१९४२ साली सेन्सॉर ने गांधी आणि नेहरू यांचे फोटो असलेले पोस्टर्स आणि चित्रपटातील काँग्रेस विषयी असलेली गाणी किंवा चित्रपटातून गांधी आणि नेहरूंचे मांडले जाणारे विचार ह्याला बंदी घातली.हि एकच वाईट गोष्ट सोडली तर १९४२ हे साल चित्रपटसृष्टीसाठी अनेक नव्या स्टुडिओज ना जन्म देणार वर्ष ठरलं असं म्हणायला हरकत नाही कारण ह्याच वर्षी अशोक कुमार आणि एस.मुखर्जी फिल्मीस्तान स्टुडिओज ची तर व्ही.शांताराम यांनी "राजकमल कलामंदिर स्टुडिओ" ची स्थापना केली.१९४२ साली मेहबूब खान यांनी प्रोडक्शन कंपनी ची स्थापना केली ज्याचं रूपांतर १९५२ साली प्रसिद्ध अश्या "मेहबूब स्टुडिओ" मध्ये झाला.१९४३ साली राजकमल कलामंदिर चा पदार्पणातील चित्रपट "शकुंतला" प्रदर्शित झाला.तसेच १९४३ साली "किस्मत" हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुपरहिट झालेल्या काही चित्रपटांपैकी एक असणारा चित्रपट प्रदर्शित झाला.१९४३ सालीच "राजनर्तकी" ह्या चित्रपटाचं इंग्रजी रूपांतर अमेरिका मधल्या अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाले.The Indian People's Theator Association ची पहिली निर्मिती ह्याच वर्षी म्हणजे १९४३ साली जनतेसमोर आली.
१९४५ साली सरकारने राज्यांचा Raw स्टॉक distribution वरचा कंट्रोल काढून घेतला. १९४७ हे साल भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच ठरलं कारण भारताला ह्या वर्षी स्वातंत्र्य मिळालं, तसेच ह्याच वर्षी व्ही. शांताराम दिगदर्शित "शकुंतला" हा अमेरिकेत प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट ठरला.१९४८ साली "राज कपूर" यांनी "R. K फिल्म्स" ची स्थापना केली ज्याचं रूपांतर १९५० साली "R.K. Studios" मध्ये झालं. १९४८ साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नवीन चित्रपट गृहांच्या बांधकामाला बंदी घातली.
१९४९ साली "धरती के लाल" हि Soviet Union मध्ये वितरित करण्यात आलेली पहिली भारतीय फिल्म बनली. The Indian Cinematograph Act,1918 हा कायदा १९४९ साली दुरुस्त (Ammend) करण्यात आला तसेच या वर्षी "चेतन आनंद" आणि "देव आनंद" या बंधूनी बॉम्बे मध्ये "नवकेतन फिल्म्स" ची स्थापना केली.
१९४९ साली मध्य भारतात एंटरटेनमेंट टॅक्स ५०% तर बंगाल मध्ये ७५% इतका लागू करण्यात आला,याला विरोध म्हणून ह्या भागातले थिएटर्स नि संपावर जाण्याचा निर्णय घेतला आणि याला विरोध म्हणून फिल्म इंडस्त्री ने "All India Protest Day" ची घोषणा केली आणि ह्या संपावर उपाय म्हणून सरकारने एक चौकशी समिती नेमली ज्यात चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांचा समावेश होता.१९५० साली पाकिस्तान सरकारने भारतीय फिल्म्स वर प्रत्येक फुटाला १ रुपया असा टॅक्स लावला.
१९५१ साली फिल्म सेन्सॉरशिप च एकत्रीकरण करून बॉम्बे मध्ये "The Central Board Of Film Censors" ची स्थापना करण्यात आली.१९५२ साली "बिमल रॉय" यांनी कलकत्ता सोडून बॉम्बे मध्ये चित्रपट निर्मितीला सुरुवात केली.Indian Cinematograph Act,1918 हा कायदा Indian Cinematograph Act ,1952 नि बदलण्यात आला, याच वर्षी बॉम्बे,कलकत्ता आणि मद्रास मध्ये पहिला "International Film Festival of India" भरवण्यात आला त्यात इटालियन दिगदर्शक "Vittorio De Sica" च्या चित्रपटांनी विशेष प्रभाव निर्माण केला.१९५२ साली Bombay Talkies ने चित्रपटनिर्मिती बंद केली.
१९५२ साली भारतीय चित्रपट निर्मात्यांनी All India Radio सोबत असलेला चित्रपटाची गाणी प्रदर्शित करण्याबाबतचा करार रद्द केला ह्याला कारण म्हणजे All India Radio ने कलाकारांची व चित्रपटांची नाव प्रसारित करण्याला दिलेला नकार हे होत. १९५२ साली पश्चिम पाकिस्तान मध्ये भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आणि याच वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील एका चमू (Delegation) ने Motion Pictures Association of America च्या निमंत्रणामुळे हॉलिवूड ला भेट दिली. १९५३ साली प्रभात स्टुडिओ ने प्रोडक्शन बंद केलं आणि यातूनच स्टुडिओ पद्धतीचा अंत व्हायला सुरुवात झाली. फिल्मफेअर मॅगझीन ने १९५३ साली फिल्मफेअर अवॉर्डस ची सुरुवात केली.
१९५४ साली बिमल रॉय दिगदर्शित "दो बिघा जमीन" ला कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये स्पेशल मेन्शन अवॉर्ड मिळालं, याच वर्षी राज कपूर यांच्या आवारा ने रशिया मध्ये भरपूर वाहवा मिळवली.१९५४ साली National Film Awards ची सुरुवात करण्यात आली.
🎥©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment