Saturday, 25 February 2017

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पान ६ कालखंड १९८०-१९९५


         १९८२ साली दिल्ली मध्ये झालेल्या ९व्या एशियन गेम्स च प्रक्षेपण हे भारतातील पहिलं रंगीत प्रक्षेपण ठरलं.१९८५ सालापासून दूरदर्शन खासगी लोकांच्या जाहिराती स्वीकारण्यापासून पूर्णतः व्यावसायिक बनायला सुरुवात झाली.

       मेक्सिकन "सोप ऑपेरा" या संकल्पनेवर बनलेली "हमलोग" हि पहिली कोलगेट आणि नेस्ले प्रस्तुत सिरिअल ठरली आणि या मेक्सिकन सोप संकल्पनेमुळे मालिकांना "डेली सोप" म्हणायला सुरुवात झाली ती आजही कायम आहे.

       १९८७ साली दूरदर्शन वर प्रदर्शित झालेली "रामायण" हि मालिका भारतीय टेलिव्हिजन सृष्टीतील पहिली हिट मालिका ठरली,आजही हि मालिका लोकांच्या मनात घर करून आहे.१९९० साल येईपर्यंत भारतामध्ये साधारणतः ३४५० पेक्षा जास्त केबल टीव्ही networks होते जे प्रामुख्याने मुंबई,दिल्ली, कोलकता,चेन्नई या ४ विभागात विखुरले गेले होते.

        १९९१ साली केबल नेटवर्क सॅटेलाईट शी जोडलं गेल्यामुळे CNN,BBC,Star Tv या सारख्या चॅनल च भारतात प्रक्षेपण सुरु झालं,आणि याच वर्षी भारतातील लोकांना या चॅनेल्स च्या माध्यमातून "पर्शियन गल्फ वॉर" च थेट प्रक्षेपण बघता आलं.

        १९९२ साली भारतातील पहिल्या खासगी हिंदी चॅनेल ची म्हणजेच "झी टीव्ही" ची सुरुवात झाली.

        १९९३ साली १०बॉम्बस्फोटाच्या शृंखलेमूळे मुंबई अक्षरश: हादरून गेली,या स्फोटांमध्ये  ३१७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.याच वर्षी म्हणजे १९९३ साली संजय दत्त याना बेकायदेशीरपणे AK-५६ रायफल बाळगल्यामूळे "TADA ACT" या कायद्याखाली अटक करण्यात आली आणि यातून बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड मधले एक एक संबंध उघड व्हायला सुरुवात झाली.१९९३ साली रिलिज झालेल्या सुभाष घाई दिग्दर्शित "खलनायक" चित्रपटमधल्या "चोली कि पीछे" या गाण्यातील बोलांमुळे वादंग निर्माण झाला,या चित्रपटात संजय दत्त यांची प्रमुख भूमिका होती.

       १९९४ साली जुरासिक पार्क हा हॉलिवूड चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला आणि त्यावेळी त्याने १२ कोटींच्यावर कमाई केली,हि आत्तापर्यंत डब चित्रपटाने केलेली सगळ्यात मोठी कमाई होती ,त्याच वर्षी अनेक हॉलिवूड चित्रपटांनी चित्रपट हिंदी मध्ये डब करून रिलिज केले पण त्या कोणालाच जुरासिक पार्क एवढी कमाई नाही करता आली.

        १९९४ साली प्रदर्शित झालेला "हम आपके है कौन" हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या आत्तापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला ,या चित्रपटाने 67 कोटींची कमाई केली. याच वर्षी म्हणजे १९९४ साली शेखर कपूर दिग्दर्शित "बँडीट क्वीन" या चित्रपटावर सेन्सॉर नि बंदी घातली.

🎥© मिहीर कुलकर्णी

Sunday, 19 February 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५

भाग ७ (शेवटचा भाग) :-

        आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची उत्सुकता किंवा धाकधूक असते तेव्हा आपल्याला गाढ अशी झोपच लागत नाही असेच काहीस आज माझ्यासोबत पण झालं,एरव्ही किमान एकदा तरी अलार्म snooz करायला लागणारा मी आज चक्क गजर वाजण्याच्या आधी उठून मी अलार्म क्लॉक वर टॅप करून गजर बंद केला ,त्यानंतर आवरून चहा वगरे पिऊन झाल्यानंतर पेपर वाचत बाल्कनी मध्ये बसलो,खरतर पेपर मधल्या बातम्या मी वाचत होतो पण माझ्या डोक्यात आज नक्की काय काय करायचं याचेच विचार घोळत होती शेवटी काहीतरी ठरवून मी इतर कामात परत गुंतलो. तिला एकदा मेसेज करून आज संध्याकाळी ती येणार आहे की नाही कन्फर्म केलं..

       सूर्य मावळतीला आल्यावर अकष्ट पसरलेल्या तांबूस सूर्यकिरणांनी आसमंत सारा एका सुंदर निसर्गचित्राप्रमाणे दिसत होता,अर्थात हे खरंच असं होत की मी प्रेमात पडल्यामुळे मला असं वाटत होत हे मात्र सांगणं कठीण आहे.मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तर तिथे ती माझ्या आधीच येऊन पोहोचली होती ती ही बऱ्यापैकी तयार होऊन,तिला बहुतेक कल्पना आली असावी असं मला वाटलं ,त्यामुळे मी अजूनच आनंदून गेलो होतो.मी तिच्या जवळ जाऊन हाय हॅलो वगरे झाल्यानंतर तिला म्हणलं चल चालत चालत गप्पा मारुया यावर ती लगेच तयार झाली आणि मग आम्ही तिथे असलेल्या ट्रॅक वरून चालत चालत गप्पा मारु लागलो ,मी गप्पा मारत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होतो , तिच्या चेहऱ्यावरच्या भावाचं वर्णन करण्यासाठी मी च काय आणि कोणीही असत तर त्याला देखील शब्दांची कमतरता भासली असती.मग बोलता बोलता तिने मला विचारलं ,"काय रे अजूनही कविता वगरे करतो का?" "हो पण ,मध्यंतरी आणि कामाच्या व्यापामुळे सुचतीलच असं नाही",मी उत्तरलो "मग एकव कि एखादी" यामुळे तर मला खूपच आनंद झाला,त्यावर मी तिला म्हणालो "ऐक"
        "तुझ्याविना जगणे
         आता आता कुठे
         जमू लागले होते,
         तुझ्या परतण्याने
         जगणं सुखकर झालं."
हे ऐकून ती काहीशी स्पीचलेस झाली ,नंतर मी हीच संधी मानून तडक तिला प्रपोज करून टाकलं,या अचानक पडलेल्या गुगली ची मात्र तिला आधीच कल्पना असावी त्यामुळे ती म्हणाली...
.....................................

"म्हणाली" लिहीत असतानाच लेखकाच्या पेनाचं टोक तुटलं,तस कथा लिहिण्यात व्यस्त असलेला त्याने तुटलेल ते पेन रागाने फेकून दिलं आणि दोन्ही हातानी बोटं एकमेकांत अडकवून दोन्ही हातांना जोरात ताण देऊन खुर्चीवर मागे टेकून छताकडे बघत शरीराला थोडी विश्रांती दिली ,तोच शेजारी असलेला त्याचा फोन एकदम vibrate झाला त्याने चेक केलं तर तिथे कुठल्यातरी मुलीचा "Yes" असा मेसेज आला होता ,हा मेसेज पाहून त्याला इतका आनंद झाला की त्याने तो लिहीत असलेली कथा अर्धवट च सोडली कारण तो लेखक खऱ्या आयुष्यात आज जिंकला होता वास्तविक लेखक दरवेळी जिंकेलच असं नसत पण आज तो जिंकला होता ,आणि त्यामुळेच याच काय त्याच्या पुढील कित्येक कथांचा शेवट हा सुखद च असणार होता..

अशाच ज्या लोकांच्या कथा फक्त त्यांच्या डायरीपुरत्याच मर्यादित राहिल्या अश्या सर्वांना माझी ही कथा समर्पित

(समाप्त)

©मिहीर कुलकर्णी

Saturday, 18 February 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५

भाग ६ :-
       
         रेस्टॉरंट मध्ये माईल्ड असं म्युझिक लावलं होत त्यावर सूप पिता पिता अलगद नकळत तिच्याकडे बघत पण हे सगळं तिला कळूनही तिच्या चेहऱ्यावर कळत नसल्याचे भाव मला खूप आपले वाटत होते. खरतर आम्ही इतक्या वर्षानी तिऱ्हाईतासारखं भेटून सुद्धा काही क्षणात आम्ही अधिसारखे एकमेकांना आपलं करून टाकलं होतं,आणि तशा तर आम्ही दोघेही कर्तृत्ववान होतो त्यामुळे अजूनच उर भरून येत होता.सुप पिऊन झाल्यानंतर मी नकळत तिला तिच्या सध्याच्या स्टेटस बद्दल विचारलं ,म्हणजे ती सध्या married आहे की enggaged हे विचारलं त्यावर तिने सांगितलं की "घरच्यांनी तीच लग्न लावण्यासाठी तिला खूप फोर्स केला होता आणि तिला हे सगळं टाळता येणं खूप अवघड होत शिवाय,तिला स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी करून दाखवायचं होत,हे इंटिरिअर फर्म वगरे हे त्याचंच द्योतक होत म्हणून तिने सोडून गेल्याच सांगितलं. तीच लग्न झालेले नाही हे ऐकून वर्षभर पाणी घालून निगा राखल्यानंतर पहिलं पीक हाती आल्यावर जसा आनंद होत असेल तसा काहीसा आनंद मला झाला होता.पण आजच्या दिवशीची खंत हीच होती की आम्हाला दोघांनाही झालेला आनंद एकमेकांना दाखवता येत नव्हता,त्याच क्षणी माझ्या मनात विचार आला की अत्ता या क्षणी तिला प्रपोज करावं...

        पण कस करणार पुन्हा गेल्यावेळी सारखं तिने नकार दिला तर काय करा शिवाय अत्ता आपण अश्या सोशल स्टेज ला आहोत की तिथे हे प्रपोज वगरे अन ते हि खुलेआम हि गोष्ट बरोबर दिसणार नाही,म्हणून योग्य वेळकाळ बघून मी काय ते बघू असं मनोमन ठरवलं.तिनेही मग मला माझ्या स्टेटस बद्दल विचारलं त्यावर मी देखील का लग्न केल नाही वगरे याची इतर लोकांना देत असलेली पेटंट कारणं तिला सांगितली,कर्तृत्ववान लोकांच्या बाबतीत एक गोष्ट असते की त्यांनी दिलेली कारण खोटी असली तरी ती लोकांना पटू शकतात. बोलता बोलता तिने हळूच खोचक प्रश्न विचारला,

"कोणाची वाट बघत होता इतके वर्ष?'"

यावर "तुझीच" असं म्हणायचा माझा खूप मोह झाला क्षणभर तोंडातदेखील आला होता पण मी नंतर कसाबसा सावरला.मग मी पण तिला तिच्या लग्नाच्या प्लॅनिंग बद्दल वगरे विचारलं त्यावर तिने "सध्या स्थळ शोधतेय" असा रिप्लाय दिला,यामुळे तर मला आनंदाला पारावर च उरला नव्हता ,एवढं सगळं बोलून मग आम्ही तिथून निघायचं ठरवलं आणि पुन्हा गाडीत बसल्यावर मी पुढच्या भेटीत तिला प्रपोज करायचा निर्णय घेतला. तिची गाडी होती त्या ठिकाणी तिला सोडल्यानंतर ,ती  गाडीतून उतरली आणि गाडीच्या काचेतून मला 'बाय' करण्यासाठी खाली वाकली तोच लगोलग मी तिला ,"पुन्हा कधी भेटशील,आज खूप मजा आली , पुन्हा  भेटूया ,अजून मजा करू " वगरे अशे पेटंट डायलॉग मारले. त्यावर ती 2 दिवसांनी भेटू असं म्हणाली ,हे ऐकल्यावर तर माझ्यात अजूनच उत्साह निर्माण झाला . मी तडक घरी आलो खरं तिला प्रोपोज कस करायचं ? काय बोलायचं? या सारख्या अनंत विचारांनी मला त्या दिवशी अक्षरश: झोपच लागली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी ऑफिस मध्ये येणार नाही असं मॅनेजर ला सांगितलं आणि या दिवसात मी प्रोपोज करायची खुपदा प्रॅक्टिस केली,अनेक व्हिडिओस बघितले ,असंख्य गोष्टी केल्या,आता प्रतीक्षा होती ती त्या दिवसाची जो उद्यावर आला होता...

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

Thursday, 16 February 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५


भाग ५ :-

        काल खरतर मी तिला भेटायला बोलवल्यानंतर तिने हो नाही करत संमती दिली होती,पण ती नक्की येईल की नाही याबद्दल मी साशंक होतो ,पण मला कुठे ना कुठे वाटत होत की ती येईल कारण जशी मला उत्सुकता होती तशी तिलाही असणारच! म्हणून आज भेटल्यावर काय काय अन कसं कसं बोलायचं याच विचारात मी सकाळी उठल्यापासून दिवसभर गुंगून गेलो होतो. अखेरीस संध्याकाळ जशी जशी होऊ लागली तसा माझ्या पोटात गोळा आल्यासारखं काहीतरी होऊ लागलं , भेटीमुळे सहसा असं होत असावं,म्हणून मी शक्य तितकं नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केला. एरवी माणूस कितीही अजागळ राहत असला तरी कोणत्याही मुलीला भेटायला जायचं म्हणलं कि तो शक्य तितकं चांगलं दिसायचा आवरण्याचा प्रयत्न करतो ,या ला मीही अपवाद नव्हतोच त्यामुळे मी सुद्धा व्यवस्तीत आवरून ठरलेल्या बागेत वेळेच्या आधीच पोहोचलो...

        संध्याकाळची पण तरीही अजून मावळतीला न आलेली अशी ती वेळ होती ,मी बागेच्या एका कोपऱ्यातील बाकड्यावर बसून एक पाय दुमडून दुसऱ्या पायावर ठेवून ऐटीत हातातल्या घड्याळात एकदा आणि नंतर समोर खेळत असलेल्या लहान मुलांकडे बघत होतो, आणि त्यांची निरागसता,खोडकरपणा बघून नकळत मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवून गालातल्या गालात किंचित हसत होतो ,अन त्या मुलांचा बॉल चुकून खेळता खेळता माझ्याकडे आला आणि मी तो त्यांच्याकडे टाकायला हळूच खाली वळून बॉल उचलणार तेवढ्यात खाली वाकलेलो असताना मला तिथे हिल्स घातलेले पाय थांबलेले दिसले म्हणून मी वर बघितलं तर तिथे ती होती ते बघून मला दोन मिनिटं मी स्वप्न बघतोय कि काय अस वाटत होत पण नंतर तो चिमुकला बॉल मागायला माझ्याकडे आल्यानंतर मी भानावर आलो आणि तिला बाकड्याकडे हात दाखवून बसायची खूण केली.खरतर मला त्या दिवशी मी भरपूर काही कमावलं असं वाटत होत पण त्याचवेळी आज तीच इथे असण्यासाठी मला करावी लागलेली मेहनत हि मला विसरून चालणारी नव्हती... ती बाजूला बसल्यानंतर मी  फक्त तिच्याकडे  पाहत होतो..आणि पाहत असताना मला आमचा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर फिरत होता एकीकडे तीच ते सौंदर्य आणि भूतकाळ या दोन्हींच संतुलन साधण्यात माझी त्रेधातिरपीट होत होती आणि कदाचित माझ्या चेहऱ्यावरून ती तिला कळली असावी..

"आलीस!"
"हो,पण असं का विचारलं?"
"मला वाटलं होतं कि.."
"काय वाटलं होतं?
"कि तू नाही येणार पण आलीस,बरं वाटलं"
"ये ये बस बस"

या संवादानंतर आम्ही तिथेच एका बाकावर बसलो ,थोडावेळ पुन्हा एकदा आम्हाला काय बोलावे कळेना पण मग शेवटी तिनेच माझ्या मधक्या करिअर बद्दल वगरे विचारायला सुरुवात केली,मग मी पण ती इंजिनीअर असून इंटिरियर वगरे कसं करायला लागली वगरे याबद्दल विचारणा केली आणि मग थोडावेळ हे सगळं बोलल्यामुळे आमच्यात किंचित मोकळेपणा येऊ लागला होता आणि मग आम्हाला दोघांनाही भूक लागल्यामुळे आम्ही कुठल्यातरी हॉटेल मध्ये जाऊया असं ठरवलं आणि माझ्या गाडीतून तिथून जवळच अश्या पण खूप वेळ बसू देत अश्या हॉटेल मध्ये जाऊन पोहोचलो. आम्ही हॉटेल मध्ये पोहोचेपर्यंत साधारणतः जेवणाची वेळ जवळपास होतच अली होती त्यामुळे आम्ही जेवण ऑर्डर केलं आणि पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या ,मी तिला तिच्या अचानक गायब होण्याचं कारण विचारलं तेव्हा ती काही काळ गप्प राहिली,मला वाटलं की तिला बहुतेक उत्तर द्यायचं नाहीये म्हणून मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण थोड्यावेळाने ती नॉर्मल झालेली बघून मग आम्ही परत गप्पा मारायला सुरु केल्या.. पणतो प्रश्न तिने का टाळला मला अजूनही नाही कळलं आणि मग मी ठरवलं की आज काहीही झालं तरी या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवायचंच ...

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५


भाग ४ :-

        मी भानावर येताक्षणी तत्काळ आधी खुर्चीवर बसून घेतलं आणि नंतर तिच्या परवानगीने दोन कॉफी ऑर्डर केल्या ,खरतर कॉफी येईपर्यंत आम्हाला दोघांनाही खूप Akward झाल्यासारखं होत होतं पण आमच्याकडे दुसरा पर्याय हि नव्हता, तेवढ्यात पूर्वीप्रमाणे माझ्या डोक्यात वेळ मारून नेण्याच्या अनेक कल्पना सुचू लागल्या आणि मग त्यातली एक कल्पना म्हणून मी ," आमच्या ऑफिस च्या इंटिरियर च्या डिझाइन चा विषय काढला त्यावर तिलाही जरा रिलॅक्स वाटलं असावं आणि मग तिनेही डिझाइन्स वर बोलायला सुरुवात केली आणि तेवढ्यात आमच्या कॉफी हजर झाल्या...

       मी बोलता बोलता त्यांच्या आसिस्टंट ला डिझाइन कसं समजवून सांगता आलं नाही इथपासून ते माझ्या सगळ्या इंटिरियर विषयीच्या आयडियांपर्यंत सगळं बोललो असेन, खरतर मेन मुद्दा सोडुनीतर गोष्टींवर तास तास बोलून समोरच्याला वीट आणण्याच्या माझ्या सवयीविषयी तिला माहिती होतीच पण आता ती सवय मोडली देखील असू शकते? काय माहित अश्या अनेक प्रश्नाचं काहूर पुन्हा माझ्या मनात माजू लागलं खरतर कॉफी घेता घेता मला तिच्याशी खूप काही अन भूतकाळाबद्दल बोलायचं होता असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवायची होती पण आता तो विषय कसा काढणार ? हा हि प्रश्न होताच आणि शिवाय हीच सध्याचं काय स्टेटस आहे हे सुद्धा माहिती नव्हतं, म्हणून मी तूर्तास तरी तो विषय बोलायचं टाळलं आणि पुन्हा डिस्कशन मध्ये रमलो. थोड्यावेळानंतर माझ्या मनातील सर्व आयडिया तिला समजल्यानंतर आणि तिच्या सुचनांचं निरसन झाल्यानंतर आता वेळ आली होती ती म्हणजे एकमेकांचा निरोप घेण्याची ,खरतर मला तिला जाऊ नको असच म्हणायचं होतं, पण कसं म्हणणार?जेव्हा आमची सगळी बोलणी आणि कॉफी संपली तेव्हा ती "ऑल राईट" म्हणून उठली आणि दरवाज्याकडे जायला वळाली.

"का गेलीस तेव्हा सोडून?"

" हा मागापासून मी तुला अन तू मला न ओळखण्याचा हा अभिनय जो आपण करतोय ना ,तो खूप जिव्हारी येऊ लागलाय आताशा माझ्या म्हणून न राहवून बोललो"

"हे सगळं बोलायची हि जागा नाही" ती म्हणाली

"मग तू सांग कुठे भेटायचं ?,पण यावेळी मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत आणि किंबहुना तू आता काहीही न सांगता गायब व्हायचं नाहीयेस" असं मी म्हणालो.

       नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी कुठं भेटायचं या साठीच्या ठिकाणांचा विचार केला पण कॅफे किंवा हॉटेल्स मला या गोष्टींसाठी योग्य वाटत नव्हते आणि त्यामुळे मी तिला एका बागेत भेटण्यासंबंधी विचारणा केली,तीने देखील अनेक आढेवेढे घेत ,कामाची कारणं सांगत नकार देण्याचा प्रयत्न केला पण तिलाही भेटीचा मोह होताच हे मला एव्हाना तिच्या वागण्याबोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होतं आणि त्यामुळे आम्ही एका बागेत भेटायचं ठरवलं आणि आजच्या दिवशी बरच काही मिळल्यासारखं फीलिंग मला येऊ लागलं होतं आणि या वेळी मात्र माझ्याकड बोलण्यासारखं तिला विचारण्यासारखं खूप काही होत ,आता फक्त प्रतीक्षा होती ती तिला भेटण्याची....

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

Wednesday, 15 February 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५

भाग ३ :-

       खरं म्हणाल तर मी कामात असल्याचा फक्त अभिनय करत होतो कारण असे काहीसं दाखवलं कि समोरच्या व्यक्तीला थोडं दबल्यासारखं होत आणि मग साहजिकच आपण खूप बिझी आहोत असं त्या व्यक्तीला वाटायला लागतं असं मला वाटत पण किंबहुना हि माझ्या मनाला मी घातलेली समजूत असते किंवा अजून काही कोण जाणे..

       मग मी शेवटी मनात शक्य होईल तेवढी दाटलेली उत्कंठता दाटवून पण त्याचे कोणतेही भाव चेहऱ्यावर तसूभरही दिसणार नाहीत किंवा दिसत तर नाहीत ना याची कॉम्पुटर स्क्रीन वर दिसणाऱ्या प्रतिबिंबातून खात्री झाल्यावर ,मी एकदाच त्या मुलीकडे बघितलं पण मला वाटलेलं तस काही काही झालं नाही म्हणजेच ती मुलगी मला जी हवी ती नव्हतीच आणि मग मात्र सगळी दाटलेली उत्कंठता वगरे क्षणार्धात ओसरली आणि मग ती आणि मी त्यांच्या फर्म  ने काही सॅम्पल डिझाइन्स बनवले होते त्यावर चर्चा करू लागलो , पण तिच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून ती नवीनच या क्षेत्रात आलीये हे मला स्पष्टपणे जाणवत होतं आणि इतर नवीन लोकांप्रमाणे तिला व्यवस्तीथ पणे प्रेझेंटेशन देता येत नव्हतं हे हि मला समजू लागलं होत पण नवीन असल्यामुळे मी तिला संभाळून घेत होतो पण तिने दाखवलेले डिझाइन्स मला काही केल्या पसंद पडत नव्हते आणि मी सांगितलेल्या सूचना किंवा आयडिया तिला निटश्या समजणार नाहीयेत हे मला एव्हाना कळून चुकलं होत त्यामुळे त्यात वेळ वाया न घालवता तिच्या सर किंवा मॅडम कोण असतील त्यांच्याशी मी डायरेक्ट बोलतो असं सांगून मी तिला निरोप दिला आणि मग मी थोडासा उसासा टाकला. खरतर माझ्या मनात निर्माण झालेली एक छोटीशी पण मला महत्वाची वाटलेली अशी एकमात्र आशा अशी क्षणार्धात अनंतात विलीन होईल असं माझ्या स्वप्नातही नव्हतं किंवा मी च अवास्तव स्वप्नरंजन करत होतो असे वाटल्यामुळे माझा मूड थोडा उदासीन झाला होता, अश्यावेळी मला गेले काही वर्षे नेहमी आधार असतो तो म्हणजे संगीताचा आणि मी तडक माझ्या लॅपटॉप वरील रिलॅक्स होईल अशी काही गाणी लावली त्यामुळे माझा मूड हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला होता. खरतर हि गाणी ऐकण्याची सवय मला मी मध्यंतरी अमेरिका मध्ये एक वर्षासाठी गेलो असताना लागली. मला आजही आठवत कि पेंसल्व्हेनिया स्टेट मधल्या "किंग ऑफ प्रशिया" या छोट्याश्या शहरात मी राहत होतो आणि तिथे मराठी तर सोडाच पण भारतीय लोकांची अशी फारशी घर नव्हतं यामुळेच काहीतरी विरंगुळा हवा म्हणून मी गाणी ऐकायची सवय स्वतःला लावून घेतली आणि त्याचा मला खूप फायदा पण झाला..

      गाणी ऐकत असतानाच माझ्या डेस्क वरचा लँडलाईन पुन्हा एकदा खणखणला आणि मी तो उचलल्यावर  मॅनेजर नी त्या इंटिरियर डिझायनिंग फर्म च्या हेड सोबत आज संध्याकाळी ५ वाजता मिटिंग फिक्स झाल्याचं मला सांगितलं आणि त्याने कुठल्यातरी हॉटेल च ठिकाण देखील मला मिटिंग साठी सांगितलं. ठरल्यावेळेच्या आधीच काही वेळ आपण जाऊन पोहोचायचं हि सवय सुद्धा अमेरिका वास्तव्याचंच फलित म्हणायला हरकत नाही कारण तिथे मला काहीच काम नसायचं आणि विरंगुळा पण व्हायचा म्हणून मी सगळ्या मीटिंग्स ना थोडं आधीच जायचो त्यामुळे मला त्या जागेची पहाणी सुद्धा करता यायची आणि तेवढाच फावल्या वेळात मला घरी बसण्यापेक्षा विरंगुळा व्हायचा. त्यामुळे ठरलेल्या वेळेच्या जवळपास १५-२० मिनिटे आधीच मी ठरलेल्या हॉटेल ला पोहोचलो होतो आणि त्यांना यायला वेळ असल्यामुळे मी हॉटेल च्या वेटिंग लॉबी मध्ये तिथे असलेले मॅगझीन्स वाचत बसलो होतो तितक्यात मॅगझीन वाचता वाचता माझी नजर तिथल्या कॉफी शॉप कडे जाणाऱ्या एका महिलेकडे गेली आणि का कोण जाणे ती तीच आहे असं मला वाटलं पण तिच्या मागे जाण्यात काही अर्थ नव्हता आणि परत ती ती नसली तर उगीच पंचाईत व्हायची म्हणून मी गप्प बसलो तितक्यात माझा फोनची रिंग वाजली आणि त्यात एक महिला बोलत होती नंतर मला समजलं की ती फर्म ची हेड आहे आणि ती कॉफी शॉप मध्ये टेबल नंबर 7 वर बसली आहे ,मी तिला 5 मिनिटात येतो असं सांगून फ्रेशन होऊन मी कॉफी शॉप मध्ये गेलो खरतर त्या महिलेला मी ओळखत नव्हतो आणि आत जवळपास २-३ टेबल वर एकच मुलगी असे अनेक टेबल होते त्यातला टेबल नंबर ७ कोणता हे मला माहित नव्हतं तेव्हा मी तिथल्या मॅनेजर ला टेबल नंबर ७ कुठाय अशी विचारणा केली आणि त्याने बोट करून एका टेबल कडे इशारा केला तर तिथे एक मुलगी पाठमोरी बसलेली होती आणि मी तिच्याकडे गेलो आणि तिच्या कडे जाऊन बघितलं आणि त्यावेळी मात्र अक्षरश मला पारावर राहिला नव्हता कारण ती तीच होती..होय तीच इंटिरियर फर्म ची हेड.. माझ्या मनाला लागलेली कुणकुण आणि "किसी चीझ को .. " वाला सिद्धांत दोन्ही खरा असल्याची जाणीव आणि अभिमान मला तक्षणी वाटला आणि मला बघितल्यावर देखील तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरड्याने रंग बदलावा तसे क्षणार्धात बदलले आणि मी तसाच उभा होतो आणि काही वेळ आम्ही दोघेही एकमेकांशी काहीच बोललो नाही कारण आम्हाला दोघांनाही हा एक धक्काच होता आता हा धक्का सुखद होता की दुःखद ते मात्र आमचं बोलणं झाल्यावरच कळणार होत...

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...