Wednesday, 24 May 2017

कथा : अलवार भाग १

या कथेसाठी पटकथेच्या पद्धतीचा वापर केला आहे तरी प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात...
.....................................................................
कथा :- अलवार
भाग १:-
फेड इन.........
         एप्रिल च्या मध्यावधी ची म्हणजे साधारणतः १६-१७ तारखेची गोष्ट,दुपारचा १ वाजायला आलाय अन दुष्काळी भागात ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघतो त्याप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा आता गावातील लोक करू लागलेत,कारण दुष्काळ हा त्यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे जणू..पण अश्यातच वेळ आली आहे ती म्हणजे शाळेच्या वार्षिक परीक्षेची...
                                  कट टू..
स्थळ :- शाळा ,वेळ :- दुपारची
        आज वार्षिक परीक्षेचा पहिला पेपर दुपारी २ वाजता आहे आणि आत्ताशी तर १ पण वाजला नाहीये,अश्यातच शाळेबाहेर पोरांची टाळकी जमायला सुरुवात झालीय. खरतर परीक्षेच्या अभ्यासाशी वगैरे फारसा संबंध नसलेली अशी  अज्या,पक्या ,आणि बबल्या अशी तीन टाळकी आज पेपर च्या आधी तब्बल एक तास शाळेच्या पटांगणात दाखल झालीत. पटांगणातील एका कोपऱ्यात असलेल्या भल्यामोठ्या झाडाच्या सावलीखाली आश्रय घेत ,जमिनीवरील दगड घेऊन त्याद्वारे मातीत काहीसं कोरीवकाम करण्यात पक्या अन बबल्या दंग झाले आहेत.अन अज्या शेजारी जमिनीवर पहुडला आहे.जमिनीवर रेखाटन करता करता बबल्या च लक्ष शाळेच्या फाटकाकडे जातं अन शेजारी पहुडलेल्या अज्या ला तो म्हणू लागतो
बबल्या :- अय अज्या ,आर लगा उठ की
अज्या :- आर काय फडफडलंयस ,जरा झोपूदे की
बबल्या:- आर उठ अन बघ तिकडं ,वहिनी आल्यात!
वहिनी आल्यात हे शब्द ऐकून अज्या ताडकन उठतो आणि शाळेच्या दरवाज्याकडे बघू लागतो.
                           कट टू....
स्थळ :- शाळेचा दरवाजा,वेळ दुपारची
        शाळेच्या दरवाज्याबाहेर एक मोटरसायकल येऊन थांबते,आणि त्यावर मागच्या बाजूला बसलेली मुलगी उतरते ,तस तिला सोडायला आलेल्या तिच्या भावाशी ती काहीतरी बोलते आणि शाळेच्या गेट मधून आत येऊ लागते आणि तोवर साधारणतः पेपर ची वेळ जवळ आलेली असते त्यामुळे ती शाळेच्या नोटीस बोर्ड जवळ जाते आणि तिथे तिचा नंबर कुठल्या वर्गात पडला आहे हे बघू लागते. लांबून हे तिघेही हे सगळं बघत असतात ,बघत असताना अज्या ने ती वहिनी आहे तुमची तेव्हा जरा दमान अन नीट बघा अशी ताकीद केलेली असते..अन हे तिघे ती नोटीस बोर्ड पाशी गेली म्हणून आपण व जाऊया म्हणून जातात..अन नंबर बघतात,आणि त्यांच्या वर्गात जायला निघतात..
                               कट टू ...
स्थळ :- शाळेचा वर्ग,वेळ दुपारची
          तिघांचा नंबर वेगवेगळ्या वर्गात आलेला असतो.तिघेही आपापल्या वर्गात जाऊन बसतात ,अज्या पण त्याच्या वर्गात जातो आणि त्याचा नंबर असलेल्या बेंच वर बसतो.पण त्याच सगळं लक्ष दरवाज्याकडे असत कारण त्याला ती तिथून जाताना दिसेल अस वाटत असत..पण पुढं काय होणारे हे त्याला माहिती नसत....
(क्रमशः)
©मिहीर कुलकर्णी

Saturday, 20 May 2017

Half Girlfriend Film Review


       २०१४ मध्ये बेस्ट सेलर ठरलेल्या पण जास्तीत जास्त लोकांना न आवडलेल्या अश्या "हाफ गर्लफ्रेंड" नावाच्या पुस्तकावर बेतलेल्या त्याच नावाचा सिनेमा म्हणजे "हाफ-गर्लफ्रेंड". आज प्रदर्शित होतोय ,चित्रपटातील काही गाणी बऱ्याच दिवसापासून चार्टबस्टर ठरली आहेत म्हणून म्हणा किंवा अजून काही करणांद्वारे हा चित्रपट काही अंशी गर्दी खेचण्यात यशस्वी होईल पण लोकांच्या कितपत पसंतीस उतरेल यात शंका आहे.

एका छोट्या गावामधील मुलगा म्हणजे सिनेमाचा नायक "माधव झा" दिल्ली मधल्या एका नामांकित कॉलेज ला "स्पोर्ट्स कोट्यामधून" ऍडमिशन घेतो ,तिथे बास्केटबॉल खेळताना त्याची ओळख देखणी,श्रीमंत असणाऱ्या "रिया समाणी" या मुलीशी होते अन मग पुढे काय काय होतं, अश्या प्रकारची ही कथा आहे. चित्रपट का बघावा या पेक्षा का टाळावा याचीच कारणं खूप आहेत.चित्रपटातील कलाकारांचा अभिनय फारसा वाखाणण्याजोगा नाही ,श्रद्धा कपुर आणि अर्जुन कपूर हे बास्केटबॉल प्लेअर दाखवले आहेत,पण खेळाडूला असलेलं कनविक्शन त्यांच्या अभिनयात फारसं दिसून येत नाही,हा अर्जुन कपूर नी अभिनय चांगला करायचा अतोनात प्रयत्न केला आहे ,ही च काय ती जमेची बाजू म्हणता येईल. चित्रपटातील ३ गाणी सोडली तर बाकी कोणतीही गाणी लक्षात राहत नाहीत.

चित्रपटाची पटकथा सुद्धा फारशी रटाळ आहे,अर्थात चेतन भगत चे लिखाण असल्यामुळे त्यातून फारश्या अपेक्षा ठेवणं योग्य नाही असं काहीजणांच म्हणणं होतं ,ते मात्र या चित्रपटामुळे खरं झालेलं आहे. चित्रपटातील घटना या घडतात पण त्या घटनांचा इमोशनल कनेक्ट होत नाही इथेच पटकथेच बरचसं अपयश दिसून येतंय.

चित्रपटातील आणखीन एक हास्यास्पद गोष्ट म्हणजे जगातील एका अत्यंत नामवंत व्यक्तीचा त्या  कथेतील अस्तित्व स्पेशल इफेक्ट्स आणि कॉम्पुटर ग्राफिक्स चा वापर करून दाखवण्यात आल आहे. जे की हास्यास्पद आहे.

चित्रपटातील एक जमेची बाजू म्हणजे "इंग्लिश बोलता येण्यापेक्षा चांगला माणूस होणं गरजेचं आहे" हा संदेश. तर असा हा होता हाफ गर्लफ्रेंड चित्रपटाचा Review.

©मिहीर कुलकर्णी

Wednesday, 17 May 2017

आगामी कथेतून.....

अशीच भर दुपारची वेळ होती , पक्या अजून ती कशी अली नाही याची वाट बघत त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी बसला होता. इतक्या रणरणत्या उन्हात आणि पाणीपाणी झालेल्या त्याला तिथल्या जमिनीवरचे दगड घेऊन ते समोर मारण्याखेरीज दुसरं काहीच वेळ घालवण्याच साधन राहिलं नव्हतं.इतक्यात ती आली पण नेहमीची येणारी ती अन आज आलेली ती यात जमीन अस्मानाचा फरक होता आणि तो न ओळखू येण्याइतका पक्या ही न कळणार्यातला नव्हता.ती आली पक्याने तिच्या नजरेला नजर मिळवण्याचा प्रयत्न केला पण आज तिची नजर पक्याच्या नजरेला मिळण्यास तयार होत नव्हती,जणू नजर नजरेला धोकाच देत होती....हे पक्याला कळत होतं पण त्याला ते वळू द्यायचं नव्हतं तो पुन्हा पुन्हा तिच्याशी बोलायचे ,तिच्या नजरेला नजर मिळायचे प्रयत्न करतच होता..पण नजरच धोका देतीय हे कळल्यावर त्याला नक्की काहीतरी झालंय याची जाणीव होत होती....पण ते नक्की काय झालंय??

आगामी कथेतून.......

©मिहीर कुलकर्णी

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...