Friday, 30 June 2017

Film Review :- रिंगण

      काही सिनेमे हे पैसे कमवण्यासाठी बनवले जात नाहीत ,तर ते एका पॅशन नी चांगला सिनेमा बनवायच्या उद्देशाने बनवले जातात,रिंगण त्यापैकीच एक. एक परिस्थितीने गांजलेला बाप आणि त्याचा छोटा मुलगा यांच्या केंद्रस्थानी फिरणारी सिनेमाची कथा आहे जी कर्जबाजारीपणावर आत्महत्या हा एकच उपाय नाही तर इतर अनेकप्रकारे सुद्धा काम करून कर्ज फेडले जाऊ शकते असा संदेश देणारा हा चित्रपट आहे.
      चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचा विशेषतः शशांक शेंडेंचा अभिनय अतिशय उत्कृष्ट झाला आहे, काही काही दृश्यात त्यांनी दिलेले एक्सप्रेशन्स भाव खाऊन जातात.लहानमुलाचा अभिनय देखील उत्तम झालेला आहे,तसेच सहकलाकार केतन पवार,सुहास शिरसाट,अभय महाजन ही छोट्याश्या भूमिकांमधून निश्चितच आपल्या लक्षात राहतात.
       मध्यंतरापर्यंत मध्येच सिनेमा काहीसा रेंगाळतोय अस वाटत पण मध्यंतरांनातर मात्र सिनेमा चांगली पकड घेतो. या सिनेमा बाबतची अजून एक महत्वाची बाब म्हणजे सिनेमा चा साऊंड. महावीर सब्ब्णवार यांनी डिझाईन केलेला साऊंड अप्रतिम आहे,छोट्या छोट्या गोष्टींचा साऊंड म्हणजे ते नळातून पडणार पाणी असो किंवा मृदंग,टाळ यांचा आवाज असो अचूक टिपला आहे आणि त्याचा अत्यंत सुरेख वापर या चित्रपटात करण्यात आला आहे.
      चित्रपटातील दोन्हीही गाणी श्रवणीय आहेत,विशेषतः वैभव देशमुख लिखित आणि रोहित नागभिडे नी संगीतबद्ध केलेलं "देव पाहिला" गाणं विशेष लक्षात राहतं. गंधार संगोराम च बॅकग्राऊंड म्युझिक ही उत्तम आहे ,आणि ते अजिबात अंगावर वगरे येत नाही ही देखील ,महत्वाची बाब मानायला हवी. मकरंद माने या सारख्या तरुण दिग्दर्शकाने पदार्पणासाठी निवड केलेला विषय मांडायला कठीण असला तरी त्यांनी तो अतिशय उत्कृष्टपणे आणि स्मरपकरित्या पडद्यावर मांडला आहे. तेव्हा असे चित्रपट मराठीत रोज रोज येत नाहीत आणि असा सिनेमा नक्कीच चालायला हवा,त्यासाठी आपण चित्रपटगृहात जाऊन बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट आहे..
©मिहीर कुलकर्णी

2 comments:

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...