Saturday, 11 February 2017

कथा :- फ्रेंडship सिझन ५

भाग १ :-

           कॅम्पस प्लेसमेंट च्या दिवशी ती ओझरती दिसल्यानंतर त्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट परत कधी झालाच नाही असं म्हणलं तरी हरकत नाही कारण नंतर मी खूप प्रयत्न केला तिला कॉन्टॅक्ट शोधायचा किंवा ती कुठेय? अचानक काय झाला तिला? आम्ही बोलतो हे तिच्या घरच्यांना कळलं का? कि आणि काय झालं? अश्या असंख्य प्रश्नाचं काहूर माझ्या मनात त्यावेळी वाजलं होत पण माझ्याकडे त्या कडे दुर्लक्ष करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मी शक्य तिथे आणि शक्य त्यांना विचारून चौकशी वगरे करण्याचा प्रयत्न केला पण फारशी अशी काही माहिती मिळाली नाही अन मग मात्र मी अक्षरश: कोळमडून पडलो इतका कि जवळपास एक महिना मी काय केलं हे आजसुद्धा मला आठवत नाही मी नीट जेवलो नाही,त्रास करून घेतला , एक महिनाभर खूप त्रास झाला असे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आणि मग मात्र मी यातून बाहेर पडायचं ठरवलं आणि मग मात्र मी माझं लक्ष अभ्यासात रमवल आणि शेवटची सेमिस्टर देऊन इंजिनिअरिंग ची डिग्री पदरात पाडून घेतली आणि नोकरी ती तर मला कॅम्पस प्लेसमेंट मधूनच मिळाली होती आणि मग मी नोकरी ला काही दिवसातच जॉईन झालो..

        नोकरीला जॉईन झाल्यावर कंपनी ने सुरुवातीच्या काळात मला पुणे नंतर काही दिवस बेंगलोर आणि नंतर 1.5 वर्षासाठी अमेरिका ला पाठवला आणि मी माझं सर्व लक्ष माझ्या कामात लावून त्यात प्रगती करायचं ठरवलं आणि काहीसं तस केलं देखील अवघ्या 6 वर्षात मी मुंबई मध्ये माझी स्वतःची कन्सल्टन्सी फर्म चालू केली ,खरतर मी घेतलेली हि गरुडझेपच होती असे म्हणायला हरकत नव्हती आणि मग मी नव्या ऑफिस साठी जागा बघायला चालू केली. अनेक जागा पाहिल्यानंतर मला एक जागा पसंद पडली आणि मग मी ती फायनल करून अग्रीमेन्ट वगरे सगळे सोपस्कार यथातथा पार पडल्यानंतर मला मी त्या ऑफिस ला माझ्या स्वप्नाप्रमाणे म्हणजे मला जस लहानपणापासून इच्छा होती तस इंटिरियर करून घ्यायचं होत आणि हे काम कोण करणार याची जबाबदारी मी माझ्या मॅनेजर वर टाकली आणि त्यानेपन लवकरच काही डिझाइन घेऊन डिझायनर ला घेऊन येतो अस सांगितलं.

        नंतर त्या ऑफिस च्या बाल्कनी मध्ये कॉफी पित मी उभा असताना मला समोरच्या बाजूला असलेल्या कॉफी शॉप मधून एक जोडपं बाहेर येताना दिसलं आणि त्यांची चाललेली मजामस्ती पाहून मला क्षणार्धात मागच्या सगळ्या गोष्टी आठवल्या ,खरतर कित्येकदा एखादा क्षण आपल्याला साऱ्या भूतकाळाची आठवण करून द्यायला पुरेसा असतो असं म्हणतात अन त्यावेळी मला ते पटलं देखील.

        त्यानंतर मी बाल्कनी मध्ये उभारून कॉफी चा एक एक घोट घेत घेत मी सगळ्या गोष्टी आठवू लागलो आणि जश्या जश्या एक एक गोष्टी आठवू लागलो तसं तसं माझ्या मनात  नकळत सध्या ती कुठे असेल? काय करत असेल ? तिच्या घरच्यांनी तीच लग्न लावून दिल असेल का? अश्या प्रश्नाचं काहूर माजू लागलं आणि आता मला पुन्हा तिची भेट व्हावी असं खूप तीव्रतेने वाटू लागलं पण एक अडचण होती की आता तिचा शोध कसा आणि कुठे घ्यायचा ? मग मी माझ्या कॉन्टॅक्ट मधर असलेल्या आमच्या काही कॉमन फ्रेंड्स ना विचारलं पण त्यांच्याकडून काही समजलं नाही मग मी जाऊदे तो विषय असं म्हणून माझ्या मनाला समजवायचा प्रयत्न केला पण तो फोल ठरू लागला आणि असच एके दिवशी रात्री मला माझ्या मॅनेजर चा फोन आला की त्याने एका फर्म सोबत इंटेरिअर साठी बोलाचाली केल्या आहेत आणि त्या फर्म चे लोक उद्या आपल्या ऑफिस मध्ये पुढच्या बोलणी करण्यासाठी येणार आहेत आणि मग मी ठीक आहे म्हणून झोपून गेलो ते पुन्हा तिच्याच आठवणींमध्ये रममाण व्हायला ...

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...