Tuesday, 14 February 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५


भाग २ :-

        आठवणीत कदाचित मी इतका रममाण झालो कि आज सूर्यकिरणांनी माझ्या डोळ्यांना स्पर्श करून जणू मला उठण्यासाठी प्रवृत्त केलं असावं आणि मग मी मग उसासे देत उठाव असं काहीसं झालं म्हणजेच थोडक्यात सांगायचे झालं तर उठायला उशीर झाला आज बऱ्याच दिवसांनी इतकी गाढ झोप लागली होती आणि यामुळेच मला उठायला उशीर झाला याच मला काहीच वाटलं नाही आणि सकाळी लवकर उठून जॉगिंग ला वगरे जाणाऱ्यातला मी पहिल्यापासून कधी नव्हतोच त्यामुळे उठून मी चहा करून बाल्कनी मध्ये उभारून सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचा आस्वाद घेत आणि सोबत एक एक घोट चहा आणि त्या सोबत एक गरम घेऊन एक घोट आणि एक झुरका या कॉम्बिनेशन मध्ये काहीसं स्वतःशीच हलकेच हसत उभारलो होतो कदाचित ते रात्री पडलेल्या स्वप्नांमुळे असेल पण बऱ्याच दिवसांनी माझा मूड खूपच छान होता आणि दिवसभर तो तसाच राहावा असं वाटत होत आणि का कोण जाणे आज मला दिवसभरात माझ्यासोबत काही नक्की चांगलं घडणार याची नकळत मनाला सारखी कुणकुण लागत होती. आवराआवर आणि सगळे सोपस्कार झाल्यानंतर मी गाडीने ऑफिस ला जायला निघालो आणि सिग्नल ला थांबलो असताना एक मुलगा फूल विकायला आला आणि का कोण जाणे मला त्या मुलाकडून फुल विकत घेण्याची इच्छा झाली आणि मी तडक ती फुलं विकत घेतली आणि मागच्या सीट वर टाकली आणि सहज म्हणून गाडीमधला रेडिओ चालू केला तर मला समजलं की आज "व्हॅलेंटाईन डे" आहे कारण अनेक वर्षात म्हणजे जवळपास ती गेल्यानंतर जवळपास मी कामात इतका बुडाला होतो की माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळच उरला नव्हता आणि मग माझ्या मनात सहज विचार आला की "आज जर समजा ती अचानक समोर वगरे आली किंवा तिची भेट झाली तर!?" या विचाराने काय माहित पण मला अजूनच खूप तीव्रतेने तिला भेटावं आणि ते हि जमलं तर आजच असं वाटू लागलं पण ते कस शक्य होईल हे हि माहिती असल्यामुळे मी तशी मनाची समजूत केली पण का कोण जाणे मनाला लागलेली कुणकुण ती काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती.

        "किसी चीझ को सच्चे दिल से..." वगरे सिंद्धांतावर माझा आधी विश्वास असला तरी मधल्या काही काळात तस घडलं नव्हतं ,पण मन काही केल्या ऐकेना मनाला कुणकुण लागत होती की आज ती भेटणार..
कशी? कुठे? कोण जाणे? हे मात्र मला ठाऊक नव्हतं आणि हा सगळा विचारांचा ससेमिरा घेऊन मी ऑफिस मध्ये पोहोचलो आणि माझ्या केबिन मध्ये जाऊन बसल्यानंतर मी मॅनेजर ला "ते इंटिरियर वाले येणार होते त्यांचं काय झालं?" हा प्रश्न विचारला त्यावर तो म्हणाला , "हो सर ,पण त्या मॅडम ज्यांची ती फर्म आहे त्या काही कामामुळे येऊ शकणार नाहीयेत तर त्या assistant ला पाठवते म्हणाल्यात" यावर मी म्हणलं "ठीक आहे ,ते आले कि माझ्या केबिन मध्ये पाठव" असं म्हणून मी थोडा माझ्या कामामध्ये गुंतलो आणि काहीवेळातच माझ्या डेस्क वरचा इंटरकॉम खणखणला आणि त्यावर ते इंटिरियर वाले आलेत अशी सूचना मिळाली मी त्यांना आत पाठवायची सूचना केली आणि पुन्हा कामात व्यस्त झालो आणि का कोण जाणे पुन्हा असं वाटलं की इंटिरियर डिझायनर म्हणून तीच आली तर,पण ती तर आपल्यासोबत इंजिनिअरिंग ला होती त्यामुळे ती कशी येईल अशी मनाची समजूत घालून मी पुन्हा लॅपटॉप वर माझ्या कामात गर्क झालो.

       तेव्हढ्यात दाराबाहेर नॉक केल्याचा आवाज आला तेव्हा मी "येस,कम इन" म्हणून त्यांना आत बोलावलं आणि ती मुलगी येऊन माझ्या समोर बसली तरी मी अजूनही माझं डोकं लॅपटॉप मधेच खुपसून बसलो होतो आणि पुन्हा एकदा मी वळून बघावं आणि ती मुलगी तीच असावी असं मनोमनी वाटत होत म्हणून मी एक त्या मुलीकडे एक कटाक्ष टाकला....

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...