हा कालखंड भारतीय चित्रपट सृष्टीला कलाटणी देणारा ठरला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण ह्या कालखंडात अनेक भाषांमध्ये चित्रपट बनायला सुरुवात झाली ,अनेक नवनवीन निर्माते दिग्दर्शक चित्रपट सृष्टीला मिळाले,अश्या अनेक गोष्टींनी भरलेला असा हा कालखंड म्हणजे इसवी सन १९२६-१९४०.
१९२६ ह्या वर्षी 'अर्देशिर इराणी' यांनी Imperial Films या चित्रपट निर्माण करणाऱ्या कंपनी ची स्थापना केली,याच कंपनी ने नंतर १९३१ साली "आलम आरा" हा भारतातील पहिला बोलपट बनवला,हा चित्रपट हिंदी भाषेत बनवण्यात आला होता आणि ह्याच दिगदर्शन अर्देशिर इराणी यांनी स्वतः केलं होतं. दरम्यान च्या काळात भारतीय चित्रपट सृष्टीतील अमेरिकेच्या वाढत्या दबदब्यामुळे चिंतीत होऊन १९२७ साली भारतीय सिनेमा चा अभ्यास करण्यासाठी Indian Cinematograph Committee ची स्थापना करण्यात आली. १९२८ साली ह्या कमिटी ने अभ्यासाअंती आपला रिपोर्ट प्रसिद्ध केला ज्यात ब्रिटिश चित्रपटांना महत्व देण्याऐवजी भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन मिळेल अश्या उपाययोजना अवलंबण्याच्या सूचना करण्यात आल्या,भारतीय चित्रपट सृष्टीसाठी हि गोष्ट अभिमानाची ठरली असं म्हणायला हरकत नाही.१९२९ ह्या वर्षी अनेक महत्वाचे स्टुडिओ स्थापन झाले ह्यातले दोन प्रमुख स्टुडिओ म्हणजे कोल्हापूर मध्ये Prabhat Film Studio आणि बॉम्बे मध्ये Ranjit Movietone .
१९२९ साली Universal Pictures च्या Melody Of Love नि कलकत्ता मधल्या Madan's Elphinston picture palace मध्ये झळकून बोलपटांच्या एका सुवर्णयुगाला सुरुवात केली ,असं म्हणायला हरकत नाही. ह्या Madan Picture Palace चे अनेक ठिकाणी थिएटर्स होते आणि ह्या बाबतीत एक गोष्ट सांगायची झाली तर Universal Pictures नी Madan Pictures चे थिएटर्स खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केली होती पण अमेरिका मध्ये १२२९ साली आलेल्या सगळ्यात मोठ्या आर्थिक मंदी मुळे हा व्यवहार फिस्कटला. १९३० हे साल चित्रपटसृष्टीसाठी वाईटच म्हणावं लागेल कारण ह्या वर्षी अनेक मुकपट निर्माण करणाऱ्या कंपन्या बंद पडल्या कारण आता हळूहळू बोलपटांचा प्रभाव वाढू लागला होता.
आलम आरा च्या प्रदर्शनांतर १९३१ आणि १९३२ साली अनुक्रमे तामिळ,तेलगू,बंगाली,मराठी आणि गुजराती भाषांमधले पहिले बोलपट प्रदर्शित झाले. अशातच भारतीय चित्रपट सृष्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी १९३२ साली The Motion Pictures Society Of India या संस्थेची स्थापना करण्यात आली. हळूहळू बोलपटांचा दबदबा वाढू लागला होता इतका कि १९३३ साली तब्बल ७५ हिंदी चित्रपट पूर्ण गाणी आणि नृत्यांसाहित प्रदर्शित झाले.
१९३३ साली Wadia Cinetone या कंपनी ची स्थापना झाली,ह्या कंपनी बाबतीत सांगायचं झालं तर ह्या कंपनी ने स्टंट फिल्म्स मध्ये प्रभुत्व निर्माण केले आणि १९३५ साली प्रदर्शित झालेली भारतातील पहिली स्टंट फिल्म "हंटरवाली" देखील ह्याच कंपनी ने बनवली होती. १९३५ साली प्रभात स्टुडिओ ची सैरंध्री ही जर्मनी मध्ये प्रक्रिया आणि मुद्रित झालेली भारतातील पहिली Colour Film ठरली हा चित्रपट सृष्टीतला नवा अध्याय ठरला असं म्हणायला हरकत नाही. १९३४ साल पण चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचं ठरलं असं म्हणायला हरकत नाही कारण ह्या वर्षी भारतात तब्बल २२८ चित्रपटांची निर्मिती झाली ह्यात ओरिया आणि कन्नड भाषेतील पहिल्या बोलपटांचा सुद्धा समावेश होता. हिमांशू राय यांनी बॉम्बे टॉकीज ची स्थापना सुद्धा १९३४ याच वर्षी केली. रणजित स्टुडिओ निर्मित "तुफान मेल" हा हिंदी सिनेमा मधील स्टंट फिल्म प्रकारामधला पहिला हिट चित्रपट ठरला. १९३५ सालापासून पार्श्वगायक हा चित्रपटातील अविभाज्य आणि कायमस्वरूपी घटक बनायला सुरुवात झाली ह्याला 'New Theators' निर्मित "धूप चंदन" हा चित्रपट कारणीभूत ठरला असं म्हणलं जात. पंजाबी आणि असामी भाषेतील पहिले बोलपट हे १९३५ सालीच निर्माण झाले.
१९३६ साली भारतात All India Radio ची स्थापना करण्यात आली आणि संपूर्ण वर्षभर याचीच सगळ्या देशात चर्चा निर्माण झाली. १९३७ हे वर्षसुद्धा चित्रपट सृष्टीसाठी संमिश्र असच राहिलं, ह्या वर्षी प्रभात ची निर्मिती असलेल्या संत तुकाराम या चित्रपटाला व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये स्पेशल जुरी अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला,हा पुरस्कार मिळवणारा संत तुकाराम हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९३७ मधेच Imperial Films निर्मित "किसन कन्हैया" हि फ़िल्म भारतीय बनावटीची पहिली कलर फिल्म ठरली. Indian Motion Pictures Association ची स्थापना बॉम्बे येथे याच साली म्हणजे १९३७ मध्ये झाली आणि याच वर्षी दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या आयुष्यातली "गंगावतारम" हि शेवटची फिल्म बनवली आणि चित्रपटसृष्टीतील फाळके युगाचा अंत झाला असे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
१९३८ साली पहिल्या मल्याळम चित्रपटाच्या निर्मितीने भारतीय चित्रपट सृष्टीने २५ वर्ष पूर्ण केली , १९१३ ला मुहूर्तमेढ रोवलेल्या ह्या चित्रपट सृष्टीने बघता बघता २५ वर्ष अनेक चढउतार सहन करत पूर्ण केली.१९४० साली तत्कालीन सरकारने Film Advisory Board ची स्थापना केली आणि त्या बोर्ड ला फिल्म च्या Raw Stock ची मोनोपॉली बहाल करण्यात आली.
तर असा हा १२२६-१९४० हा भारतीय चित्रपट सृष्टीतील कालखंड हा तसा संमिश्र राहिला असं म्हणायला हरकत नाही ,अनेक तांत्रिक बदल ह्या काळात घडले आणि ते बदल चित्रपटसृष्टीने पटकन आत्मसात देखील केले त्यामुळेच चित्रपटसृष्टी तग धरू शकली असं म्हणायला हरकत नाही...
🎥©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment