Sunday, 18 December 2016

फ्रेंडship सिझन 3 Flirtationship


भाग ३ :-

           मी आपणहून काही विचारायचं नाही असं ठरवलं होतं पण माझं मन काही केल्या मला स्वस्थ बसू देत नव्हतं पण तरी कसाबसा मी कंट्रोल करत होतो. चॅटिंग करत असताना अनेकदा अशी वेळ आली की ज्यावेळी हे पटकन माझ्या तोंडून निघालं असतं पण ऐनवेळेस काही ना काही करून मी वेळ मारून नेली. पण हे सगळं झालं तरी मनातली अस्वस्थता काही केल्या कमी येत नव्हती आणि त्यातूनच नाही नाही ते विचार उत्पन्न होत होते आणि हे सगळं कुणाला सांगण्याची सोय पण नव्हती कारण कुणाला सांगायला गेलं तर त्यांचा पहिला प्रश्न हाच असे की , " खरंच तुमचं काही चालू आहे का?," "चालू असेल तर आम्ही मदत करू अन्यथा मदत तरी कशी करणार?" ह्या प्रश्नाला द्यायला माझ्याकडे समर्पक असं उत्तरच नव्हतं म्हणून कोणाला काही सांगणं हे मला सोईस्कर वाटत नव्हतं आणि एवढं असूनही कोणाला सांगितलं आणि तिला कळलं की मी कोणाला तरी सांगितलंय तर पुन्हा ती रागावण्याची अथवा संबंध तोडायची भीती म्हणून हा विचार मी सर्वस्वी बाजूला ठेवला.
           असच एकदा चॅट करताना रात्रीचे 1.30 वगरे वाजले असतील तेव्हा तिचे रिप्लाय लेट येत होते आणि मग मी सहज चेक केलं की तिने मला ती ज्यांच्याशी बोलते हे सांगितलं होतं ते सगळे केव्हाच ऑफलाईन गेले होते आणि रात्री 1.30 हि ना तिची अभ्यासाची वेळ होती ना वेळेला कोणाकडे घरी काम असतं, मग नक्की हि कोणाशी बोलते इतका वेळ? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि आता मात्र माझा संयम सुटायला लागला मी पूर्णतः कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतो पण तरी मला दिवसेंदिवस ते अवघड होत चाललं होतं..
           मग शेवटी असह्य झाल्यामुळे मी त्या दिवशी रात्री 2 च्या सुमारास तिच्या लेट रिप्लाय नि वैतागून तिला " तू कोणाशी बोलतेय का ? तस असेल तर मी झोपतो उगीच तुला डिस्टर्ब नको !" असा खोचक प्रश्न केला. हा प्रश्न केल्यानंतर मला योग्य उत्तराची अपेक्षा होती पण तिने कोणाशी नाही असं उत्तर दिलं पण मला शंका येत होती आणि आत्ताच ती योग्य वेळ आहे असं मला वाटलं म्हणून मी तडक विचारलं " तू त्या काही दिवसांपूर्वी ऍड झालेल्या (त्या)मुलाशी बोलतेय ना?" हे ऐकून ती थोडी निरुत्तर झाल्यासारखी झाली आणि नकळत तिच्या कडून नकळत रिप्लाय आला " की तुला कसं कळलं?" हे उत्तर ऐकून तर मला माझा राग आवरेना पण मी म्हणलं उगीच रागावून बोलण्यात काही अर्थ नाही आता ती बोलतेच आहे तर तिच्याकडून अजून काही माहिती मिळते का बघू असं म्हणून मी रागावलेला असताना सुद्धा रागावलेलो नाही असा आव आणून बोलायला सुरुवात केली दरम्यान कदाचित तिच्या फोन ची बॅटरी संपत आल्यामुळे ती म्हणाली कि मी अत्ता झोपते माझ्या फोन ची बॅटरी कोणत्याही क्षणी संपेल आणि फोन स्वीच ऑफ होईल असं म्हणून ती ऑफलाईन गेली पण ते अनेक प्रश्न निर्माण करून......

(क्रमश:)

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...