Thursday, 22 August 2019

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली . ज्या क्षणी ती उघडली मागून तीन चार कबुतरं फडफडत समोरच्या बिल्डिंग कडे झेपावली . भरपूर insecurity तयार झाली असणार त्यांच्या ही मनात . सूर्यप्रकाश बऱ्याच दिवसांनी बेडपर्यंत आला . उन्हाची आलेली तिरीप मी न्याहाळली , भरपूर धूलिकण त्यात दिसत होते . मी त्यातल्या काहींना चिमटीने दाबायचा प्रयत्न केला तर आहेत त्यापेक्षा जास्ती धूलिकण तयार झाले . पहिल्यांदाच तिरिपेमुळे निर्माण झालेल्या या वलयाने सिगारेटच्या धुरांमुळे तयार होणाऱ्या वलयापेक्षा जास्ती फॅसिनेट केलं असाव मला.

पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पाहिलं तर प्रखर प्रकाशाने माझ्या पापण्या पटकन मिटल्या गेल्या . एका हाताने डोळ्यासमोर येणाऱ्या प्रखर सूर्यप्रकाशाला थोपवून धरायचा मी प्रयत्न केला. पण सूर्याच्या प्रखरतेपुढे तो कितीसा टिकणार .

पाऊस आताशा दोन दिवस झालाय कमी झालाय .
पडलेल्या पावसावर उन्हाचा वाढता प्रभाव इतका भीषण आहे की छतावर साचलेल्या पाण्याच्या छतातून टपकण्याचा आवाज आताशा एक दोन दिवस झळव बंद झालाय . त्यातून निर्माण झालेली शांतता सुखावत असली तरी आता काही मिनिटानंतर त्याची भीषणता मला जाणवू लागलीय.

ओल आलेल्या छताला घट्ट धरून कर्कश आवाज करणारा पंखा जोरजोरात फिरतोय ,जसा जोर पकडू लागतोय तसा त्याचा आवाज अजूनच कर्कश होतं चाललाय .तो मला यथेच्छ शिव्या देत फिरतोय. कधी कधी असं वाटतंय की काहीतरी फेकून माराव त्या पंख्याला आणि कायमस्वरूपी शांत करून टाकावा पण त्याला शांत केलं आणि शांतता पुन्हा निर्माण झाली तर ?? नकोच ती शांतता या आवाज करणाऱ्या आयघल्या पंख्यापेक्षा ती जास्ती भयानक आहे. त्यापेक्ष्या छताकडे बघत बसावं का ?? त्यात तरी जरा बरं वाटेल .

छताकडे बघत एका हातात मोबाईल आणि एका हातात चाकू घेऊन गादीवर बिन कपड्याच असं पडून का राहिलोय आपण ?? किमान कपडे तरी घालावेत . कोणी अचानक येऊन बेल वाजवली तर किमान दरवाजा उघडण्यापूर्वी काहीतरी कपडे तरी अंगावर असायला नकोत का !! जाऊदे पण आता तरी कोण आलंय का ,तीन वर्ष झालं इथे राहतोय ,या तीन वर्षात जेमतेम पाच नाहीतर सहा वेळेला कोणीतरी आलं असेल ,नाहीतर माझ्याकडे कोण येतंय.

साला खूप दिवस झाले झोप ही लागत नाहीये . जरा डोळे मिटून झोपायचा प्रयत्न केला की पडणारी स्वप्नं जास्त अंगावर येतात . मानेवरचे तिने दिलेले लव्ह बाईट्स ,साला अजूनही हात लावला की जाणवतात . जनावरासारखं तुटन पडल्यावर टराटरा फाडलेले कपडे त्या कपाटातून जेव्हा डोकावतात तेव्हा जाळून टाकावे वाटतात.

तो चाकू फिरवावा का हातावर , फिरवल्यावर काय होईल दुखेल का?? रक्त खूप येईल का ?? की जखम होईल ? भोवळ येईल का की बेशुद्ध होईन?? पण मेलो तर मला इथून कोण नेईल?? मेलो सगळ्यांना कळेल का ? की बॉडी सडली की लोकं येतील??

      भेंचोद!! काय विचार करतोय मी हे . अन मरून तरी काय मिळणार आहे मला. सिगरेट ओढवी किमान त्या धुरांच्या वलयात तरी किमान काही काळ मन गुंतून राहील.  की सरळ सिनेमाला निघून जावं ,कारण तो अंधार तरी आपला असेल . पण साला तिथेही कॉर्नर ला लोक असतातच. भेंचोद राहूदे .. साला या सगळ्या गोष्टींची कविता करता आली असती तर किती भारी झालं असतं पण प्रत्येक गोष्टीची ,आठवणीची कविता करता येत नाही हेच खरं च्यायला .जाऊदे तिला भेटते का विचारू का ?? पण बाहेर घरी नको ... विचारतोच... मलाच गरज आहे ... भेटण्याची .. असो

- मिहीर

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...