Wednesday, 24 May 2017

कथा : अलवार भाग १

या कथेसाठी पटकथेच्या पद्धतीचा वापर केला आहे तरी प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात...
.....................................................................
कथा :- अलवार
भाग १:-
फेड इन.........
         एप्रिल च्या मध्यावधी ची म्हणजे साधारणतः १६-१७ तारखेची गोष्ट,दुपारचा १ वाजायला आलाय अन दुष्काळी भागात ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघतो त्याप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा आता गावातील लोक करू लागलेत,कारण दुष्काळ हा त्यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे जणू..पण अश्यातच वेळ आली आहे ती म्हणजे शाळेच्या वार्षिक परीक्षेची...
                                  कट टू..
स्थळ :- शाळा ,वेळ :- दुपारची
        आज वार्षिक परीक्षेचा पहिला पेपर दुपारी २ वाजता आहे आणि आत्ताशी तर १ पण वाजला नाहीये,अश्यातच शाळेबाहेर पोरांची टाळकी जमायला सुरुवात झालीय. खरतर परीक्षेच्या अभ्यासाशी वगैरे फारसा संबंध नसलेली अशी  अज्या,पक्या ,आणि बबल्या अशी तीन टाळकी आज पेपर च्या आधी तब्बल एक तास शाळेच्या पटांगणात दाखल झालीत. पटांगणातील एका कोपऱ्यात असलेल्या भल्यामोठ्या झाडाच्या सावलीखाली आश्रय घेत ,जमिनीवरील दगड घेऊन त्याद्वारे मातीत काहीसं कोरीवकाम करण्यात पक्या अन बबल्या दंग झाले आहेत.अन अज्या शेजारी जमिनीवर पहुडला आहे.जमिनीवर रेखाटन करता करता बबल्या च लक्ष शाळेच्या फाटकाकडे जातं अन शेजारी पहुडलेल्या अज्या ला तो म्हणू लागतो
बबल्या :- अय अज्या ,आर लगा उठ की
अज्या :- आर काय फडफडलंयस ,जरा झोपूदे की
बबल्या:- आर उठ अन बघ तिकडं ,वहिनी आल्यात!
वहिनी आल्यात हे शब्द ऐकून अज्या ताडकन उठतो आणि शाळेच्या दरवाज्याकडे बघू लागतो.
                           कट टू....
स्थळ :- शाळेचा दरवाजा,वेळ दुपारची
        शाळेच्या दरवाज्याबाहेर एक मोटरसायकल येऊन थांबते,आणि त्यावर मागच्या बाजूला बसलेली मुलगी उतरते ,तस तिला सोडायला आलेल्या तिच्या भावाशी ती काहीतरी बोलते आणि शाळेच्या गेट मधून आत येऊ लागते आणि तोवर साधारणतः पेपर ची वेळ जवळ आलेली असते त्यामुळे ती शाळेच्या नोटीस बोर्ड जवळ जाते आणि तिथे तिचा नंबर कुठल्या वर्गात पडला आहे हे बघू लागते. लांबून हे तिघेही हे सगळं बघत असतात ,बघत असताना अज्या ने ती वहिनी आहे तुमची तेव्हा जरा दमान अन नीट बघा अशी ताकीद केलेली असते..अन हे तिघे ती नोटीस बोर्ड पाशी गेली म्हणून आपण व जाऊया म्हणून जातात..अन नंबर बघतात,आणि त्यांच्या वर्गात जायला निघतात..
                               कट टू ...
स्थळ :- शाळेचा वर्ग,वेळ दुपारची
          तिघांचा नंबर वेगवेगळ्या वर्गात आलेला असतो.तिघेही आपापल्या वर्गात जाऊन बसतात ,अज्या पण त्याच्या वर्गात जातो आणि त्याचा नंबर असलेल्या बेंच वर बसतो.पण त्याच सगळं लक्ष दरवाज्याकडे असत कारण त्याला ती तिथून जाताना दिसेल अस वाटत असत..पण पुढं काय होणारे हे त्याला माहिती नसत....
(क्रमशः)
©मिहीर कुलकर्णी

9 comments:

  1. Form changala aahe, thoda Sairat chya angane ghoshta jate aahe, predictable aahe asa wataty.. Thode ups and downs interesting karayala hawet ASA watatay.. Waiting for next part...

    ReplyDelete

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...