अलीकडेच मुरांबा पाहिला, मुरांबाच्या सुरुवातीला एक गाणं आहे, चुकतंय चुकतंय सगळं सगळं चुकतंय,त्यातल्या एका कडव्यात "मासे पहुडलेत किनारी शांत,पाखरांना नाही उडायची भ्रांत,कंटाळा आलाय चराचराला,ब्रह्मान्ड पडलंय निच्युत निवांत".. या ओळी आहेत, खर तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक फेज अशी येते,ज्यावेळी सगळ्या गोष्टी चुकतायेत अस वाटत असत.या फेज लाच चूकतय फेज अस नाव देता येईल.
आता ही चुकतंय फेज म्हणजे नेमकी काय,तर आपल्या आयुष्यात आलेली एक अशी फेज ज्यावेळी आपण करतोय ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही किंवा आपण आपली प्रत्येक गोष्ट चुकीची करतोय अस आपल्याला वाटायला लागतं, आणि आपली भंबेरी उडते अस म्हणायला हरकत नाही. हे अस वाटण्याची अनेक कारणं आहेत ,त्यातली प्रामुख्याने दोन कारणं म्हणजे अपयशामुळे आलेली भीती, आणि दुसरं म्हणजे आयुष्यात असलेला एकटेपणा अस म्हणायला हरकत नाही.
आयुष्यात अनेकदा अपयश येतं ,आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे वगरे ,लहानपणापासून ऐकत आलेलं विधान सुद्धा अनेकदा अपयश आल्यानंतर आपल्याला ,खोटं वाटू लागतं,तेव्हा वाटू लागणारी अपयशाची भीती ही काहीशी भयंकर असते. याच उदाहरण मुरांबा मधलं च द्यायचं झालं तर शेवटच्या सिन मध्ये जेव्हा अमेय वाघ त्याच्या मनात असलेल्या भीती विषयी सांगतो तेव्हा तो म्हणतो," मी आजवर अनेक वेळा CA ,CS ,यांसारख्या इतर अनेक परीक्षा दिल्यात आणि त्यात मी अनेकदा फेल झालोय ,म्हणून मला failure ची खूप भीती वाटतेय". अनेक वेळा आलेल्या अपयशामुळे खचण्याची ही फेज मीच काय अनेक माझ्यासारख्या CA,CS , यांसारख्या वेगवेगळ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनुभवली असेल.त्यावर माणूस आपापल्या पद्धतीने उपाय काढत असतो.अपयशाची भीती कधी कधी माणसाला अक्षरशः आतून पोखरते, आणि अशावेळेस ही गोष्ट काहीही न करता स्वतःच्या घरात नुसतं बसून राहणे,वगरे अश्या गोष्टींना खतपाणी घालते.अपयशाच्या भीतीने माणसाला काहीच करू वाटत नाही ,कारण आपण काही करायला गेलो की आपल्याला पदरी अपयशच येणार अशी त्याची मनोधारणा झालेली असते.या फेजला चुकतंय फेज म्हणायला हरकत नाही.
चुकतंय फेज च दुसरं कारण म्हणजे ,एकटेपणा.आयुष्यात एक फेज येत असतेच त्यावेळी सगळं असूनही आपण एकटे आहोत असं,सतत वाटत असत..अन त्यात जर अस दुसऱ्या गावात एकटा राहायची वेळ आली तर हे स्वतःबद्दलच एकटेपण खूप गडद होऊन जातं..पण या एकटे पणावर माणूस आपापल्या पद्धतीने उपाय काढून ,मग तो कधी वेगवेगळ्या गोष्टीत रमून जाणं असो किंवा अजून काही ,असे निरनिराळे उपाय शोधून स्वतःच्या मनाची फक्त समजूत करून घेतो ,पण त्याचा तप एकटेपणा हा सारखा डोकावत असतोच..ज्याला हा एकटेपणा जिंकता आला त्याला बरच काही जिंकता आलं अस म्हणायला हरकत नाही...
तर अश्या प्रकारच्या अनेक चुकतंय फेज तुम्ही तुनच्या जीवनात अनेकदा अनुभवल्या असतीलच ,यात शंका नाही कारण ,कुठल्या न कुठल्या कारणाने माणूस ही फेज किमान एकदा तरी आयुष्यात अनुभवतोच ...
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment