Sunday, 1 October 2017

बापजन्म - Film Review

         बाप आणि मुलांचं नातं यावर आजपर्यंत अनेक चित्रपट आलेत,या पुढेही येतील ,पण या सगळ्यात बापजन्म हा उजवा ठरतो याला कारण म्हणजे बापजन्म ची केलेली अप्रतिम आणि उत्कंठावर्धक मांडणी.
        आपल्या भूतकाळातील वागण्यामुळे दुरावलेल्या आपल्या मुलांना आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी सचिन खेडेकर एक मिशन आखतात आणि त्या मिशन मध्ये नेमकं काय होत आणि त्या मिशन च फलित नेमकं काय मिळतं ही या चित्रपटाची कथा आहे.
       सध्या सचिन खेडेकर अनेक फिल्म्स मधून अभिनयाची कडक बॅटिंग करतातच आहेत ,या सिनेमात मात्र त्यांनी सेंच्युरी मारलीय अस म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी केलेला अभिनय खूप सुंदर आहे.
        निपुण धर्माधिकारी याने या आधी अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शन केलंय हे आपल्याला माहिती आहेच . या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपट दिग्दर्शनात केलेलं पदार्पण निश्चितच प्रशंसनीय आहे. कारण त्याने लिहिलेली स्क्रिप्ट की त्याचा वाईट सिनेमा बनणं अशक्य होतं असं म्हणायला हरकत नाही.
      या शिवाय पुष्कराज चिरपुटकर ने साकारलेला माऊली  हा जितकं हसवतो तितकाच तो मनाला भावतो देखील. या शिवाय इतर कलाकारांनी देखील उत्तम अभिनय केला आहे.
       या शिवाय या चित्रपटाची अजून एक महत्वाची अन लक्षात राहणारी बाब म्हणजे क्षितिज पटवर्धन ने लिहिलेली आणि गंधार संगोराम ने संगीतबद्ध केलेली गाणी ,आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात ,तसेच या चित्रपटाचं पार्श्वसंगीत देखील श्रवणीय आणि उत्तम आहे.
        एकंदरीत म्हणायचं झालं तर हा सिनेमा आवर्जून पाहण्यासारखा आहे असं म्हणता येईल.
© मिहीर कुलकर्णी

4 comments:

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...