Wednesday, 15 February 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५

भाग ३ :-

       खरं म्हणाल तर मी कामात असल्याचा फक्त अभिनय करत होतो कारण असे काहीसं दाखवलं कि समोरच्या व्यक्तीला थोडं दबल्यासारखं होत आणि मग साहजिकच आपण खूप बिझी आहोत असं त्या व्यक्तीला वाटायला लागतं असं मला वाटत पण किंबहुना हि माझ्या मनाला मी घातलेली समजूत असते किंवा अजून काही कोण जाणे..

       मग मी शेवटी मनात शक्य होईल तेवढी दाटलेली उत्कंठता दाटवून पण त्याचे कोणतेही भाव चेहऱ्यावर तसूभरही दिसणार नाहीत किंवा दिसत तर नाहीत ना याची कॉम्पुटर स्क्रीन वर दिसणाऱ्या प्रतिबिंबातून खात्री झाल्यावर ,मी एकदाच त्या मुलीकडे बघितलं पण मला वाटलेलं तस काही काही झालं नाही म्हणजेच ती मुलगी मला जी हवी ती नव्हतीच आणि मग मात्र सगळी दाटलेली उत्कंठता वगरे क्षणार्धात ओसरली आणि मग ती आणि मी त्यांच्या फर्म  ने काही सॅम्पल डिझाइन्स बनवले होते त्यावर चर्चा करू लागलो , पण तिच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून ती नवीनच या क्षेत्रात आलीये हे मला स्पष्टपणे जाणवत होतं आणि इतर नवीन लोकांप्रमाणे तिला व्यवस्तीथ पणे प्रेझेंटेशन देता येत नव्हतं हे हि मला समजू लागलं होत पण नवीन असल्यामुळे मी तिला संभाळून घेत होतो पण तिने दाखवलेले डिझाइन्स मला काही केल्या पसंद पडत नव्हते आणि मी सांगितलेल्या सूचना किंवा आयडिया तिला निटश्या समजणार नाहीयेत हे मला एव्हाना कळून चुकलं होत त्यामुळे त्यात वेळ वाया न घालवता तिच्या सर किंवा मॅडम कोण असतील त्यांच्याशी मी डायरेक्ट बोलतो असं सांगून मी तिला निरोप दिला आणि मग मी थोडासा उसासा टाकला. खरतर माझ्या मनात निर्माण झालेली एक छोटीशी पण मला महत्वाची वाटलेली अशी एकमात्र आशा अशी क्षणार्धात अनंतात विलीन होईल असं माझ्या स्वप्नातही नव्हतं किंवा मी च अवास्तव स्वप्नरंजन करत होतो असे वाटल्यामुळे माझा मूड थोडा उदासीन झाला होता, अश्यावेळी मला गेले काही वर्षे नेहमी आधार असतो तो म्हणजे संगीताचा आणि मी तडक माझ्या लॅपटॉप वरील रिलॅक्स होईल अशी काही गाणी लावली त्यामुळे माझा मूड हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला होता. खरतर हि गाणी ऐकण्याची सवय मला मी मध्यंतरी अमेरिका मध्ये एक वर्षासाठी गेलो असताना लागली. मला आजही आठवत कि पेंसल्व्हेनिया स्टेट मधल्या "किंग ऑफ प्रशिया" या छोट्याश्या शहरात मी राहत होतो आणि तिथे मराठी तर सोडाच पण भारतीय लोकांची अशी फारशी घर नव्हतं यामुळेच काहीतरी विरंगुळा हवा म्हणून मी गाणी ऐकायची सवय स्वतःला लावून घेतली आणि त्याचा मला खूप फायदा पण झाला..

      गाणी ऐकत असतानाच माझ्या डेस्क वरचा लँडलाईन पुन्हा एकदा खणखणला आणि मी तो उचलल्यावर  मॅनेजर नी त्या इंटिरियर डिझायनिंग फर्म च्या हेड सोबत आज संध्याकाळी ५ वाजता मिटिंग फिक्स झाल्याचं मला सांगितलं आणि त्याने कुठल्यातरी हॉटेल च ठिकाण देखील मला मिटिंग साठी सांगितलं. ठरल्यावेळेच्या आधीच काही वेळ आपण जाऊन पोहोचायचं हि सवय सुद्धा अमेरिका वास्तव्याचंच फलित म्हणायला हरकत नाही कारण तिथे मला काहीच काम नसायचं आणि विरंगुळा पण व्हायचा म्हणून मी सगळ्या मीटिंग्स ना थोडं आधीच जायचो त्यामुळे मला त्या जागेची पहाणी सुद्धा करता यायची आणि तेवढाच फावल्या वेळात मला घरी बसण्यापेक्षा विरंगुळा व्हायचा. त्यामुळे ठरलेल्या वेळेच्या जवळपास १५-२० मिनिटे आधीच मी ठरलेल्या हॉटेल ला पोहोचलो होतो आणि त्यांना यायला वेळ असल्यामुळे मी हॉटेल च्या वेटिंग लॉबी मध्ये तिथे असलेले मॅगझीन्स वाचत बसलो होतो तितक्यात मॅगझीन वाचता वाचता माझी नजर तिथल्या कॉफी शॉप कडे जाणाऱ्या एका महिलेकडे गेली आणि का कोण जाणे ती तीच आहे असं मला वाटलं पण तिच्या मागे जाण्यात काही अर्थ नव्हता आणि परत ती ती नसली तर उगीच पंचाईत व्हायची म्हणून मी गप्प बसलो तितक्यात माझा फोनची रिंग वाजली आणि त्यात एक महिला बोलत होती नंतर मला समजलं की ती फर्म ची हेड आहे आणि ती कॉफी शॉप मध्ये टेबल नंबर 7 वर बसली आहे ,मी तिला 5 मिनिटात येतो असं सांगून फ्रेशन होऊन मी कॉफी शॉप मध्ये गेलो खरतर त्या महिलेला मी ओळखत नव्हतो आणि आत जवळपास २-३ टेबल वर एकच मुलगी असे अनेक टेबल होते त्यातला टेबल नंबर ७ कोणता हे मला माहित नव्हतं तेव्हा मी तिथल्या मॅनेजर ला टेबल नंबर ७ कुठाय अशी विचारणा केली आणि त्याने बोट करून एका टेबल कडे इशारा केला तर तिथे एक मुलगी पाठमोरी बसलेली होती आणि मी तिच्याकडे गेलो आणि तिच्या कडे जाऊन बघितलं आणि त्यावेळी मात्र अक्षरश मला पारावर राहिला नव्हता कारण ती तीच होती..होय तीच इंटिरियर फर्म ची हेड.. माझ्या मनाला लागलेली कुणकुण आणि "किसी चीझ को .. " वाला सिद्धांत दोन्ही खरा असल्याची जाणीव आणि अभिमान मला तक्षणी वाटला आणि मला बघितल्यावर देखील तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरड्याने रंग बदलावा तसे क्षणार्धात बदलले आणि मी तसाच उभा होतो आणि काही वेळ आम्ही दोघेही एकमेकांशी काहीच बोललो नाही कारण आम्हाला दोघांनाही हा एक धक्काच होता आता हा धक्का सुखद होता की दुःखद ते मात्र आमचं बोलणं झाल्यावरच कळणार होत...

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...