"आई ,माझी ट्रॅव्हल बॅग कुठेय?" रोणु आईला हाका मारत विचारू लागला.त्यावर आईने "ती काय तिकडे काढुन ठेवलीये कपाटाजवळ" असे रोणु ला अपेक्षीत असलेलं उत्तर दिलं अन सुरू झालं ते रोहन उर्फ रोणु च्या पहिल्या विमान प्रवासाचचं नव्हे तर पहील्यावहील्या विदेश दौर्याचं पॅकींग.खरतर रोणु अन पुर्ण परीवारासाठी खर तर ही अभिमानाची गोष्ट होती कारण रोहनचं अमेरीकेतल्या एका प्रसिध्द विद्यापीठात सिलेक्शन झालं होतं अन त्याच्यासाठी ही फारच मोठी अचिव्हमेंट होती .पॅकींग झालं, रोहनच्या परदेशगमनाची बातमी समजताच घरी पाहुण्यांचा राबता सुरू झाला अन सुरू झाले ते वेगवेगळ्या प्रकारच्या विभीन्न सुचना व किस्से.हे सगळं सहन करत करत रोणु नी त्याचा पासपोर्ट व कागदपत्र असलेली पिशवी अन सगळ सामान व्यवस्थित पॅकींग केलं अन अखेरीस ती वेळ आली जड अंत:करणानी आईबाबांनी औक्षण वगैरे करून निरोप द्यायला सगळे जण एअरपोर्ट वर निघाले.नविन झालेल्या टर्मीनल २ मधुन रोणु आत जायला निघाला तसं पाणावलेल्या डोळ्यांनी आईवडीलांनी त्याला टाटा करुन ते परत आले.आत एअरपोर्टवर गेल्यावर चेकींगसाठी रोणु ला बोलावलं तो जणु काय अतेरीकीच आहे अशा अावीर्भावात त्याच यथासांग चेकींग झालं त्याच्या पासपोर्ट वर इमिग्रेशन चा स्टॅंप पडला अन त्याला बोर्डींग पास मिळाला अन तो त्याच्या आयुष्यातील पहील्यावहील्या फ्लाईट कडे मार्गस्थ झाला.प्रवेशद्वारापाशी फ्लाईट अटेंडंटनी त्याचं यथायोग्य स्वागत वगैरे केलं त्याला त्याचा सीट नंबर सांगीतला त्याप्रमाणे रोणु त्याच्या सीट वर जाऊन बसला त्याच्यासाठी संपुर्ण विमानाचं अंतरंग नवीन होतं.उत्सुकतेपोटी तो सगळं बघु लागला तेवढ्यात सीटबेल्ट लावण्याची अनांउन्समेन्ट झाली तो कसं लावायचं ह्यांच एअरहोस्टेस नी प्रात्यक्षीक करून दाखवलं.त्याप्रमाणे त्यानी सीटबेल्ट लावला.अन समोर असणार्या व्हिडीओ स्क्रीनवर चित्रपट पाहु लागला हे करता करता त्याला कधी झोप लागली त्यालाच कळलं नाही .'रोणु उठ,चल ऊठ लवकर' अशी हाक ऐकु आली अन रोणु खाडकन उठला तर पाहतो काय तो त्याच्या रूममध्ये होता अन त्यानी त्याच्या स्वप्नात त्याच्या आयुष्यातला पहीलावहीला विमानप्रवास केला होता तोही थेट अमेरीकेपर्यंत.
---©®मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment