगळ्या व्यापात माझं त्या गोष्टीकडे लक्षच नव्हतं आणि मला माझ्या त्या गृप मधल्या एका मित्राकडून असं कळलं की तो नव्याने ऍड झालेला आहे तो फ्लर्टींग वगरे करण्यात खूप पटाईत आहे हे ऐकून मला थोडासा राग आला आणि मी म्हणालो, "मग ऍड कशाला केला त्याला?,आपल्या ह्या गृप मध्ये मुलीपण आहेत आणि ह्यांनी जर काही घोटाळा करून ठेवला तर तो निस्तरणार कोण? त्या **** अडमिंन मध्ये निस्तरण्याचा दम तरी आहे का ? " माझा हा रौद्रवतार बघून माझा मित्र मला समजवण्याच्या सुरत म्हणाला ,"अरे ए,थंड घे रे आणि तू का तापतोय एवढं , काही झालंच तर तो अडमिंन अन तो मुलगा बघून घेतील कि ,तू chill मार" हे ऐकून माझा राग थोडा कमी झाला आणि मी म्हणालो ,"बर अजून पर्यंत त्यांनी कुणाला pc (पर्सनल चॅट) वर मेसेज वगरे केला नाहीये ना?" हे विचारण्या मागचा उद्देश मित्राच्या कदाचित लक्षात आला असावा, पण शेवटी तो पण पुणेरीच त्यांनी पण " केला असेल तर केला असेल तू का एवढं पझेसिव्ह होतोय तुला कोणाला करायचा आहे का?" असा खोचक प्रश्न मला विचारला . मी ह्या प्रश्नावर निरुत्तर झालो कारण मला काय बोलाव सुचेना म्हणून मी त्याला म्हणलं "नाही रे मला करायचा नाही कुणाला ,पण भविष्यात काही वावगं व्हायला नको म्हणून विचारलं?" ह्यावर माझ्या प्रश्नतला मतितार्थ मित्रानी ओळखला असावा आणि तो मला म्हणाला "अजून तरी कोणाला केलेला नसावा पण तरी एकदा मी माझ्या सूत्रांकडून माहिती काढतो आणि तुला सांगतो".हे सूत्र वगरे ऐकून मला किंचितस हसू आलं कारण जसा लोकांच्या आयुष्यावर फिल्म चा प्रभाव असतो तसा हल्ली tv चा हि होऊ लागलाय त्यामुळेच हे असं सूत्र वगरे तोंडून येत असावं... हे बोलून झाल्यानंतर मी माझ्या घरी आलो पण हा विषय काही केल्या माझ्या मनातून जाता जाईना अन अश्या वेळी पुन्हा माझ्या मनातल्या डिटेक्टिव्ह नि मला खुनावायला सुरुवात केली ...

(क्रमश:)

मिहीर कुलकर्णी

Friday, 16 December 2016

फ्रेंडship सिझन 2 पुन्हा नव्याने सुरुवात

फ्लॅशबॅक संपल्यानंतर मी थोडासा भानावर आलो आणि म्हणलं कि आपल्याला एक घर पण आहे आणि तिथे आपले पालक आपली वाट बघत असतील म्हणून मी टेकडीवरून उठलो आणि गाडीला किक मारली आणि ह्या सगळ्या विचारातच घर गाठलं आणि ते हि छोटासा किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात न होता कारण मला माझ्या bike चालवण्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हि काय फिल्म नाही. शेवटी घरी पोचल्यावर जेवण वगरे आवरून माझी रूम गाठली आणि पुन्हा पुन्हा तेच विचार फिरू लागले की जर ती नि हिंट दिली होती तर मग नकार का दिला असेल ? मग अशा वेळी हमखास माणसाच्या आत दडलेला डिटेक्टिव्ह वर उचंबळून येतोच तसा माझाही आला आणि मग बऱ्याच विचारांती मी या निष्कर्षावर आलो की मला नकार देण्यामागे काहीतरी ठोस कारण नक्की आहे ते काय हे कळण्यासाठी आधी मला तिच्या फॅमिली बॅकग्राऊंड आणि तिच्या पास्ट बद्दल थोडीशी माहिती घ्यायला हवी असं मनाशी पक्क ठरवलं आणि हे सगळं करत असताना तिला कुठेही ह्याचा त्रास होणार नाही आणि ह्या सगळ्याचा माझ्या अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही ह्याची मनाशी गाठ बांधली आणि उद्यापासून पुन्हा मोहीम सुरू करायची हे ठरवलं आणि मग सुरु झाला तो शोध ......
नकाराच्या मागच्या कारणांचा ....

           नकारामागची कारण कशी शोधायची ह्याचा विचार करता करता मी ठरवलं की आपल्याला तिच्याबद्दल माहिती गोळा करायला हवी. तशी तिच्या करिअर बद्दल मला माहिती होतीच पण तिच्या घरच्या परिस्तिथीबद्दल मला काहीच माहिती नव्हती, मला वाटलं की त्यात काहीतरी नक्कीच आहे आणि त्यामुळेच तिने नकार दिला असणार.पण आता तिला मी ह्याबद्दल विचारणार तरी कसं ? हा प्रश्न होता. शिवाय ह्या प्रकारापासून माझी तिला मेसेज करायची हिम्मतच होईना पण ते म्हणतात ना "किसी चीझ को सकचे दिल से चाहा तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने कि साझिश मे लग जाती है वगरे" तस हे वरकरणी फिल्मी वाटत असलं तरी हे असंच काहीसं घडत होत आणि तसही एकदा प्रेमात पडल कि पोस्टमन लाईट च बिल घेऊन येताना सुद्धा प्रेमपत्र च घेऊन येत असल्यासारखं भासत. अचानक दोन दिवसांनी तिचा मेसेज आला मेसेज सहजच आला होता पण तो मेसेज मला सुखावणारा नक्कीच होता कारण मला जी भीती होती ती आता नाहीशी झाली होती आणि आमची मैत्री तुटलेली नव्हती मग मी पण जनरल बोलायला लागलो आणि असच पुन्हा बोलणं चालू झालं.
मला अनेकदा मनात विचार आला की तिलाच माहिती विचारावी पण पुन्हा तिला ते आवडलं नाही तर .. हि भीती त्यामुळे योग्य वेळ आल्यावरच विचारायचं असं ठरवलं आणि अशा तर्हेने पुन्हा थांबलेलं चॅटिंग आणि आमच्यातला त्या दिवसानंतर तुटलेला संवाद पुन्हा चालू झाला पण नकारामागची कारण ती तर अजून गुलदस्त्यातच होती मग पुन्हा सुरु झाला त्या कारणांचा शोध......

           सुरु झालेलं चॅटिंग पुन्हा एकदा पाहिल्यासारखं होत होतं पन अजूनही ती वेळ आली नव्हती की मी तिला तिच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल विचारावं आणि तिनेही मला तस काहीसं विचारलं नव्हतं म्हणून मी योग्य वेळेची वाट पाहत होतो. ह्या लेट  नाईट चॅट चा मला एक फायदा झाला होता तो म्हणजे मी झपकन विषय बदलू शकत होतो. असच एकदा चॅट करत असताना साधारण रात्रीचे 2-2.30 वाजले असतील मी ती जरा comfortable आहे हे बघून पटकन विषय आमच्या घरावर आणला आणि  पहिल्यांदा मी थोडीशी माझ्या घरच्यांविषयी माहिती सांगितली तिला पण ते आवडलं असावं म्हणून तिने देखील मला उत्सुकतेपोटी माहिती विचारली आणि मी सांगितली देखील. मग मी पण तिला तिच्या घरच्यांबद्दल विचारलं त्यावर तिचा 5 मिनिटं काहीच रिप्लाय आला नाही ते बघून मला माझाच थोडासा राग आला की ती रागावली कि काय? उगाच विचारला हा प्रश्न असं म्हणून स्वतःला दोष देत असतानाच तिचा रिप्लाय आला, त्यात ती म्हणाली की ," तुझ्या घरासारखी माझी परिस्तिथी नाहीये रे !" हे ऐकून मी विचारलं ,"का गं? काय झालं नक्की सांगशील का?". "अरे माझ्या घरात माझ्यावर बरीच बंधनं आहेत,संध्याकाळी लवकर घरी यावं लागत , बाहेर कुठे जायचे म्हणलं कि 100 परवानग्या घ्याव्या लागतात ,आई बाबा जरासे जुन्या विचारांचे आहेत त्यांना हे असं चालत नाही" ती म्हणाली. हे ऐकून मला माझ्या प्रश्नाच उत्तर काही अंशी मिळालं होतं पण तरी अजून नकाराच कारण कळलेलं नव्हतं म्हणून आता मी मुद्दाम तिला खोदून खोदून विचारू लागलो. मी तिला विचारलं की मग त्यांना जर हे चालत नाही तर मग तू माझ्याशी किंवा इतरांशी एवढा रात्री चॅट कसा करते हा खोचक प्रश्न मी विचारला. खरतर ह्या खोचक प्रश्नात इतरांशी हा शब्द मुद्दाम वापरून ती फक्त माझ्याशीच चॅट करते कि आणखी कोणाशी हे मला तिच्या नकळत जाणून घ्यायचं होत. मग ती म्हणाली की "मी डोक्यावरून पांघरून घेऊन त्याच्या आत गपचूप चॅट करते असं म्हणून ती smilies मध्ये हसली.. आणि मग आम्ही गुड नाईट म्हणलं आणि झोपून गेलो...नेहमी प्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्या गुड मॉर्निंग मेसेज ची वाट बघत होतो पण काही केल्या तिचा मेसेज आला नाही मग मी म्हणलं की काहीतरी काम आलं असेल तिला त्यामुळे नसेल केला पण त्या संपूर्ण दिवशी तिचा एकही मेसेज आला नाही आणि पुन्हा माझ्या मनात सुरु झाली ती धाकधूक......

           4 दिवसांपासून एकही मेसेज न आल्याने मला थोडीशी काळजी वाटू लागली होती. मग मी शोध सुरु केल्या तिच्या गृप मधल्या कॉमन फ्रेंड्स ला विचारलं तर त्यातून कळलं की त्यांचाही काहीच कॉन्टॅक्ट नाही,हे ऐकून पुन्हा माझं अवसान निघून गेल..पण आयुष्यात अनेक फिल्मी गोष्टी घडतच असतात तसेच झालं तिचा काही दिवसांनी मेसेज आलाच आणि एकाएकी मला काय झालं काय माहित मला आलेला काळ्जीरूपी राग मी तिच्यावर काढला आणि चिडून खूप काही बोललो त्यामुळे ती नाराज झाली असावी आणि ती पुन्हा offline गेली. पण नंतर मलाच कसतरी वाटू लागलं आणि मग मी तिला फोन करून सॉरी वगरे म्हणलं आणि पुन्हा एकदा आमचं चॅटिंग सुरु झालं... मी तिला तिच्या इतके दिवस गायब असण्याबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिच्या कोणत्यातरी नातेवाईकांच्या कडे लग्न होत आणि ती व तिच्या घरचे तिकडे गेलेले आणि तिकडे तिचा फोन गडबडीत पडला आणि बंद पडला त्यामुळे तिच्याकडे त्या दरम्यान मोबाईल च नव्हता आणि मोबाईल दुरुस्त होऊन येईपर्यंत तिला कोणाशीच बोलता आलं नाही. आपण हे कारण न जाणून घेता तिला खूप काही बोलून गेलो रागाच्या भरात , हे पाहून मला गिल्टी वाटलं आणि मी पुन्हा पुन्हा मी तिला सॉरी म्हणालो आणि मग मी विषय बदलला आणि मग मी तिला विचारलं की लग्नात काय काय केलं ? कोण कोण गेला होतात ? हे असं विचारण्यामागे पुन्हा तिच्या घरच्या परिस्तिथीबद्दल जाणून घ्याच उद्देश होता त्यावर तिने दिलेल्या उत्तरांवरून असं जाणवलं की तिच्या घरी तिने मुलांशी बोललेलं फारसं चालत नसावं तिच्या पालकांना ते आवडत नसावं आणि कदाचित हेच कारण नकारामागे असू शकेल आणि तिच्या आणि माझ्या काही कॉमन फ्रेंड्स कडून सुद्धा मला ही गोष्ट कळली आणि मग मी थोडा रिलॅक्स झालो आणि मला atleast नकाराबद्दल च कारण तरी कळलं आणि मग मी ठरवलं की अत्ता परत तिला ती रेडी असेल पर्यंत प्रपोज करायचं नाही कारण अश्यांची आपण तिची मैत्री सुद्धा गमावून बसू आणि अश्या तर्हेने सुरुवात झाली ती पुन्हा नव्या नात्याची ते नातं होत फ्रेंडशिप आणि मला कळून चुकलं रीलेशनशीप ची गरज पण नाही गरज आहे ती फक्त चांगल्या फ्रेंडशिप ची .....
(समाप्त)

©मिहीर कुलकर्णी

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...