Wednesday, 4 January 2017

कथा :- फ्रेंडशिप सिझन ४

भाग २:-

           रोजच्या वेळेपेक्षा आज सकाळी लवकरच जाग आली..भेटण्याच्या उत्सुकपोटी रात्री फारशी झोपच लागली नाही आणि उठल्यावरही कमालीचं फ्रेश वाटत होतं. मी वेळेच्या आधी उठलेलो बघून आईबाबांना पण थोडासा धक्का बसल्यासारखं झालं पण त्यांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांनी मला फारसं काही न विचारता ते आपापल्या कामाला निघून गेले. माझं आवरून झाल्यानंतर मी चार्जिंग ला लावलेला माझा फोन चेक केला तर तिचा अजून काहीच मेसेज आला नव्हता आणि मी इकडे भेटल्यावर काय बोलायचं ,कुठे भेटायचं ह्याचं स्वप्नरंजन करत होतो पण हे विसरलो होतो की तिचा काहीच मेसेज नाही आला तर माझ्या ह्या स्वप्नरंजनाचा काय उपयोग! म्हणून आवरून नाष्टा वगरे झाल्यानंतर मी पुन्हा हातात मोबाइल घेऊन तिच्या मेसेज ची वाट बघत बसलो. इतक्यात तिचा मेसेज येईपर्यंत मी माझ्या काही मित्रांना वगरे विचारून भेटण्याच्या एक दोन जागांबद्दल माहिती घेऊन ठेवली आणि आता फक्त प्रतीक्षा होती ती तिच्या मेसेज ची...
         थोड्या वेळानंतर तिचा जनरल मेसेज आला आणि तिच्या बोलण्यावरून असं वाटत होत की ती विसरली असावी म्हणून मीच नंतर आजच्या भेटीचा विषय काढला आणि ती ने पण होकार दिला ,फक्त ती म्हणाली की तिला जास्ती वेळ नाही मिळणार कारण घरी काहीतरी थाप मारून यावं लागेल. ह्यावर मी तिला म्हणालो ," तू ये तर खरं ते वेळेचं आपण बघू नंतर.." ह्यावर ती येते म्हणाली आणि मग आम्ही सुरवातीला  fc रोड ला भेटायचं ठरवलं आणि तिथून पुढे कुठेतरी जायचं असं आणि ठरलेल्या वेळेला ती आली आणि मग आल्यावर तिने विचारलं की " हे काय आपण दोघेच बाकीचे कुठेत?" मग मी म्हणालो ,"कोणीच येत नाहीये सगळ्यांनी cancle केलंय, असुदे आता तू अलीयेस तर आपण दोघे जाऊ !" असं म्हणून मी वेळ मारून नेली. तिला शंका आली असावी पण तिच्या वागण्यातून किंवा चेहऱ्यावरून तरी तस काही वाटत नव्हतं. "पण आपण जायचं कुठे ? आणि माझ्याकडे फक्त दीड च तास वेळ आहे त्यात मला घरी पोचायचं आहे" ती म्हणाली त्यावर मी म्हणालो " चल तर तू आणि हो आपण वेळेत घरी येऊ. एक काम कर तुझी गाडी लाव इथे बाजूला माझ्या गाडीवरून जाऊ म्हणजे उगीच दोन गाड्या घ्यायला नको" असं म्हणून मी तिला माझ्या मागे डबल सीट बसायला तयार केलं. खरंतर ह्या आधी मी असं कुणालाच डबल सीट वगरे घेतलं नव्हतं त्यामुळे किंचित नर्व्हस झाल्यासारखं होत होत पण मी ते दाखवूननाही दिल आणि मग आम्ही तिथून औंध ला MSEB च्या समोर असलेल्या *SSONG Book cafe*  नावाच्या एका आगळ्या वेगळ्या कॅफे मध्ये गेलो खरतर हे कॅफे म्हणजे एक पर्वणीच आहे असं म्हणायला हरकत नाही. पुस्तकांच्या सानिध्यात आणि तिथं उपलब्ध असलेल्या पुस्तकांपैकी कोणतंही पुस्तक घेऊन निवांत पणे कॉफी पिण्यात एक वेगळीच मजा आहे म्हणून ह्या कॅफे ची मी निवड केली आणि आम्ही आत गेल्यावर तिला तिथलं वातावरण खुओच आवडलं कारण तिला पुस्तकांची बऱ्यापैकी आवड होती त्यामुळे ती जागा तिला खूपच आवडली. मग आम्ही तिथल्या एका टेबल ला बसून 2 *mocha* कॉफी ऑर्डर केली . हॉट चॉकलेट नि लदलेली अशी ती कॉफी आणि सोबत ग्रील्ड सॅन्डविच अश्या दुग्धशर्करा योगाने भरलेली ती संध्याकाळ त्याची मजा काही औरच आणि बॅकग्राऊंड ला कॅफ्फे वाल्यानी लावलेलं ते शांत असं music हे सगळ्यावर गारनिशिंग केल्यासारखं होत आणि मग आम्ही आज आपण खूप बोलायचं हा निदान 20-25 वाक्य तरी असं बोलून किंचित हासून बोलायला सुरुवात केली ते अनेक विषयांवरून खूप बोललो इतका कि आमच्याकडे असलेला वेळ जवळ जवळ संपत आला ह्याचाही आम्हाला किंचित विसर पडला आणि मग निघायची वेळ जवळ आली तसा माझा पाय तिथून निघत नव्हता आणि तिचाही निघत नसावा पण जाणं भागच होत आणि मग मी तिला सोडलं आणि "घरी पोहोचलीस कि एक मेसेज किंवा फोन कर" असं म्हणून मी तिथून निघालो आणि माझ्या मनात उत्सुकता होती की आजची भेट तिला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी आणि ह्याचाच आता मला तिचा मेसेज यायची प्रतीक्षा होती....

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...