Thursday, 26 January 2017
भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास पान ४ कालखंड १९५५-१९७०
हा कालखंड विशेषतः ज्यानी गाजवला त्यापैकी काही लोकांची नवे घ्यायची झाली तर त्यात अग्रगण्य नाव येईल ते म्हणजे "सत्यजित रे"...त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अनन्यसाधारण योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देऊन त्यांचा गौरव केला.
१९५५ साली सत्यजित रे दिगदर्शित "पथेर पांचाली" हा चित्रपट "New York" मधील "Museum of Modern Art " येथे World Premiere झालेला पहिला चित्रपट ठरला.पथेर पांचाली ह्या सिनेमा च्या बाबतीत सांगायचे झाल्यास ह्या चित्रपटाने भरपूर कमाई केली आणि हा चित्रपट तत्कालीन बंगाल सरकारने सह निर्मित केला असल्यामुळे तत्कालीन बंगाल सरकारला ह्या चित्रपटाच्या माध्यमातून भरपूर अर्थप्राप्ती झाली आणि हि झालेली अर्थप्राप्ती बघून तत्कालीन केंद्र सरकारने १९६० साली Film Finance corporation ची स्थापना केली.सत्यजित रे यांचा पश्चिमी मीडिया नि त्यांच्या "Authentic Indian Realities" चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याच्या शैलीचा भरोउर गौरव केला, सत्यजित रे यांनी केलेलं काम हे आजही एक मापदंड म्हणून समजले जाते आणि आजही अनेक चित्रपटांना तो मापदंड पार करता आलेला नाही.
१९५६ साली बॉम्बे मधील चित्रपट गृहांच्या बांधकामावर घातलेली बंदी उठवण्यात आली.तसेच या वर्षी अनेक भारतीय चित्रपट Edinburgh , Berlin film festival मध्ये दाखवण्यात आले आणि त्यांनी तिथे वाहवा देखील मिळवली.
१९५७ साली सत्यजित रे दिगदर्शित "अपरिजितो" ला Venice Film festival मध्ये पहिला क्रमांक मिळाला,तसेच या वर्षी बिमल रॉय यांच्या "काबुलीवाल" या चित्रपटाला Berlin Film Festival मध्ये संगीतासाठी Special Mention पुरस्कार मिळाला,तसेच K.A Abbas दिग्दर्शित "परदेसी" हा चित्रपट पाहिला भारत आणि रशिया यांच्या दाहकार्याने बनलेला चित्रपट ठरला चित्रपटांच्या निर्मितीच्या माध्यमातून भारताचे निरनिराळ्या देशांशी होणारे संबंध यांचा परिणाम भारताच्या तत्कालीन राजकारणावर समाधानकारक झाला असे म्हणायला हरकत नाही.१९५७ साली फिल्मच्या raw स्टॉक चा समावेश गरजेच्या वस्तू (Essential commodities ) मध्ये करण्यात आला आणि त्याच्या आयात संपूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणण्यात आली.
१९५९ साली या वर्षी गुरुदत्त यांनी "कागज के फुल" हा पहिला भारतीय CinemaScope चित्रपट बनवला.१९५९ सालीच व्ही.शांताराम यांच्या "दो आखे बारा हात" या चित्रपटाला Berlin film festival मध्ये Hollywood Foreign Press Award आणि Samuel Goldwyn Award असे पुरस्कार मिळाले.१९६० साली केंद्र सरकारने चित्रपटांना स्वस्त दरात कर्ज पुरवण्यासाठी Film Finance Corporation ची स्थापना केली,तसेच याच वर्षी पुण्यामध्ये प्रभात स्टुडिओज च्या जागेत Film institute of India (FTII) ची स्थापना केली. "मुघल-ए-आझम" हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या १९६० पर्यंतच्या इतिहासातील सर्वात महाग चित्रपट याच वर्षी म्हणजे १९६० साली प्रदर्शित झाला.
१९६३ मध्ये "Indian Motion Pictures Export corporation " ची स्थापना करण्यात आली.१९६४ साली पुण्यामध्ये "National Film Archieve of India " ची स्थापना करण्यात आली,या ठिकाणी अनेक चित्रपटांच्या रीळाचं आणि चित्रपटाच्या दुर्मिळ पोस्टर्स च जतन करून ठेवण्यात येत.१९६६ मध्ये चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी "दादासाहेब फाळके जीवन गौरव" पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.१९६७ मध्ये हिंदुस्थान फोटो फिल्म्स नी स्वतः कृष्णधवल फिल्म्स आणि साऊंड negative फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली, पण कलर फिल्म्स अजूनही आयातच कराव्या लागत होत्या,पण स्थानिक कार्यक्रमांना वगरे ह्या फिल्म्स सर्रास वापरल्या जाऊ लागल्या.१९६७ साली भारतात पहिल्यांदा 70mm चित्रपट दाखवला गेला आणि चित्रपटांची परिभाषा ह्यामुळे बदलली.
१९६८ साली K.A Abbas यांच्या "चार शहर एक कहानी" या लघुपटला व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाराचा सेन्सॉर कडून भंग होऊन परवानगी न दिल्यामुळे वादंग निर्माण झाला. बॉम्बे फिल्म शैलीला आव्हान देणारी आणि फिल्म फायनान्स कॉर्पोेरेशन ने सहनिर्मित केलेली फिल्म "भुवन शोम और उसकी रोटी" १९६९ साली प्रदर्शित होऊन एक नवा पायंडा पडला असं म्हणायला हरकत नाही.
१९६९ साली "आराधना" या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशामुळे राजेश खन्ना रातोरात सुपरस्टार झाले असे म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे राजेश खन्ना हे पहिले सुपरस्टार ठरले.१९७० साली सिनेजगतामधल्या खुमासदार बातम्या,मसालेदार बातम्या देणारे इंग्रजी मासिक "स्टारडस्ट" सुरु करण्यात आले आणि ते आजही लोकप्रिय आहे,१९७० साली मुंबई मधल्या एका रस्त्याला दादासाहेब फाळके यांचं नाव देण्यात आलं.
🎥©मिहीर कुलकर्णी
Sunday, 22 January 2017
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पान ३ कालखंड १९४०-१९५४
१९४२ साली सेन्सॉर ने गांधी आणि नेहरू यांचे फोटो असलेले पोस्टर्स आणि चित्रपटातील काँग्रेस विषयी असलेली गाणी किंवा चित्रपटातून गांधी आणि नेहरूंचे मांडले जाणारे विचार ह्याला बंदी घातली.हि एकच वाईट गोष्ट सोडली तर १९४२ हे साल चित्रपटसृष्टीसाठी अनेक नव्या स्टुडिओज ना जन्म देणार वर्ष ठरलं असं म्हणायला हरकत नाही कारण ह्याच वर्षी अशोक कुमार आणि एस.मुखर्जी फिल्मीस्तान स्टुडिओज ची तर व्ही.शांताराम यांनी "राजकमल कलामंदिर स्टुडिओ" ची स्थापना केली.१९४२ साली मेहबूब खान यांनी प्रोडक्शन कंपनी ची स्थापना केली ज्याचं रूपांतर १९५२ साली प्रसिद्ध अश्या "मेहबूब स्टुडिओ" मध्ये झाला.१९४३ साली राजकमल कलामंदिर चा पदार्पणातील चित्रपट "शकुंतला" प्रदर्शित झाला.तसेच १९४३ साली "किस्मत" हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुपरहिट झालेल्या काही चित्रपटांपैकी एक असणारा चित्रपट प्रदर्शित झाला.१९४३ सालीच "राजनर्तकी" ह्या चित्रपटाचं इंग्रजी रूपांतर अमेरिका मधल्या अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाले.The Indian People's Theator Association ची पहिली निर्मिती ह्याच वर्षी म्हणजे १९४३ साली जनतेसमोर आली.
१९४५ साली सरकारने राज्यांचा Raw स्टॉक distribution वरचा कंट्रोल काढून घेतला. १९४७ हे साल भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच ठरलं कारण भारताला ह्या वर्षी स्वातंत्र्य मिळालं, तसेच ह्याच वर्षी व्ही. शांताराम दिगदर्शित "शकुंतला" हा अमेरिकेत प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट ठरला.१९४८ साली "राज कपूर" यांनी "R. K फिल्म्स" ची स्थापना केली ज्याचं रूपांतर १९५० साली "R.K. Studios" मध्ये झालं. १९४८ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नवीन चित्रपट गृहांच्या बांधकामाला बंदी घातली.
१९४९ साली "धरती के लाल" हि Soviet Union मध्ये वितरित करण्यात आलेली पहिली भारतीय फिल्म बनली. The Indian Cinematograph Act,1918 हा कायदा १९४९ साली दुरुस्त (Ammend) करण्यात आला तसेच या वर्षी "चेतन आनंद" आणि "देव आनंद" या बंधूनी बॉम्बे मध्ये "नवकेतन फिल्म्स" ची स्थापना केली.
१९४९ साली मध्य भारतात एंटरटेनमेंट टॅक्स ५०% तर बंगाल मध्ये ७५% इतका लागू करण्यात आला,याला विरोध म्हणून ह्या भागातले थिएटर्स नि संपावर जाण्याचा निर्णय घेतला आणि याला विरोध म्हणून फिल्म इंडस्त्री ने "All India Protest Day" ची घोषणा केली आणि ह्या संपावर उपाय म्हणून सरकारने एक चौकशी समिती नेमली ज्यात चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांचा समावेश होता.१९५० साली पाकिस्तान सरकारने भारतीय फिल्म्स वर प्रत्येक फुटाला १ रुपया असा टॅक्स लावला.
१९५१ साली फिल्म सेन्सॉरशिप च एकत्रीकरण करून बॉम्बे मध्ये "The Central Board Of Film Censors" ची स्थापना करण्यात आली.१९५२ साली "बिमल रॉय" यांनी कलकत्ता सोडून बॉम्बे मध्ये चित्रपट निर्मितीला सुरुवात केली.Indian Cinematograph Act,1918 हा कायदा Indian Cinematograph Act ,1952 नि बदलण्यात आला, याच वर्षी बॉम्बे,कलकत्ता आणि मद्रास मध्ये पहिला "International Film Festival of India" भरवण्यात आला त्यात इटालियन दिगदर्शक "Vittorio De Sica" च्या चित्रपटांनी विशेष प्रभाव निर्माण केला.१९५२ साली Bombay Talkies ने चित्रपटनिर्मिती बंद केली.
१९५२ साली भारतीय चित्रपट निर्मात्यांनी All India Radio सोबत असलेला चित्रपटाची गाणी प्रदर्शित करण्याबाबतचा करार रद्द केला ह्याला कारण म्हणजे All India Radio ने कलाकारांची व चित्रपटांची नाव प्रसारित करण्याला दिलेला नकार हे होत. १९५२ साली पश्चिम पाकिस्तान मध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आणि याच वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील एका चमू (Delegation) ने Motion Pictures Association of America च्या निमंत्रणामुळे हॉलिवूड ला भेट दिली. १९५३ साली प्रभात स्टुडिओ ने प्रोडक्शन बंद केलं आणि यातूनच स्टुडिओ पद्धतीचा अंत व्हायला सुरुवात झाली. फिल्मफेअर मॅगझीन ने १९५३ साली फिल्मफेअर अवॉर्डस ची सुरुवात केली.
१९५४ साली बिमल रॉय दिगदर्शित "दो बिघा जमीन" ला कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये स्पेशल मेन्शन अवॉर्ड मिळालं, याच वर्षी राज कपूर यांच्या आवारा ने रशिया मध्ये भरपूर वाहवा मिळवली.१९५४ साली National Film Awards ची सुरुवात करण्यात आली.
🎥©मिहीर कुलकर्णी
Wednesday, 18 January 2017
"फांदी"
आज रस्त्यावरून चाललो असताना समोरच एका गुलमोहराच्या झाडाची फांदी पडली तशी एका माणसाने ती फांदी हातात घेऊन गुडघ्याच्या साहाय्याने तिचे दोन तुकडे करून ते शेजारी असलेल्या गटारात टाकून दिले..काय वाटलं असेल त्या फांदीला ? सगळ्याच फांद्यांचं नशीब एक सारखं नसतं ,ह्या फांदी बद्दल कुणाला कळवळा वाटणार नाही किंवा कोणी हळळणार ही नाही कारण ह्या फांदीवर ना आर्चि बसली होती ना त्या फांदीला कोण्या घर्ची (घरची) लोक किंमत देत होती .....
#मिहीर
Tuesday, 17 January 2017
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पान २ कालखंड १९२६-१९४०.
हा कालखंड भारतीय चित्रपट सृष्टीला कलाटणी देणारा ठरला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण ह्या कालखंडात अनेक भाषांमध्ये चित्रपट बनायला सुरुवात झाली ,अनेक नवनवीन निर्माते दिग्दर्शक चित्रपट सृष्टीला मिळाले,अश्या अनेक गोष्टींनी भरलेला असा हा कालखंड म्हणजे इसवी सन १९२६-१९४०.
१९२६ ह्या वर्षी 'अर्देशिर इराणी' यांनी Imperial Films या चित्रपट निर्माण करणाऱ्या कंपनी ची स्थापना केली,याच कंपनी ने नंतर १९३१ साली "आलम आरा" हा भारतातील पहिला बोलपट बनवला,हा चित्रपट हिंदी भाषेत बनवण्यात आला होता आणि ह्याच दिगदर्शन अर्देशिर इराणी यांनी स्वतः केलं होतं. दरम्यान च्या काळात भारतीय चित्रपट सृष्टीतील अमेरिकेच्या वाढत्या दबदब्यामुळे चिंतीत होऊन १९२७ साली भारतीय सिनेमा चा अभ्यास करण्यासाठी Indian Cinematograph Committee ची स्थापना करण्यात आली. १९२८ साली ह्या कमिटी ने अभ्यासाअंती आपला रिपोर्ट प्रसिद्ध केला ज्यात ब्रिटिश चित्रपटांना महत्व देण्याऐवजी भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन मिळेल अश्या उपाययोजना अवलंबण्याच्या सूचना करण्यात आल्या,भारतीय चित्रपट सृष्टीसाठी हि गोष्ट अभिमानाची ठरली असं म्हणायला हरकत नाही.१९२९ ह्या वर्षी अनेक महत्वाचे स्टुडिओ स्थापन झाले ह्यातले दोन प्रमुख स्टुडिओ म्हणजे कोल्हापूर मध्ये Prabhat Film Studio आणि बॉम्बे मध्ये Ranjit Movietone .
१९२९ साली Universal Pictures च्या Melody Of Love नि कलकत्ता मधल्या Madan's Elphinston picture palace मध्ये झळकून बोलपटांच्या एका सुवर्णयुगाला सुरुवात केली ,असं म्हणायला हरकत नाही. ह्या Madan Picture Palace चे अनेक ठिकाणी थिएटर्स होते आणि ह्या बाबतीत एक गोष्ट सांगायची झाली तर Universal Pictures नी Madan Pictures चे थिएटर्स खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केली होती पण अमेरिका मध्ये १२२९ साली आलेल्या सगळ्यात मोठ्या आर्थिक मंदी मुळे हा व्यवहार फिस्कटला. १९३० हे साल चित्रपटसृष्टीसाठी वाईटच म्हणावं लागेल कारण ह्या वर्षी अनेक मुकपट निर्माण करणाऱ्या कंपन्या बंद पडल्या कारण आता हळूहळू बोलपटांचा प्रभाव वाढू लागला होता.
आलम आरा च्या प्रदर्शनांतर १९३१ आणि १९३२ साली अनुक्रमे तामिळ,तेलगू,बंगाली,मराठी आणि गुजराती भाषांमधले पहिले बोलपट प्रदर्शित झाले. अशातच भारतीय चित्रपट सृष्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी १९३२ साली The Motion Pictures Society Of India या संस्थेची स्थापना करण्यात आली. हळूहळू बोलपटांचा दबदबा वाढू लागला होता इतका कि १९३३ साली तब्बल ७५ हिंदी चित्रपट पूर्ण गाणी आणि नृत्यांसाहित प्रदर्शित झाले.
१९३३ साली Wadia Cinetone या कंपनी ची स्थापना झाली,ह्या कंपनी बाबतीत सांगायचं झालं तर ह्या कंपनी ने स्टंट फिल्म्स मध्ये प्रभुत्व निर्माण केले आणि १९३५ साली प्रदर्शित झालेली भारतातील पहिली स्टंट फिल्म "हंटरवाली" देखील ह्याच कंपनी ने बनवली होती. १९३५ साली प्रभात स्टुडिओ ची सैरंध्री ही जर्मनी मध्ये प्रक्रिया आणि मुद्रित झालेली भारतातील पहिली Colour Film ठरली हा चित्रपट सृष्टीतला नवा अध्याय ठरला असं म्हणायला हरकत नाही. १९३४ साल पण चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचं ठरलं असं म्हणायला हरकत नाही कारण ह्या वर्षी भारतात तब्बल २२८ चित्रपटांची निर्मिती झाली ह्यात ओरिया आणि कन्नड भाषेतील पहिल्या बोलपटांचा सुद्धा समावेश होता. हिमांशू राय यांनी बॉम्बे टॉकीज ची स्थापना सुद्धा १९३४ याच वर्षी केली. रणजित स्टुडिओ निर्मित "तुफान मेल" हा हिंदी सिनेमा मधील स्टंट फिल्म प्रकारामधला पहिला हिट चित्रपट ठरला. १९३५ सालापासून पार्श्वगायक हा चित्रपटातील अविभाज्य आणि कायमस्वरूपी घटक बनायला सुरुवात झाली ह्याला 'New Theators' निर्मित "धूप चंदन" हा चित्रपट कारणीभूत ठरला असं म्हणलं जात. पंजाबी आणि असामी भाषेतील पहिले बोलपट हे १९३५ सालीच निर्माण झाले.
१९३६ साली भारतात All India Radio ची स्थापना करण्यात आली आणि संपूर्ण वर्षभर याचीच सगळ्या देशात चर्चा निर्माण झाली. १९३७ हे वर्षसुद्धा चित्रपट सृष्टीसाठी संमिश्र असच राहिलं, ह्या वर्षी प्रभात ची निर्मिती असलेल्या संत तुकाराम या चित्रपटाला व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये स्पेशल जुरी अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला,हा पुरस्कार मिळवणारा संत तुकाराम हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९३७ मधेच Imperial Films निर्मित "किसन कन्हैया" हि फ़िल्म भारतीय बनावटीची पहिली कलर फिल्म ठरली. Indian Motion Pictures Association ची स्थापना बॉम्बे येथे याच साली म्हणजे १९३७ मध्ये झाली आणि याच वर्षी दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या आयुष्यातली "गंगावतारम" हि शेवटची फिल्म बनवली आणि चित्रपटसृष्टीतील फाळके युगाचा अंत झाला असे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
१९३८ साली पहिल्या मल्याळम चित्रपटाच्या निर्मितीने भारतीय चित्रपट सृष्टीने २५ वर्ष पूर्ण केली , १९१३ ला मुहूर्तमेढ रोवलेल्या ह्या चित्रपट सृष्टीने बघता बघता २५ वर्ष अनेक चढउतार सहन करत पूर्ण केली.१९४० साली तत्कालीन सरकारने Film Advisory Board ची स्थापना केली आणि त्या बोर्ड ला फिल्म च्या Raw Stock ची मोनोपॉली बहाल करण्यात आली.
तर असा हा १२२६-१९४० हा भारतीय चित्रपट सृष्टीतील कालखंड हा तसा संमिश्र राहिला असं म्हणायला हरकत नाही ,अनेक तांत्रिक बदल ह्या काळात घडले आणि ते बदल चित्रपटसृष्टीने पटकन आत्मसात देखील केले त्यामुळेच चित्रपटसृष्टी तग धरू शकली असं म्हणायला हरकत नाही...
🎥©मिहीर कुलकर्णी
Sunday, 15 January 2017
कथा :- विमानप्रवास
"आई ,माझी ट्रॅव्हल बॅग कुठेय?" रोणु आईला हाका मारत विचारू लागला.त्यावर आईने "ती काय तिकडे काढुन ठेवलीये कपाटाजवळ" असे रोणु ला अपेक्षीत असलेलं उत्तर दिलं अन सुरू झालं ते रोहन उर्फ रोणु च्या पहिल्या विमान प्रवासाचचं नव्हे तर पहील्यावहील्या विदेश दौर्याचं पॅकींग.खरतर रोणु अन पुर्ण परीवारासाठी खर तर ही अभिमानाची गोष्ट होती कारण रोहनचं अमेरीकेतल्या एका प्रसिध्द विद्यापीठात सिलेक्शन झालं होतं अन त्याच्यासाठी ही फारच मोठी अचिव्हमेंट होती .पॅकींग झालं, रोहनच्या परदेशगमनाची बातमी समजताच घरी पाहुण्यांचा राबता सुरू झाला अन सुरू झाले ते वेगवेगळ्या प्रकारच्या विभीन्न सुचना व किस्से.हे सगळं सहन करत करत रोणु नी त्याचा पासपोर्ट व कागदपत्र असलेली पिशवी अन सगळ सामान व्यवस्थित पॅकींग केलं अन अखेरीस ती वेळ आली जड अंत:करणानी आईबाबांनी औक्षण वगैरे करून निरोप द्यायला सगळे जण एअरपोर्ट वर निघाले.नविन झालेल्या टर्मीनल २ मधुन रोणु आत जायला निघाला तसं पाणावलेल्या डोळ्यांनी आईवडीलांनी त्याला टाटा करुन ते परत आले.आत एअरपोर्टवर गेल्यावर चेकींगसाठी रोणु ला बोलावलं तो जणु काय अतेरीकीच आहे अशा अावीर्भावात त्याच यथासांग चेकींग झालं त्याच्या पासपोर्ट वर इमिग्रेशन चा स्टॅंप पडला अन त्याला बोर्डींग पास मिळाला अन तो त्याच्या आयुष्यातील पहील्यावहील्या फ्लाईट कडे मार्गस्थ झाला.प्रवेशद्वारापाशी फ्लाईट अटेंडंटनी त्याचं यथायोग्य स्वागत वगैरे केलं त्याला त्याचा सीट नंबर सांगीतला त्याप्रमाणे रोणु त्याच्या सीट वर जाऊन बसला त्याच्यासाठी संपुर्ण विमानाचं अंतरंग नवीन होतं.उत्सुकतेपोटी तो सगळं बघु लागला तेवढ्यात सीटबेल्ट लावण्याची अनांउन्समेन्ट झाली तो कसं लावायचं ह्यांच एअरहोस्टेस नी प्रात्यक्षीक करून दाखवलं.त्याप्रमाणे त्यानी सीटबेल्ट लावला.अन समोर असणार्या व्हिडीओ स्क्रीनवर चित्रपट पाहु लागला हे करता करता त्याला कधी झोप लागली त्यालाच कळलं नाही .'रोणु उठ,चल ऊठ लवकर' अशी हाक ऐकु आली अन रोणु खाडकन उठला तर पाहतो काय तो त्याच्या रूममध्ये होता अन त्यानी त्याच्या स्वप्नात त्याच्या आयुष्यातला पहीलावहीला विमानप्रवास केला होता तोही थेट अमेरीकेपर्यंत.
---©®मिहीर कुलकर्णी
Saturday, 14 January 2017
भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पान १ कालखंड १८९६-१९२५
कालखंड १८९६-१९२५
हा कालखंड भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवला जाणारा कालखंड असं म्हणायला हरकत नाही ह्या कालखंडात जवळपास प्रत्येक वर्षी काही न काही घटना घडल्या असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही...तर ह्या कालावधीत घडलेल्या काही प्रमुख घटना ह्या पुढीलप्रमाणे .....
१८९६ :- ७ जुलै १८९६ रोजी भारतातील पहिलं Motion Picture च screening "The Lumi re Cinematographe'' त्यांच्यातर्फे Bombay मधील Watson Hotel येथे झालं परंतु ह्या हॉटेल मध्ये भारतीयांना जायची परवानगी नव्हती त्यामुळे ह्या स्क्रिनिंगची खूप चर्चा झालीच नाही.
१८९७:- Harishchandra.S. Bhatvedkar यांनी परदेशातून एक Motion Picture camera आणून छोट्या छोट्या विषयांचं चित्रीकरण करायची सुरुवात केली.
१८९८ :- ह्यावर्षी पासून बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास ह्या शहरातील थिएटर्स आणि रिकाम्या मैदानावर उभारलेल्या तंबूमधून वेगवेगळ्या शॉर्टफिल्म्स दाखवल्या जाऊ लागल्या.
१९०२ :- J.F. Madan ह्यानी कलकत्ता मधल्या एका तंबूमध्ये एक Bioscope दाखवून फिल्म च प्रदर्शन आणि वितरण व्यवस्थेचा एक प्रकारे पाया रोवला असं म्हणलं तरी हरकत नाही
१९०६ :- ह्या वर्षीपासून भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये Picture Palace एक महत्वाच ठिकाण बनायला सुरुवात झाली.
१९१० :- दादासाहेब फाळके यांनी बॉम्बे मध्ये "Life of Christ" हा सिनेमा पहिला आणि ह्याच सिनेमा नि त्यांना भुरळ घातली आणि त्यानंतरच त्यांना सिनेमा बनवायची इच्छा झाली असे म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
१९११ :- King George V यांची दिल्ली भेट आणि त्यांचा Grand Darbar हि भारतातील मोठ्या प्रमाणावर चित्रित करण्यात आलेली पहिली सार्वजनिक घटना असं म्हणायला हरकत नाही .
१९१२ :- पुंडलिक ह्या नाटकाचं चित्रीकरण ह्याच वर्षी करण्यात आलं आणि हे चित्रीकरण भारतातील पहिलं Feature Film म्हणून ग्राह्य धरलं गेलं.
१९१३ :- शनिवार ३ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके कृत "राजा हरिश्चंद्र" हा चित्रपट बॉम्बे मधील Coronation Theator मध्ये पहिल्यांदा झळकला आणि हा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीमधला सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा बनला.
१९१३ :- दादासाहेब फाळके कृत "मोहिनी भस्मासुर" हा भारतातील अभिनेत्री असलेला पहिला चित्रपट ठरला, ह्या आधी चित्रपटामध्ये अभिनेत्री काम करत नसत.
१९१४ :- दादासाहेब फाळके नि त्यांचे "राजा हरिश्चंद्र", "मोहिनी भस्मासुर" आणि "सत्यवान सावित्री" हे ३ चित्रपट London मध्ये दाखवले आणि त्यांना तिथे चांगला प्रतिसाद मिळाला.
१९१६:- Universal Pictures हि भारतात Agent अँपॉइंट करणारी पहिली अमेरिकन कंपनी ठरली
१९१७ :- दादासाहेब फाळके "यांनी चित्रपट कसा तयार होतो?" याविषयीचा एक माहितीपट (Documentary ) यावर्षी प्रदर्शित केली.
१९१८ :- Indian Cinematograph Act 1918 हा कायदा ह्यावर्षी अमलात आला त्यामुळे भारतात पहिल्यांदा सेन्सॉरशिप आणि थिएटर लायसेन्सिंग व्यवस्थेला सुरुवात झाली. याच वर्षी दादासाहेब फाळके यांनी Hindustan Film Company ची स्थापना केली.
१९२० :- या वर्षी बॉम्बे,कलकत्ता आणि मद्रास मध्ये Film Censor Boards ची स्थापना झाली. Madan Theators ची निर्मिती असलेला "नल-दमयंती" हा चित्रपट भारतातील पहिलं International Co-Production असलेला चित्रपट ठरला . हा चित्रपट Indian-Italian प्रोजेक्ट होता.
१९२१ :- Kohinoor studios ची निर्मिती असलेला "भक्त विदुर " ह्या चित्रपटावर मद्रास आणि सिंध प्रांतामध्ये बंदी घालण्यात आणि हि बंदी भारतातील पहिली सेन्सॉरशिप Controversy ठरली .
१९२२ :- कलकत्ता इथे पहिल्यांदा चित्रपट प्रदर्शनावर मनोरंजन कर लावण्यात आला.
१९२३:- बॉम्बे मध्ये १२.५% मनोरंजन कर लावण्यात आला.
१९२५:- भारतातील पहिला महिला निर्माती आणि दिगदर्शक ठरलेल्या फातिमा बेगम यांनी त्यांची चित्रपट निर्मिती करणारी कंपनी ह्याच वर्षी सुरु केली.
तर असा हा १८९६-१९२५ हा कालखंड भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अनेक गोष्टींची मुहूर्तमेढ रोवणारा ठरला असं म्हणायला हरकत नाही.पुढच्या भागात पुढील २५ वर्षांच्या कालखंडात काय काय घडामोडी घडल्या हे जाणून घेऊया...
🎥©मिहीर कुलकर्णी
आठवणींचे उसासे
खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...
-
या कथेसाठी पटकथेच्या पद्धतीचा वापर केला आहे तरी प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात... .............................................................
-
रात्रीची वेळ ,११ वाजत आलेत घड्याळाचा सेकंद काटा "टिक" "टिक" असा आवाज करतोय,शांतता इतकी आहे की हा टिक टिक आवाज...