Thursday, 16 February 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५


भाग ४ :-

        मी भानावर येताक्षणी तत्काळ आधी खुर्चीवर बसून घेतलं आणि नंतर तिच्या परवानगीने दोन कॉफी ऑर्डर केल्या ,खरतर कॉफी येईपर्यंत आम्हाला दोघांनाही खूप Akward झाल्यासारखं होत होतं पण आमच्याकडे दुसरा पर्याय हि नव्हता, तेवढ्यात पूर्वीप्रमाणे माझ्या डोक्यात वेळ मारून नेण्याच्या अनेक कल्पना सुचू लागल्या आणि मग त्यातली एक कल्पना म्हणून मी ," आमच्या ऑफिस च्या इंटिरियर च्या डिझाइन चा विषय काढला त्यावर तिलाही जरा रिलॅक्स वाटलं असावं आणि मग तिनेही डिझाइन्स वर बोलायला सुरुवात केली आणि तेवढ्यात आमच्या कॉफी हजर झाल्या...

       मी बोलता बोलता त्यांच्या आसिस्टंट ला डिझाइन कसं समजवून सांगता आलं नाही इथपासून ते माझ्या सगळ्या इंटिरियर विषयीच्या आयडियांपर्यंत सगळं बोललो असेन, खरतर मेन मुद्दा सोडुनीतर गोष्टींवर तास तास बोलून समोरच्याला वीट आणण्याच्या माझ्या सवयीविषयी तिला माहिती होतीच पण आता ती सवय मोडली देखील असू शकते? काय माहित अश्या अनेक प्रश्नाचं काहूर पुन्हा माझ्या मनात माजू लागलं खरतर कॉफी घेता घेता मला तिच्याशी खूप काही अन भूतकाळाबद्दल बोलायचं होता असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवायची होती पण आता तो विषय कसा काढणार ? हा हि प्रश्न होताच आणि शिवाय हीच सध्याचं काय स्टेटस आहे हे सुद्धा माहिती नव्हतं, म्हणून मी तूर्तास तरी तो विषय बोलायचं टाळलं आणि पुन्हा डिस्कशन मध्ये रमलो. थोड्यावेळानंतर माझ्या मनातील सर्व आयडिया तिला समजल्यानंतर आणि तिच्या सुचनांचं निरसन झाल्यानंतर आता वेळ आली होती ती म्हणजे एकमेकांचा निरोप घेण्याची ,खरतर मला तिला जाऊ नको असच म्हणायचं होतं, पण कसं म्हणणार?जेव्हा आमची सगळी बोलणी आणि कॉफी संपली तेव्हा ती "ऑल राईट" म्हणून उठली आणि दरवाज्याकडे जायला वळाली.

"का गेलीस तेव्हा सोडून?"

" हा मागापासून मी तुला अन तू मला न ओळखण्याचा हा अभिनय जो आपण करतोय ना ,तो खूप जिव्हारी येऊ लागलाय आताशा माझ्या म्हणून न राहवून बोललो"

"हे सगळं बोलायची हि जागा नाही" ती म्हणाली

"मग तू सांग कुठे भेटायचं ?,पण यावेळी मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत आणि किंबहुना तू आता काहीही न सांगता गायब व्हायचं नाहीयेस" असं मी म्हणालो.

       नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी कुठं भेटायचं या साठीच्या ठिकाणांचा विचार केला पण कॅफे किंवा हॉटेल्स मला या गोष्टींसाठी योग्य वाटत नव्हते आणि त्यामुळे मी तिला एका बागेत भेटण्यासंबंधी विचारणा केली,तीने देखील अनेक आढेवेढे घेत ,कामाची कारणं सांगत नकार देण्याचा प्रयत्न केला पण तिलाही भेटीचा मोह होताच हे मला एव्हाना तिच्या वागण्याबोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होतं आणि त्यामुळे आम्ही एका बागेत भेटायचं ठरवलं आणि आजच्या दिवशी बरच काही मिळल्यासारखं फीलिंग मला येऊ लागलं होतं आणि या वेळी मात्र माझ्याकड बोलण्यासारखं तिला विचारण्यासारखं खूप काही होत ,आता फक्त प्रतीक्षा होती ती तिला भेटण्याची....

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...