Saturday, 17 December 2016

फ्रेंडship सिझन 3 Flirtationship

भाग 1:-

             पुन्हा सुरु झालेलं चॅट तस काहीसं स्थिरस्थावर झालेलं होत आणि दरम्यान आमच्या दोघांची परीक्षा ही आवरली होती त्यामुळे सुट्टी असल्यामुळे आमच्यात तस नेहमीपेक्षा थोडस चॅटिंग वाढलेलं होत. मी पण थोडासा रिलॅक्स झालो होतो आणि माझ्या तिच्यासोबत चॅटिंग हा आता माझा दिनक्रमच झाला होता. असेच मजेत दिवस सरत होते.. पण कायमच सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तशाच घडतील असं नाही त्यामुळे थोडे दिवस गेले की काही ना काही घडणारच हे जणू आता नक्की झालं होतं आणि काही दिवसांनी तसंच काहीसं घडायला सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही..
             त्याच झालं असं की ज्या व्हाट्सअप्प गृप द्वारे आमची ओळख झालेली त्यावर असणारे अनेक जण माझे आधीपासूनच मित्रमैत्रिणी होते पण मध्यंतरी त्यात एक मुलगा ऍड झाला होता पण माझ्या ह्या सगळ्या व्यापात माझं त्या गोष्टीकडे लक्षच नव्हतं आणि मला माझ्या त्या गृप मधल्या एका मित्राकडून असं कळलं की तो नव्याने ऍड झालेला आहे तो फ्लर्टींग वगरे करण्यात खूप पटाईत आहे हे ऐकून मला थोडासा राग आला आणि मी म्हणालो, "मग ऍड कशाला केला त्याला?,आपल्या ह्या गृप मध्ये मुलीपण आहेत आणि ह्यांनी जर काही घोटाळा करून ठेवला तर तो निस्तरणार कोण? त्या **** अडमिंन मध्ये निस्तरण्याचा दम तरी आहे का ? " माझा हा रौद्रवतार बघून माझा मित्र मला समजवण्याच्या सुरत म्हणाला ,"अरे ए,थंड घे रे आणि तू का तापतोय एवढं , काही झालंच तर तो अडमिंन अन तो मुलगा बघून घेतील कि ,तू chill मार" हे ऐकून माझा राग थोडा कमी झाला आणि मी म्हणालो ,"बर अजून पर्यंत त्यांनी कुणाला pc (पर्सनल चॅट) वर मेसेज वगरे केला नाहीये ना?" हे विचारण्या मागचा उद्देश मित्राच्या कदाचित लक्षात आला असावा, पण शेवटी तो पण पुणेरीच त्यांनी पण " केला असेल तर केला असेल तू का एवढं पझेसिव्ह होतोय तुला कोणाला करायचा आहे का?" असा खोचक प्रश्न मला विचारला . मी ह्या प्रश्नावर निरुत्तर झालो कारण मला काय बोलाव सुचेना म्हणून मी त्याला म्हणलं "नाही रे मला करायचा नाही कुणाला ,पण भविष्यात काही वावगं व्हायला नको म्हणून विचारलं?" ह्यावर माझ्या प्रश्नतला मतितार्थ मित्रानी ओळखला असावा आणि तो मला म्हणाला "अजून तरी कोणाला केलेला नसावा पण तरी एकदा मी माझ्या सूत्रांकडून माहिती काढतो आणि तुला सांगतो".हे सूत्र वगरे ऐकून मला किंचितस हसू आलं कारण जसा लोकांच्या आयुष्यावर फिल्म चा प्रभाव असतो तसा हल्ली tv चा हि होऊ लागलाय त्यामुळेच हे असं सूत्र वगरे तोंडून येत असावं... हे बोलून झाल्यानंतर मी माझ्या घरी आलो पण हा विषय काही केल्या माझ्या मनातून जाता जाईना अन अश्या वेळी पुन्हा माझ्या मनातल्या डिटेक्टिव्ह नि मला खुनावायला सुरुवात केली ...

(क्रमश:)

मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...