एखाद्या फेमस Rj चा शो लोकं ऐकत असतात ,लोकांचा तो प्रचंड आवडता शो असतो आणि अश्यातच एका tinder डेट वर चाललेल्या मुलीला, जेव्हा डेट वर गेल्यावर तीच स्वागत करायला नाकात बोट घालून बसलेला मुलगा जेव्हा तिने बांधलेला स्टोल उघडल्यावर तोंड वेडंवाकडं करतो ,तेव्हा तिथेच ती उठून जाते. आता या भेटीत दोघांना काय मिळालं ? तर तिला तिने काढलेला एक फोटो मेम मटेरियल देऊन जातो.
पुढे वेगवेगळ्या घटनांमधून ,काही प्रसंगातून ,तीच त्या rj प्रति असणार आकर्षण वाढत जात, अन एकदा चुकून डायल झालेला एक नंबर तिला एक अनोळखी मित्र देऊन जातो . अश्या आशयाची कथा ...
तस म्हणायला गेलं तर हा प्लॉट काय नवीन नाही ,अनेक पुस्तकातून ,अनेक गोष्टीतून ,अनेक सिनेमांमधून असा प्लॉट वापरला गेलाय, पण या गोष्टीबाबत म्हणायला गेलं तर ओनीर सारख्या एका टॅलेंटेड माणसाने ही फिल्म डायरेक्ट केलीय हेच त्याच वैशिट्य म्हणता येईल..
अगदी साधी सरळ अन सोपी मांडणी हे या कथेच वैशिष्ट्य ,अन म्हणूनच कदाचित फारशी चांगली गाणी वैग्रे नसतानाही ही कथा काहीशी भावते .... कारण या कथेची मांडणी कवितेसारखी आहे...
- मिहीर
