Sunday, 18 December 2016

फ्रेंडशिप सिझन 3 Flirtationship


भाग २:-

           माझ्यातला डिटेक्टिव्ह उफाळून आल्यावर मी पुन्हा सुरु केली ती शोधाशोध,खरतर ह्या शोधामागे माझ्या मनात असलेली थोडीशी जेलसी कारणीभूत होती किंवा माझा क्षमतेवर नसलेला विश्वास पण हा विचार अत्ता करण्याची गरज नव्हती म्हणून मी शोधाशोध सुरु केली. माझ्या शोध मोहिमेतले माझे पहिले सूत्र म्हणजे आमचे कॉमन फ्रेंड्स पण त्यांना डायरेक्ट विचारायला जावं तर ते पण संशय घेणार किंवा उगीच त्यांच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण झाले आणि त्यांनी त्यातून मी केलेली ही चौकशी असेल किंवा ह्याधी तिच्या घरच्यांविषयी केलेली चौकशी जर तिला समजली अन तिने बोलणं बंद केलं तर अशी भीती मला सतावू लागली आणि ह्यातूनच मला आठवण झाली ती माझ्या मित्राची जो मला काही माहिती मिळते का हे बघून सांगतो म्हणाला होता . मग खिशातून फोन काढून मी त्याला फोन केला आणि आमच्या नेमहिच्या ठिकाणी नेहमीच्या वेळेला भेटायला बोलावलं. दरम्यान काहीवेळांतर माझ्या असं लक्षात आलं की आपण त्याला आपल्या नेहमीच्या वेळेला बोलावलं आहे खरं पण त्यावेळी तिथे आपले अजून मित्रपण असतील त्यांच्यासमोर नीट बोलता येणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा त्याला फोन लावला आणि आमच्या नेहमीच्या वेळेच्या थोडं आधीच बोलावून घेतलं. मला दुपारभर वेगवेगळ्या शंकांनी आणि प्रश्नांनी हैराण करून सोडलं होत त्यामुळे एरवी शक्यतो उशिरा जाणारा मी आज वेळेच्या खूप आधीच आमच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन बसलो. थोड्यावेळानंतर मित्र आला तो म्हणाला ,"अरे काय झालं ?आज अचानक वेळेच्या आधी का बोलावलं ? काही झालं तर नाहीये ना?" अश्या अनेक प्रश्नांची सरबत्ती त्याने माझ्यावर केली आणि त्याचे प्रश्न संपल्यानंतर मग मी त्याला विचारलं "अरे मी तुला त्या नवीन ऍड झालेल्या मुलाबद्दल माहिती काढायला सांगितली होती त्याच काय झालं?काही काढली का तू माहिती?". दरम्यान त्याला आणि मला आम्हाला दोघांना चहाची हुक्की आली आणि आम्ही आमच्या कट्ट्याच्या समोरच असलेल्या चहा वाल्या काकांना इशारा करून 2 कटिंग ची ऑर्डर दिली आणि कटिंग आल्यावर खिशातली एक गरम पेटवून चहाचा घोट घेत आणि झुरका मारत आम्ही चर्चा करू लागलो आणि बोलण्या बोलण्यातून त्याच्या नकळत मला समजलं की त्या नव्याने ऍड झालेल्या मुलानी तिला मेसेज केलाय आणि तो तिच्यासोबत फ्लर्ट पण करतो हे ऐकून मला राग आला पण मी जोपर्यंत ती मला ह्याविषयी सांगत नाही तोपर्यंत आपण काही बोलायचं नाही असं ठरवलं आणि परत घरी आलो..

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...