Friday, 16 December 2016

कथा :- फ्रेंडship सिझन 1

अरे काय बोलतोयसं हे? मी कधी तुझ्याकडे तसं पाहीलचं नाही" ह उद्गार ऐकून माझ्या अंगात ओतप्रोत भरलेला आत्मविश्वास जसा नारळ खाडकन झाडावरून पडावा तसा कोसळला."पण का नाही म्हणतेयसं ते तरी सांग?" हे विचारल्यानंतर ती म्हणाली "आपण एकमेकांचें चांगले मित्र आहोत आपण चांगले मित्रचं राहू अन तसही मला अत्ता हे प्रेमवगैरे या गोष्टीत अजिबात पडायचं नाहीये" हे ऐकून तर उरलासुरलेला आत्मविश्वास सुध्दा गळून पडला आणि मी त्या टिपीकल अशा म्हणजे गुढघ्यावर बसलेला वगैरे आणि तो समोर धरलेला गुलाब मागे घेऊन खाडकन उभा राहीलो,सगळ्या फिलींग्स खाळकन काच फुटल्यासारख्या फुटल्या होत्या पण त्याचा लवलेश तसुभरही चेहर्यावर दिसू नये यासाठी मी कसाबसा खिशातला रूमाल काढून तोंडावर फिरवत गालातल्या गालात किंचींत बेगडी हसत होतो पण मनात किंचींत भीती होती कि आता असलेली मैत्री पण तुटायची.पण अशा वेळी कुणास ठाऊक काय होतं डोकं 4जी च्या स्पीडनी चालायला लागतं तसं ते चाललं अन खाडकन मी म्हणालो,"कशी वाटली गंमत?". "काय कसली गंमत?" तीने विचारलं."अगं ही गंमतच होती तुझी आजच्या दिवशी जरा खेचावी म्हणलं म्हणुन सगळा हा खटाटोप बाकी तसं काही नाही" मी कसबसं सावरायचा प्रयत्न केला पण तीच्या मनात अजुनही साशंकता होती, आता ती दुर करणं माझ्यासाठी गरजेचं होतं त्यासाठी आधी तीनं शांत होणं गरजेचं होतं म्हणून मी पटकन म्हणालो " कॅफे मध्ये जायचं? मस्तपैकी कोल्ड कॉफी पिऊ म्हणजे तुझं डोकं पण थंड होईल.जास्ती विचार करू नको चलं पटकन आता" असं म्हणत मी थोडासा हक्क दाखवत आता तीला आमच्या कॉलेजच्या कॅफे मध्ये घेऊन गेलो.
कॉलेजचं कॅफे तसं प्रशस्त,हवेशीर अन भरपूर जण एकावेळी बसू शकतील असं अन फिल्मी सुध्दा कारण हिते सदैव फिल्मी गाणी मोठ्या आवाजात लावलेली असतात.आम्ही आमच्या नेहमीच्या टेबलवर जाऊन बसलो आणि दोन कॉफिंची ऑर्डर दिली सोबतीला छानशी गाणी चालू होती पण अचानक ब्रेकअप सॉंगस् सुरू झाले.त्या रेडीओ वाल्यांना सुध्दा माझ्या फिलींगसच्या तुटलेला खळकन् आवाज आला असावा.एक तर मगाशी झालेला सिन आणि त्यात चिडलेली ती आणि ह्या सगळ्यांवर कडी म्हणजे ही ब्रेकअपची गाणी माझ्यावर चहूबाजूंनी प्रहार चालू होता ह्या प्रसंगी काय बोलावं कसं हॅंडल करावं काहीचं समजेना त्यामुळे जास्ती खोलात न जाता तिच्याशी वरवरच्या गप्पा मारताना 'सॉरी' म्हणुन मी तिथून प्रस्थान करण्यातचं आपलं स्वारस्य आहे हे एव्हाना मला कळून चुकलेलं होतं म्हणुन मी तिथून तडक बाहेर निघालो अन गाडीला किक मारली अन तडक हनुमान टेकडी गाठली.टेकडीवर गेलो तर तिथे अनेक युगूल स्वागताला हजरं त्यामुळे दु:ख कमी व्हायचं राहीलंचं पण अजुन दसपटीने वाढलं पण शेवटी एक मनुष्यविरहीत कोपरा निवडला अन तिकडे जाऊन बसलो अन काही क्षणातचं डोळ्यांसमोर तरळू लागली ती "आमची गोष्ट"।होय आमची गोष्ट कारण ह्या गोष्टीत आमचा दोघांचा सहभाग आहे त्यामुळेचं ही गोष्ट आमची आहे.

तर असा हा मिळालेला नकार पचवत मी त्या टेकडीच्या निर्मनुष्य किनाऱ्यावर बसून सगळ्या गोष्टींना फ्लॅशबॅक मध्ये पाहू लागलो. फ्लॅशबॅक हि संकल्पना थोडीशी फिल्मी वाटली तरी बरेचदा अश्या वेळी ती नकळत अनुभवायला मिळते. तर मला फ्लॅशबॅक मध्ये मला आठवला आमचा whatsapp ग्रुप खरतर जिथून हे सगळं सुरु झालं. आमच्या एका व्हाट्सअँप ग्रुप मध्ये एक मुलगी ऍड झाली वास्तविक पाहता नवीन मुलगी ऍड होण ह्यात काही नवीन नाही आणि नवीन मुलगी ऍड झाली कि सगळे जण स्वागताला सज्ज असतातच हे वेगळं सांगायला नको. तसंच काही दिवसांनंतर मी दुपारच्या निवांत वेळी सहज ग्रुप वर बोलत असताना त्या काही दिवसांपूर्वी ऍड झालेल्या मुलीचा मेसेज आला ग्रुप वर फॉर्मल बोलणं झालं न अचानक त्या मुलीचा पर्सनल मेसेज आला. आता कोणत्याही मुलीचा पर्सनल मेसेज आला कि कोण बोलणार नाही म्हणून बोलू लागलो जनरल hi hello वगैरे बोलणं झालं. ऑलरेडी ग्रुप वर तिनी व मी 10 वेळा इंट्रो दिला तरी पर्सनल ला इंट्रो विचारांची एक वेगळीच मजा ना अस म्हणून फॉर्मल discussions चालू झालं. थोड्या वेळानंतर ती मुलगी कशी दिसते हि उत्सुकता निर्माण झाली पण आता प्रोफाइल picture कुठाय हे कस विचारायचं कारण संधी न मिळाल्यामुळे ह्या विचारायच्या वगरे बाबतीत दुर्लक्षित राहिलेला मी अन हे फ्लिर्टींग वगरे फक्त शब्दांपुरतच माहिती पण का कोण जाणे अशा वेळेस देने वाला जब भी देता देता छप्पर फाडके,त्यामुळे जे जे मी विचारायला हवा ते ते तीच विचारू लागली. थोड्या वेळा नंतर तीनच मला प्रोफाइल picture ची विचारणा केली मी पण तडक नंबर सेव्ह करून तिला ते दिसेल अशी व्यवस्था केली तिने पण तसेच केल पण तीच प्रोफाइल picture हे वेगळ होत तिचा स्वतःचा फोटो नव्हता त्यामुळे मनात असलेल्या उत्सुकतेपोटी का होईना पुन्हा एकदा chatting करावं अस वाटू लागलं पण ती ऑफलाईन गेली.....

असेच वाट बघण्यात 2-3 दिवस गेले तिचा स्वताहून मेसेज नव्हताच मग मी सहज एकदा whatsapp कॉन्टॅक्ट लिस्ट चेक करत असताना तिने तूच प्रोफाइल picture बदललेला पहिला अन स्टेटस काहीच ठेवलं नव्हतं. पण स्टेटस ठेवलं नाही हे कारण त्या साठी पुरेस होत मग मी तिला मेसेज केला
मी:- स्टेटस खाल्लं कि काय(स्टेटस का ठेवलं नाही हर अधिकारवाणी नि विचारण्या एवढा अधिकार अजून मला मिळाला नव्हता त्यामुळे खवचट पणाने असा प्रश्न विचारला)

ती:- नाही ठेवला
(हुश्श,निदान तिनी आपला नंबर तरी delete केलेला नाही हे बघून थोडश्या अशा पल्लवित झाल्या)

ह्यावर ती smilies मध्ये हसली. Messaging apps मूळे खळखळून हसणे ,गालातल्या गालात हसणे ह्यांसारखा smilies मध्ये हसणे आणि "hmm hmm" करून हंबरणे हा प्रकार अलीकडे रूढ होत चाललाय. मग बोलता बोलता कळलं कि ती पण आमच्याच कॉलेज मध्ये आहे खर तिचा ट्रेड वेगळा आहे मग आता दोघांचा वेगळा असला तरी अभ्यास हा टॉपिक मला बोलायला पुरेसा होता त्यावरून बोलणं चालू झालं,दोघांनाही एकमेकांच्या अभ्यासबद्दल जास्ती माहिती नसताना दोघेही जणू त्यातले तज्ञ असल्यासारखे चर्चा करू लागले.असच काही दिवस चालू राहिल्यावर पडणारा एक सर्वसामान्य प्रश्न असतो तो म्हणजे नेहमी मीच का पहिला मेसेज करायचा तसा तो प्रश्न मलाही पडला व ह्यावर तोडगा म्हणून मी आता जो पर्यंत तिचा आपणहून मेसेज येत नाही तो पर्यंत मी आपण स्वताहून हा पर्याय निवडला. आणि मग सुरु झालि ती तिच्या मेसेज ची प्रतीक्षा......

असेच समोरून मेसेज यायची वाट बघण्यात 2 दिवस गेले दरम्यानच्या दोन दिवसाच्या काळात माझी नजर ती ऑनलाइन आहे कि नाही ह्याकडे होतीच कित्येकदा तर मेसेज करावंसं वाटायचं सुद्धा पण तत्त्व आडवी येत होती. दोन दिवसांनी मात्र तिचा आपणहून मेसेज आला "कि काय अरे कुठे पत्ताय? काय मेसेज नाही काही नाही" ह्यावर तसा मी रिकामटेकडा असलेला मी म्हणालो "काही नाही जरा busy होतो म्हणून नाही केला" अस म्हणून परत चॅटिंग चालू झालं. वेगवेगळे कायदे ज्याप्रमाणे अर्ज किंवा रिपोर्ट्स चर prescribed formats देतात त्याप्रमाणे चॅटिंग मध्ये काही मेसेजेस ना स्पेसिफिक replies द्यायचे असा जणू अलिखित नियमच झालाय तसच रेपलिएस देत चॅटिंग चालू होत आमच्यात आता म्हणावं तसे सूर जुळू लागलेले पण आम्ही भेटलो नव्हतो मला न थोड्याफार प्रमाणात तिला भेटायची उत्सुकता होती. पण एकटीला भेट किंवा ती मला भेट अस एकदम कस विचारायचं म्हणून मीच शक्कल लढवली न आमचे काही कॉमन फ्रेंड्स न ती न मी असा भेटायचं का ? अस तिला विचारला त्यावर ती पण हो म्हणाली. आता मला उत्सुकता लागली ती तिला भेटायची. भेटल्यावर काय बोलायचं कस स्वतःला प्रेसेंट करायचं ह्या विचारांच चक्र डोक्यात फिरू लागली. अनेक विचारांती काही गोष्टी निश्चित केल्या आणि मग अखेरीस तो भेटीचा दिवस आला. ठरलेल्या वेळेत किंबहुना वेळेच्या आधीच मी आमच्या कॉलेज मधल्या caffe ला पोहोचलो थोड्याच वेळात आमचे इतर मित्रमंडळी आले पण माझे डोळे त्या कॉलेज कॅम्पस मध्ये तिला शोधात होते. पण काही वेळानी ती आली आल्यावर आम्ही सगळे बसलो ,कॅफे मधल्या राऊंड टेबल ला ती माझ्या समोर बसली मग आमच्या गप्पा चालू झाल्या मात्र तिचा न माझा आमचा दोघांचाही त्या गप्पात विशेष सहभाग नव्हताच तरी बाकीच्या मित्रांनी तुम्ही काहीच बोलत नाही असा म्हणल्यावर फॉर्मल 2-3 शब्दांपुरतच बोललो परत आजूबाजूला बघत बसलो थोड्या वेलनन्तर का होईना काहीतरी बोलणं होईल ह्याची वाट आम्ही दोघंही बघत होतो पण बोलणं झालंच नाही नंतर जायला निघालो ती जाताना बाय म्हणून निघून गेली.तर अशी हि आमची पहिली भेट ज्यात आम्ही दोघी एकमेकांशी जाताना फक्त bye एवढंच बोललो.
मी ठरवलेल्या सगळ्या गोष्टी तर राहिल्या बाजूलाच साधं 2 शब्द हि बोलु शकलो नाही ह्याच थोडासा guilt घेऊन मी घरी आलो आणि आजच्या भेटीवर तिची काय प्रतिक्रिया तिला कस वाटलं ह्यासारख्या तत्सम प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची होतीच मग सुरु झाली ती पुन्हा एकदा तिच्या मेसेज ची प्रतीक्षा. दरम्यान रात्री नेहमीच्या वेळेला तिचा मेसेज आला न मग मी हलकेच विचारलं "कस वाटलं भेटून?" त्यावर ती smilies मध्ये हसून म्हणाली "आधी बोल तरी मग विचार कसा वाटलं भेटून" ह्यावर आम्ही दोघ हसलो न मग मी म्हणालो "पुढच्या भेटीत नक्की बोलेन" अस म्हणून मी पुन्हा भेटण्याची सोय करून ठेवली आणि त्यानंतर वरचे वर आमच्या भेटी न मेसेजेस सुरु राहिले. असच बोलता बोलता 1-2 दिवस late night chats चालले लाटे night म्हणजे जवळपास पहाटे पर्यंत बोलणं चाललं आणि त्यात तिनी बोलता बोलता असं विचारलं कि "तू कॉफी अन बरच काही" फिल्म पहिलीयेस का?" ह्या प्रश्नावर मी झटकन नाही अस उत्तर दिलं न विचारलं का अस काय आहे त्या फिल्म मध्ये? न ती ऑफलाईन गेली आणि माझ्या मनात वेगळाच प्रश्न निर्माण करून...

मी ती फिल्म न बघून अस काय मिस केलय हा प्रश्न सतावू लागला न अश्यावेळी इतर वेळी नको असताना तुमचं नेटवर्क 4g स्पीड नि चालत पण नेमकं हवा असतं त्यावेळी 2g स्पीड पण नसतो त्यामुळे मी मूवी download नाही करू शकलो पण थोड्यावेळाने ती ऑनलाइन आली तस माझा जीव भांड्यात पडला. घरी काहीतरी अचानक काम आलं त्यामुळे तीला ऑफलाईन जावं लागलं असा ती म्हणाली. मी विचारलं अगं सांग ना काय आहे त्या फिल्म मध्ये त्यावर ती सांगू लागली "कि त्यातले नायक नायिका एकमेकांना आवडत असतात पण तो तिला सांगू शकत नाही,तिला वाटत असत कि त्यांनी propose करावं पण हा करत नसतो मग शेवटी तो कसा करतो वगैरे वगैरे" मी ठीक आहे मिळाला कि पाहीन अस म्हणालो आणि नंतर आम्ही दोघंही झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मित्राला ज्याला मी आत्तापर्यंतचा सगळं सांगितलेलं त्याला मी हे सांगितलं तो म्हणाला "अरे येड्या तू तिला propose कर असा म्हणाली indirect अन तू बसला इतके दिवस विचार करत,एक काम कर आता valentine डे जवळ आलायच तर तिला propose करून टाक चांगला चान्स आहे" हे ऐकून जसा पावसाळा जवळ आला कि मोराला आनंद होतो तसा मला गगनात न मावणारा आनंद झाला कारण मला जे हवं होता तसच घडत होता म्हणून मी तिला propose करायचं ठरवलं.
पण त्या आधी आज पुन्हा एकदा confirm करावं म्हणून परत बोलता बोलता कॉफी अन बरच काही चा विषय काढला ह्यावर ती बोलता बोलता म्हणाली कि मी काल ती फिल्म बघितलेच नाही मी असच बोलले" अस म्हणून ती ऑफलाईन गेली. आता तर जणू मला पारावर उरला नव्हता. आता मला भीती वाटू लागली ती propose कसं करू ह्याची पुन्हा मी विचारांती काही गोष्टी निश्चित केल्या आणि झोपून गेलो.
अखेरीस तो दिवस आला मी आज रोजच्या वेळेच्या जवळपास तासभर आधीच उठून व्यवस्तीत आवरून अगदी आईच्या भाषेत म्हणायचं झाला तर भट्टीचे म्हणजेच कडक इस्त्री केलेले कपडे वगरे घालून कॉलेज मध्ये गेलो न सगळ्या त्या valentine डे च्या माहोल मध्ये माझे डोळे फक्त तिलाच शोधत होते अखेर ती आली मी माझ्या हातात धरलेला गुलाब माझ्या मागे धरला आणि तिच्याशी नोळू लागलो 5 मिनिट बोलणं झाल्यावर ती जायला निघाली तस मी तिला पटकन म्हणालो "ऐक ना!"
त्यावर ती म्हणाली "बोल ना (ह्यावेळी तिला थोडासा अंदाज आला असावा )एक मिनिट तू मला propose वगैरे करत नाहीयेस ना?"
मी म्हणालो "हो propose च करतोय,मला तू आवडायला लागलीयेस...... ह्यावर ती थोडीशी नाराज झाली अन म्हणाली काय बोलतोयस हे ? मी तुझ्याकडे कधी तशा नजरेने पहिलंच नाही.....
हे ऐकलं आणि मी ताडकन भानावर आलो आणि मला समजलं की मी हि गोष्ट फ्लॅशबॅक मध्ये बघतोय

(समाप्त)
©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...