भाग ६ :-
रेस्टॉरंट मध्ये माईल्ड असं म्युझिक लावलं होत त्यावर सूप पिता पिता अलगद नकळत तिच्याकडे बघत पण हे सगळं तिला कळूनही तिच्या चेहऱ्यावर कळत नसल्याचे भाव मला खूप आपले वाटत होते. खरतर आम्ही इतक्या वर्षानी तिऱ्हाईतासारखं भेटून सुद्धा काही क्षणात आम्ही अधिसारखे एकमेकांना आपलं करून टाकलं होतं,आणि तशा तर आम्ही दोघेही कर्तृत्ववान होतो त्यामुळे अजूनच उर भरून येत होता.सुप पिऊन झाल्यानंतर मी नकळत तिला तिच्या सध्याच्या स्टेटस बद्दल विचारलं ,म्हणजे ती सध्या married आहे की enggaged हे विचारलं त्यावर तिने सांगितलं की "घरच्यांनी तीच लग्न लावण्यासाठी तिला खूप फोर्स केला होता आणि तिला हे सगळं टाळता येणं खूप अवघड होत शिवाय,तिला स्वतःच्या पायावर उभा राहून काहीतरी करून दाखवायचं होत,हे इंटिरिअर फर्म वगरे हे त्याचंच द्योतक होत म्हणून तिने सोडून गेल्याच सांगितलं. तीच लग्न झालेले नाही हे ऐकून वर्षभर पाणी घालून निगा राखल्यानंतर पहिलं पीक हाती आल्यावर जसा आनंद होत असेल तसा काहीसा आनंद मला झाला होता.पण आजच्या दिवशीची खंत हीच होती की आम्हाला दोघांनाही झालेला आनंद एकमेकांना दाखवता येत नव्हता,त्याच क्षणी माझ्या मनात विचार आला की अत्ता या क्षणी तिला प्रपोज करावं...
पण कस करणार पुन्हा गेल्यावेळी सारखं तिने नकार दिला तर काय करा शिवाय अत्ता आपण अश्या सोशल स्टेज ला आहोत की तिथे हे प्रपोज वगरे अन ते हि खुलेआम हि गोष्ट बरोबर दिसणार नाही,म्हणून योग्य वेळकाळ बघून मी काय ते बघू असं मनोमन ठरवलं.तिनेही मग मला माझ्या स्टेटस बद्दल विचारलं त्यावर मी देखील का लग्न केल नाही वगरे याची इतर लोकांना देत असलेली पेटंट कारणं तिला सांगितली,कर्तृत्ववान लोकांच्या बाबतीत एक गोष्ट असते की त्यांनी दिलेली कारण खोटी असली तरी ती लोकांना पटू शकतात. बोलता बोलता तिने हळूच खोचक प्रश्न विचारला,
"कोणाची वाट बघत होता इतके वर्ष?'"
यावर "तुझीच" असं म्हणायचा माझा खूप मोह झाला क्षणभर तोंडातदेखील आला होता पण मी नंतर कसाबसा सावरला.मग मी पण तिला तिच्या लग्नाच्या प्लॅनिंग बद्दल वगरे विचारलं त्यावर तिने "सध्या स्थळ शोधतेय" असा रिप्लाय दिला,यामुळे तर मला आनंदाला पारावर च उरला नव्हता ,एवढं सगळं बोलून मग आम्ही तिथून निघायचं ठरवलं आणि पुन्हा गाडीत बसल्यावर मी पुढच्या भेटीत तिला प्रपोज करायचा निर्णय घेतला. तिची गाडी होती त्या ठिकाणी तिला सोडल्यानंतर ,ती गाडीतून उतरली आणि गाडीच्या काचेतून मला 'बाय' करण्यासाठी खाली वाकली तोच लगोलग मी तिला ,"पुन्हा कधी भेटशील,आज खूप मजा आली , पुन्हा भेटूया ,अजून मजा करू " वगरे अशे पेटंट डायलॉग मारले. त्यावर ती 2 दिवसांनी भेटू असं म्हणाली ,हे ऐकल्यावर तर माझ्यात अजूनच उत्साह निर्माण झाला . मी तडक घरी आलो खरं तिला प्रोपोज कस करायचं ? काय बोलायचं? या सारख्या अनंत विचारांनी मला त्या दिवशी अक्षरश: झोपच लागली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी ऑफिस मध्ये येणार नाही असं मॅनेजर ला सांगितलं आणि या दिवसात मी प्रोपोज करायची खुपदा प्रॅक्टिस केली,अनेक व्हिडिओस बघितले ,असंख्य गोष्टी केल्या,आता प्रतीक्षा होती ती त्या दिवसाची जो उद्यावर आला होता...
(क्रमश:)
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment