ती सध्या काय करते ?
उभ्या महाराष्ट्राला ज्या प्रश्नाने आपल्या भूतकाळात डोकवायला लावलं त्यावर बनलेल्या चित्रपटाकडून मात्र जर ती सध्या काय करते असं म्हणलं तर त्याला "अपेक्षाभंग" हे एकच उत्तर मिळेल..
चित्रपटाचं प्रोमोशन,प्रोमो पाहून निर्माण झालेल्या उत्सुकतेपोटी लोकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यात हा चित्रपट यशस्वी झाला असेल पण सतीश राजवाडे यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करताना हा चित्रपट कुठेच आढळत नाही. मुंबई पुणे मुंबई 2 च्या बाबतीत पण असच काहीसं होत. मराठी चित्रपटांमध्ये हल्ली लव्ह स्टोरीज च वय कमी होत चाललंय हे दर्शवणारा हा चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्य कलाकारांनी ओढूनताणून केलेला अभिनय आणि चित्रपटाचा पूर्वार्ध सपशेल रटाळ वाटतो आणि त्यातील गंमत हरवून टाकतो. चित्रपटातील लक्षात राखण्यापैकी काही असेल ते म्हणजे गाणी. एखाद्या चित्रपटात आपल्याला मुख्य पात्र सोडून काही वेळेला तिसर्याच कुणाच्यातरी अभिनय आवडतो,पूर्वीच्या काही चित्रपटांमध्ये हि गोष्ट सहसा नवाझुद्दीन सिद्दीकी सारख्या कलाकारांच्या बाबतीत व्हायची तसेच ह्या चित्रपटात सुकन्या आणि संजय मोने ह्यांचा अभिनय त्यांचं वावरणं ,त्यांचे एक्सप्रेशन आपल्याला किंचित सुखावतात..एकंदरीतच काय कि आपल्या कोणत्यातरी खवय्या मित्राने आपल्याला जेवायला घरी बोलावलंय म्हणून आपण त्याच्याकडे आपल्याला खूप काही चांगलं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी खायला मिळेल असा म्हणून आपण जातो आणि त्याने आपल्याला चिवडा लाडू खायला द्यावं असं काहीसं ह्या चित्रपटाच्या बाबतीत वाटत ....
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment