हा कालखंड विशेषतः ज्यानी गाजवला त्यापैकी काही लोकांची नवे घ्यायची झाली तर त्यात अग्रगण्य नाव येईल ते म्हणजे "सत्यजित रे"...त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अनन्यसाधारण योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देऊन त्यांचा गौरव केला.
१९५५ साली सत्यजित रे दिगदर्शित "पथेर पांचाली" हा चित्रपट "New York" मधील "Museum of Modern Art " येथे World Premiere झालेला पहिला चित्रपट ठरला.पथेर पांचाली ह्या सिनेमा च्या बाबतीत सांगायचे झाल्यास ह्या चित्रपटाने भरपूर कमाई केली आणि हा चित्रपट तत्कालीन बंगाल सरकारने सह निर्मित केला असल्यामुळे तत्कालीन बंगाल सरकारला ह्या चित्रपटाच्या माध्यमातून भरपूर अर्थप्राप्ती झाली आणि हि झालेली अर्थप्राप्ती बघून तत्कालीन केंद्र सरकारने १९६० साली Film Finance corporation ची स्थापना केली.सत्यजित रे यांचा पश्चिमी मीडिया नि त्यांच्या "Authentic Indian Realities" चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याच्या शैलीचा भरोउर गौरव केला, सत्यजित रे यांनी केलेलं काम हे आजही एक मापदंड म्हणून समजले जाते आणि आजही अनेक चित्रपटांना तो मापदंड पार करता आलेला नाही.
१९५६ साली बॉम्बे मधील चित्रपट गृहांच्या बांधकामावर घातलेली बंदी उठवण्यात आली.तसेच या वर्षी अनेक भारतीय चित्रपट Edinburgh , Berlin film festival मध्ये दाखवण्यात आले आणि त्यांनी तिथे वाहवा देखील मिळवली.
१९५७ साली सत्यजित रे दिगदर्शित "अपरिजितो" ला Venice Film festival मध्ये पहिला क्रमांक मिळाला,तसेच या वर्षी बिमल रॉय यांच्या "काबुलीवाल" या चित्रपटाला Berlin Film Festival मध्ये संगीतासाठी Special Mention पुरस्कार मिळाला,तसेच K.A Abbas दिग्दर्शित "परदेसी" हा चित्रपट पाहिला भारत आणि रशिया यांच्या दाहकार्याने बनलेला चित्रपट ठरला चित्रपटांच्या निर्मितीच्या माध्यमातून भारताचे निरनिराळ्या देशांशी होणारे संबंध यांचा परिणाम भारताच्या तत्कालीन राजकारणावर समाधानकारक झाला असे म्हणायला हरकत नाही.१९५७ साली फिल्मच्या raw स्टॉक चा समावेश गरजेच्या वस्तू (Essential commodities ) मध्ये करण्यात आला आणि त्याच्या आयात संपूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणण्यात आली.
१९५९ साली या वर्षी गुरुदत्त यांनी "कागज के फुल" हा पहिला भारतीय CinemaScope चित्रपट बनवला.१९५९ सालीच व्ही.शांताराम यांच्या "दो आखे बारा हात" या चित्रपटाला Berlin film festival मध्ये Hollywood Foreign Press Award आणि Samuel Goldwyn Award असे पुरस्कार मिळाले.१९६० साली केंद्र सरकारने चित्रपटांना स्वस्त दरात कर्ज पुरवण्यासाठी Film Finance Corporation ची स्थापना केली,तसेच याच वर्षी पुण्यामध्ये प्रभात स्टुडिओज च्या जागेत Film institute of India (FTII) ची स्थापना केली. "मुघल-ए-आझम" हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या १९६० पर्यंतच्या इतिहासातील सर्वात महाग चित्रपट याच वर्षी म्हणजे १९६० साली प्रदर्शित झाला.
१९६३ मध्ये "Indian Motion Pictures Export corporation " ची स्थापना करण्यात आली.१९६४ साली पुण्यामध्ये "National Film Archieve of India " ची स्थापना करण्यात आली,या ठिकाणी अनेक चित्रपटांच्या रीळाचं आणि चित्रपटाच्या दुर्मिळ पोस्टर्स च जतन करून ठेवण्यात येत.१९६६ मध्ये चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी "दादासाहेब फाळके जीवन गौरव" पुरस्काराची सुरुवात करण्यात आली.१९६७ मध्ये हिंदुस्थान फोटो फिल्म्स नी स्वतः कृष्णधवल फिल्म्स आणि साऊंड negative फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली, पण कलर फिल्म्स अजूनही आयातच कराव्या लागत होत्या,पण स्थानिक कार्यक्रमांना वगरे ह्या फिल्म्स सर्रास वापरल्या जाऊ लागल्या.१९६७ साली भारतात पहिल्यांदा 70mm चित्रपट दाखवला गेला आणि चित्रपटांची परिभाषा ह्यामुळे बदलली.
१९६८ साली K.A Abbas यांच्या "चार शहर एक कहानी" या लघुपटला व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाराचा सेन्सॉर कडून भंग होऊन परवानगी न दिल्यामुळे वादंग निर्माण झाला. बॉम्बे फिल्म शैलीला आव्हान देणारी आणि फिल्म फायनान्स कॉर्पोेरेशन ने सहनिर्मित केलेली फिल्म "भुवन शोम और उसकी रोटी" १९६९ साली प्रदर्शित होऊन एक नवा पायंडा पडला असं म्हणायला हरकत नाही.
१९६९ साली "आराधना" या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशामुळे राजेश खन्ना रातोरात सुपरस्टार झाले असे म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे राजेश खन्ना हे पहिले सुपरस्टार ठरले.१९७० साली सिनेजगतामधल्या खुमासदार बातम्या,मसालेदार बातम्या देणारे इंग्रजी मासिक "स्टारडस्ट" सुरु करण्यात आले आणि ते आजही लोकप्रिय आहे,१९७० साली मुंबई मधल्या एका रस्त्याला दादासाहेब फाळके यांचं नाव देण्यात आलं.
🎥©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment