Wednesday, 1 February 2017

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पान ५ कालखंड १९७१-१९८०


           एक दोन नव्हे तर तब्बल ४३३ चित्रपटांची निर्मिती होऊन १९७१ साली भारतीय चित्रपटसृष्टी जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी ठरली ,ती परंपरा आजही कायम आहे. १९७१ साली भारत सरकार आणि "The Motion Pictures Export Association of America (MPEAA)" यांच्यातील करार संपुष्टात आला, याचा परिणाम असा झाला की फिल्म सेन्सॉर होण्याची संख्या इतकी घटली कि १९७२ मध्ये ११४ , १९७३ मध्ये ३८ आणि १९७४ मध्ये ती संख्या २६ वर आली,हि बाब चिंताजनकच होती.

        १९७२ साली बॉम्बे मध्ये टेलिव्हिजन ची सुरुवात झाली,आणि हळूहळू टेलिव्हिजन युगाची नांदी सुरु झाली असं म्हणायला हरकत नाही तसेच याच वर्षी फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन तर्फे पहिल्या "आर्ट हाऊस सिनेमा" ची सुरुवात करण्यात आली.

        १९७३ साली "फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन" हि "raw stock" आयातीवर नियंत्रण ठेवणारी कायदेशीर संस्था बनली तसेच या वर्षीपासून Raw stock वर २५०% आयतकर लावण्यात आला.याच वर्षी म्हणजे १९७३ साली "अमिताभ बच्चन" यांची "अँग्री यंग मॅन" इमेज निर्माण करणारा "जंजिर" हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो प्रचंड यशस्वी देखील ठरला. "फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया" आणि "टीव्ही ट्रेनिंग सेंटर " यांच्या एकत्रीकरणातून १९७४ साली Film and Television Institute Of India (FTII) ची स्थापना करण्यात आली आजही हि चित्रपटनिर्मिती च शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य संस्था आहे. १९७४ साली प्रदर्शित झालेल्या शाम बेनेगल दिग्दर्शित "अंकुर" या चित्रपटाच्या यशामुळे वेगळ्या पद्धतीच्या चित्रपट नीर्मितीला चालना मिळाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

         १९७५ साल खऱ्या अर्थाने ज्या चित्रपटाने गाजवलं तो चित्रपट म्हणजे  "रमेश सिप्पी" दिग्दर्शित "शोले" या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले यातले काही विक्रम तर आजही कोणत्या चित्रपटाला मोडता आले नाहीत.याच वर्षी म्हणजे १९७५ साली   Motion Pictures Association Of America सोबत फिल्म्स च्या आयतनिर्यातीसंबंधी नवीन करार गेला आणि ह्या करारामुळे चित्रपटसृष्टीला बऱ्यापैकी दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि १९७५ हे वर्ष भारतीय राजकारणातील सुद्धा एक महत्वाचा वर्ष ठरलं कारण याच वर्षी भारतामध्ये "आणीबाणी" जाहीर करण्यात आली जी तब्बल १९ महिने होती.

       १९७६ साली संजय गांधी यांच्या काही कार्यकर्त्यांनी "अमृत मेहता" यांच्या "किस्सा कुरसी का" या चित्रपटाच्या negative जाळून टाकल्या ,हा चित्रपट आणीबाणी वर उपरोधीकपणे भाष्य करणारा चित्रपट होता.१९७७ साली अखेरीस आणीबाणी मागे घेण्यात आली,आणि लोकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली, याच वर्षी तामिळ सिनेमा चे सुपरस्टार "एम.जी रामचंद्रन" हे तामिळनाडू चे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकाळात तामिळ फिल्म्स ना मिळणाऱ्या भरपूर अनुदानामुळे तामिळ चित्रपटसृष्टीचा चित्रपत्नीर्मितीचा वेग आणि उत्पादन वाढण्यास मदत झाली. १९७८ सालापासून अनेक राज्य सरकार जसे ओरिसा,आंध्र प्रदेश,तामिळनाडू यांनी शहरी व निमशहरी भागात चित्रपटगृहांच्या बांधकामाला अर्थसहाय पुरावण्यापासून ते अनेक प्रकारची मदत करणाऱ्या योजना अंमलात आणायला सुरुवात केली.

       १९७९ साली १२३ पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होऊन मल्याळम चित्रपटसृष्टींने हिंदी चित्रपटसृष्टीला मागे टाकले याच प्रमुख कारण म्हणायचं झाल्यास केरळ सरकारचे अनुदान आणि बाहेरच्या देशात काम करणाऱ्या मल्याळी कामगारांनी त्यांच्या कुटुंबियांना पाठवलेले भरगोस पैसे असंही सांगितलं गेलं.

       १८ जुलै १९८० साली दूरदर्शन ने पहिलं कलर प्रसारण याच दिवशी केलं,तत्कालीन काँग्रेस आय सरकारच्या वचननाम्यातील ते एक महत्वाच आश्वासन होत. १९८० सालीचा फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन आणि मोशन पिक्चर्स असोसिएशन च एकत्रीकरण होऊन "National Film Development Corporation" (NFDC) ची स्थापना करण्यात आली तसेच याच वर्षी खास नियुक्त करण्यात आलेल्या समितीने तयार केलेला नॅशनल फिल्म पॉलिसी वरचा रिपोर्ट सरकारला सोपवण्यात आला पण यातील सगळ्या सुचनांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले.

🎥© मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...