Sunday, 19 February 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ५

भाग ७ (शेवटचा भाग) :-

        आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची उत्सुकता किंवा धाकधूक असते तेव्हा आपल्याला गाढ अशी झोपच लागत नाही असेच काहीस आज माझ्यासोबत पण झालं,एरव्ही किमान एकदा तरी अलार्म snooz करायला लागणारा मी आज चक्क गजर वाजण्याच्या आधी उठून मी अलार्म क्लॉक वर टॅप करून गजर बंद केला ,त्यानंतर आवरून चहा वगरे पिऊन झाल्यानंतर पेपर वाचत बाल्कनी मध्ये बसलो,खरतर पेपर मधल्या बातम्या मी वाचत होतो पण माझ्या डोक्यात आज नक्की काय काय करायचं याचेच विचार घोळत होती शेवटी काहीतरी ठरवून मी इतर कामात परत गुंतलो. तिला एकदा मेसेज करून आज संध्याकाळी ती येणार आहे की नाही कन्फर्म केलं..

       सूर्य मावळतीला आल्यावर अकष्ट पसरलेल्या तांबूस सूर्यकिरणांनी आसमंत सारा एका सुंदर निसर्गचित्राप्रमाणे दिसत होता,अर्थात हे खरंच असं होत की मी प्रेमात पडल्यामुळे मला असं वाटत होत हे मात्र सांगणं कठीण आहे.मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो तर तिथे ती माझ्या आधीच येऊन पोहोचली होती ती ही बऱ्यापैकी तयार होऊन,तिला बहुतेक कल्पना आली असावी असं मला वाटलं ,त्यामुळे मी अजूनच आनंदून गेलो होतो.मी तिच्या जवळ जाऊन हाय हॅलो वगरे झाल्यानंतर तिला म्हणलं चल चालत चालत गप्पा मारुया यावर ती लगेच तयार झाली आणि मग आम्ही तिथे असलेल्या ट्रॅक वरून चालत चालत गप्पा मारु लागलो ,मी गप्पा मारत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत होतो , तिच्या चेहऱ्यावरच्या भावाचं वर्णन करण्यासाठी मी च काय आणि कोणीही असत तर त्याला देखील शब्दांची कमतरता भासली असती.मग बोलता बोलता तिने मला विचारलं ,"काय रे अजूनही कविता वगरे करतो का?" "हो पण ,मध्यंतरी आणि कामाच्या व्यापामुळे सुचतीलच असं नाही",मी उत्तरलो "मग एकव कि एखादी" यामुळे तर मला खूपच आनंद झाला,त्यावर मी तिला म्हणालो "ऐक"
        "तुझ्याविना जगणे
         आता आता कुठे
         जमू लागले होते,
         तुझ्या परतण्याने
         जगणं सुखकर झालं."
हे ऐकून ती काहीशी स्पीचलेस झाली ,नंतर मी हीच संधी मानून तडक तिला प्रपोज करून टाकलं,या अचानक पडलेल्या गुगली ची मात्र तिला आधीच कल्पना असावी त्यामुळे ती म्हणाली...
.....................................

"म्हणाली" लिहीत असतानाच लेखकाच्या पेनाचं टोक तुटलं,तस कथा लिहिण्यात व्यस्त असलेला त्याने तुटलेल ते पेन रागाने फेकून दिलं आणि दोन्ही हातानी बोटं एकमेकांत अडकवून दोन्ही हातांना जोरात ताण देऊन खुर्चीवर मागे टेकून छताकडे बघत शरीराला थोडी विश्रांती दिली ,तोच शेजारी असलेला त्याचा फोन एकदम vibrate झाला त्याने चेक केलं तर तिथे कुठल्यातरी मुलीचा "Yes" असा मेसेज आला होता ,हा मेसेज पाहून त्याला इतका आनंद झाला की त्याने तो लिहीत असलेली कथा अर्धवट च सोडली कारण तो लेखक खऱ्या आयुष्यात आज जिंकला होता वास्तविक लेखक दरवेळी जिंकेलच असं नसत पण आज तो जिंकला होता ,आणि त्यामुळेच याच काय त्याच्या पुढील कित्येक कथांचा शेवट हा सुखद च असणार होता..

अशाच ज्या लोकांच्या कथा फक्त त्यांच्या डायरीपुरत्याच मर्यादित राहिल्या अश्या सर्वांना माझी ही कथा समर्पित

(समाप्त)

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...