भाग ४ :-
दुसऱ्या दिवशी दुपार होत आलेली तरी तिचा एकही मेसेज न आल्यामुळे मला मी काल रात्री काही जास्ती तर बोललो नाही ना असं वाटू लागलं म्हणून मी पुन्हा पुन्हा आमचे चॅट्स वाचत होतो , एरवी चॅट्स वाचणं हा एक सुखद प्रकार असतो चॅट्स वाचत असताना किंचित गालातल्या गालात हसणं असेल किंवा आपण कधीकधी किती बालिश बोलतो ह्याची जाणीव जुने चॅट्स करून देतात पण त्या त्या वेळी ते सगळं चालतच आणि त्याची मजा काही औरच असते पण आता मला मी विचारलेल्या प्रश्नामुळे ती नाराज झाली की काय असं वाटू लागलं होतं आणि म्हणून मी तीच लास्ट सिन चेक केलं तर ते 9.30 am दाखवत होत म्हणजे तिचा मोबाईल चालू आहे नाहीतर मागच्या वेळेसारखा काही मोबाईल प्रॉब्लेम नाही झाला ह्याची खात्री झाली. मग तरी आज मेसेज कसा नाही एरवी तर मी करायच्या आधी मेसेज येतो आणि आजच कसा नाही ह्या प्रश्नाने मला हैराण करून सोडलं होत आणि मग आता करावं तरी काय ? हा विचार सुरू झाला आणि मग मी ठोठावला ते आमच्या एल कॉमन फ्रेंड च दार मी तिला मेसेज केला आणि मला खात्री होती की तिच्यासोबत कॉलेज मध्ये असणारच त्यामुळे ती सांगू शकेल. असं म्हणून मी कॉमन फ्रेंड ला मेसेज केला त्यावर तिच्याकडून असं समजलं की ती आज वेळेवर कॉलेज ला आली होती आणि तिच्या वागण्याबोलण्यावरून काही प्रॉब्लेम झाला असावा असं दिसतं नाहीये असं म्हणून तिने मला विचारलं की ,"काय रे, काही झालंय का?" मी म्हणलं "कुठे काय? काहीच नाही झालं. सहजच चौकशी केली" असे म्हणून मी वेळ मारून नेली. काही प्रॉब्लेम तर झालेला नाही मग तरी का मेसेज नाही पुन्हा हा प्रश्न सतावू लागला मग तिला घरी काहीतरी काम आलं असेल आणि त्यामुळे मेसेज केला असं समजून मी मनाची समजूत घातली आणि मेसेजची वाट बघू लागलो..
तसा दिवसातला बराच काळ तिच्याशी चॅट करण्यात जात असल्यामुळे नेहमी दिवस पटकन संपत असे आणि आज तिचा मेसेज न आल्यामुळे मला खूप बोर होत होत आणि टाईमपास करायला काहीच नव्हतं म्हणून मी लॅपटॉप चालू केला आणि त्यावर कॉफी आणि बरच काही सिनेमा लावला. खरंतर मला हा चित्रपट आधी माहितीही नव्हता पण नंतर तिने सांगितल्यावर मी पहिला आणि मला इतका आवडला कि त्यानंतर मी तो जेमतेम 10-15 वेळा पाहिला असेल. थोडा वेळ सिनेमा चालू असताना मोबाईल vibrate झाला म्हणून मी चेक केला तर तिचा मेसेज आला होता आणि अश्या अर्थाने हा चित्रपट पुन्हा एकदा मला लकी ठरला असं म्हणायला हरकत नाही.
मेसेज आल्यावर मी विचारलं की सकाळपासून कुठे गायब होतीस?त्यावर ती म्हणाली की तिचे आईबाबा गावाला गेलेत त्यामुळे तिला घरातली काम होती. हे ऐकून माझा जीव अक्षरश भांड्यात पडला कारण माझ्या कालच्या बोलण्यामुळे ती गेली नव्हतं हे ऐकून मला बरं वाटलं आणि मग मी ठरवलं की अत्ता तसही तिला घरची काम असतील त्यामुळे अत्ता तो विषय काढणं इष्ट नाही म्हणून मी ठरवलं की रात्री निवांत असताना ह्या संबंधी तिच्याशी निवांत पणे चर्चा करावी असा म्हणून थोडावेळ चॅट केल्यानंतर ती ऑफलाईन गेली आणि मग माझ्या मनात असलेली हुरहूर हि तिच्याशी स्पष्टपणे बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्याशिवाय संपणारी नव्हती त्यामुळे आता मला प्रतीक्षा होती ती म्हणजे रात्री तिचा मेसेज कधी एकदा येतो....
(क्रमश:)
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment