"He is back" अशी टॅगलाईन घेऊन ज्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असा FU अर्थातच "फ्रेंडशिप अनलिमिटेड" चित्रपट प्रदर्शित झालाय.पण चित्रपट पाहिल्यावर What the FU it is.. अस म्हणल्याशिवाय मात्र कोणीही राहणार नाही. खरतर वेगवेगळे चित्रपट निर्माण आणि दिग्दर्शित केलेल्या महेश मांजरेकरांकडून आपल्याला अपेक्षा खूप असतात आणि ते बरेचदा त्या पूर्णही करतात ,पण या चित्रपटातून असलेल्या अपेक्षा मात्र पूर्ण करण्यात ते सपशेल अपयशी ठरलेत अस म्हणायला हरकत नाही. चित्रपटाची स्टारकास्ट तशी तगडी आहे. पण या स्टारकास्ट चा योग्य वापर करायला लागते ती पटकथा मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरते.चित्रपटात खूप गाणी आहेत ,काही गाणी नसती तर जास्ती चांगलं झालं असतं असच राहून राहून वाटत. शुभम किरोडियन या नवख्या अभिनेत्याने त्याच्या वाट्याला आलेला रोल मध्ये सुंदर अभिनय केलाय. मयुरेश पेम आणि अभिनेत्रींनी सुद्धा त्यांना मिळालेल्या रोल ला निभावण्याचा प्रयत्न केला आहे. पण चित्रपट पाहिल्यानंतर जर कोणाचं काम आवर्जून लक्षात राहत असेल तर ते बोमन इराणींचं त्यांनी त्यांचं काम अत्यंत वाजवी केलं आहे. या चित्रपटात जर कोणाला मिळालेल्या संधीच खऱ्या अर्थाने सोनं करायला आलेलं नाही असं म्हणायचं झालं तर ते आकाश ठोसर ला अस म्हणलं तर वावग नाही ठरणार,कारण त्याचे संवाद ,त्याचे उच्चार खेडवळ वाटतात आणि त्याच्या या रोल ला शोभून दिसत नाहीत.चित्रपटाचं संगीत तस उत्तम आहे पण त्यातली खटकणारी बाजू म्हणजे मराठी चित्रपट असून देखील या चित्रपटातील गाण्यात अनेक हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा केलेला वापर ,काही काही गाणी तर हिंदी च आहेत.
चित्रपटात असलेले काही संवाद,विनोद,काही गोष्टी या आवडू शकतात पण त्याची गंमत ही ग्रुप मध्ये चित्रपट एन्जॉय करण्यातच आहे. आवर्जून पहावा असा हा चित्रपट मुळीच नाहीये पण तरी मराठीत बऱ्याच दिवसांनी एक मसाला पट येऊ घातलाय,म्हणून एकदा बघितला तरी हरकत नाही.
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment