२०१४ मध्ये बेस्ट सेलर ठरलेल्या पण जास्तीत जास्त लोकांना न आवडलेल्या अश्या "हाफ गर्लफ्रेंड" नावाच्या पुस्तकावर बेतलेल्या त्याच नावाचा सिनेमा म्हणजे "हाफ-गर्लफ्रेंड". आज प्रदर्शित होतोय ,चित्रपटातील काही गाणी बऱ्याच दिवसापासून चार्टबस्टर ठरली आहेत म्हणून म्हणा किंवा अजून काही करणांद्वारे हा चित्रपट काही अंशी गर्दी खेचण्यात यशस्वी होईल पण लोकांच्या कितपत पसंतीस उतरेल यात शंका आहे.
एका छोट्या गावामधील मुलगा म्हणजे सिनेमाचा नायक "माधव झा" दिल्ली मधल्या एका नामांकित कॉलेज ला "स्पोर्ट्स कोट्यामधून" ऍडमिशन घेतो ,तिथे बास्केटबॉल खेळताना त्याची ओळख देखणी,श्रीमंत असणाऱ्या "रिया समाणी" या मुलीशी होते अन मग पुढे काय काय होतं, अश्या प्रकारची ही कथा आहे. चित्रपट का बघावा या पेक्षा का टाळावा याचीच कारणं खूप आहेत.चित्रपटातील कलाकारांचा अभिनय फारसा वाखाणण्याजोगा नाही ,श्रद्धा कपुर आणि अर्जुन कपूर हे बास्केटबॉल प्लेअर दाखवले आहेत,पण खेळाडूला असलेलं कनविक्शन त्यांच्या अभिनयात फारसं दिसून येत नाही,हा अर्जुन कपूर नी अभिनय चांगला करायचा अतोनात प्रयत्न केला आहे ,ही च काय ती जमेची बाजू म्हणता येईल. चित्रपटातील ३ गाणी सोडली तर बाकी कोणतीही गाणी लक्षात राहत नाहीत.
चित्रपटाची पटकथा सुद्धा फारशी रटाळ आहे,अर्थात चेतन भगत चे लिखाण असल्यामुळे त्यातून फारश्या अपेक्षा ठेवणं योग्य नाही असं काहीजणांच म्हणणं होतं ,ते मात्र या चित्रपटामुळे खरं झालेलं आहे. चित्रपटातील घटना या घडतात पण त्या घटनांचा इमोशनल कनेक्ट होत नाही इथेच पटकथेच बरचसं अपयश दिसून येतंय.
चित्रपटातील आणखीन एक हास्यास्पद गोष्ट म्हणजे जगातील एका अत्यंत नामवंत व्यक्तीचा त्या कथेतील अस्तित्व स्पेशल इफेक्ट्स आणि कॉम्पुटर ग्राफिक्स चा वापर करून दाखवण्यात आल आहे. जे की हास्यास्पद आहे.
चित्रपटातील एक जमेची बाजू म्हणजे "इंग्लिश बोलता येण्यापेक्षा चांगला माणूस होणं गरजेचं आहे" हा संदेश. तर असा हा होता हाफ गर्लफ्रेंड चित्रपटाचा Review.
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment