दुनियादारी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आलेल्या एका लेखातून मला दुनियादारी या कादंबरीबद्दल कळलं आणि चित्रपट पाहिल्यानंतर ती वाचायची इच्छा अजूनच बळकट झाली,आणि अखेरीस महतप्रयासानंतर पुस्तक हातात पडलं आणि वाचायला सुरुवात केली...
दुनियादारी खरतर १९८२ साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे पण त्यातली पात्र,प्रसंग आजही अगदी तंतोतंत प्रमाणात पाहायला आणि अनुभवायला मिळू शकतात.पुण्याचं आणि त्यातही एस.पी कॉलेज च केलेलं वर्णन असो किंवा त्यातले अनेक गोष्टींच केलेलं वर्णन असो ,नकळतपणे सर चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.खरतर पुस्तक वाचल्यानंतर एक खंत मनाला वाटली ती म्हणजे इतकी चांगली कलाकृती असूनही त्याला दृकश्राव्य माध्यमातून मग ते मालिका असो किंवा चित्रपट या दोन्ही माध्यमात या कलाकृतीला साजेसा मान मिळवून देण्यात कलाकार आणि दिगदर्शक सपशेल अपयशी ठरलेले आहेत.
दुनियादारी मधली पात्र अगदी आपल्याला आपल्या कॉलेज जीवनातही सहज सापडतील,दिग्या सारखा मुलगा हा नसला तर ते कॉलेज च नसेल ,लेक्चर चुकवून कट्ट्यावर मज्जा करण्याचे दिवस त्यात घडणाऱ्या घटना अगदी अचूकपणे टिपण्यात सुहास शिरवळकर यशस्वी झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही.पुस्तकातले काही संवाद जरा शिवराळ किंवा वावगे वाटत असले तरी "कट्ट्यावर ते अश्याच प्रकारे अगदी तंतोतंत बोलले जातात" आणि लेखक पात्र निर्माण करू शकतो,पण पात्राचा स्वभाव तो तर त्याने अनुभवातूनच जन्माला घातलेला असतो,त्यामुळेच सुहास शिरवळकरांनी प्रस्तावनेत "या कथेतील सर्वच पात्रे काल्पनिक आहेतच असं नाही" असं स्पष्टपणे लिहिलंय आणि त्यांच्या वैशिष्ठपूर्ण शैलीने ते आपलं मन जिंकून जातात.
अश्या या उत्कृष्ट कादंबरीवर चित्रपट बनवताना या कादंबरीतील कथेची मोडतोड केलेली बघताना मात्र मन काहीसं खट्टू होऊन जातं कारण दिग्दर्शकाला या कादंबरीचा गाभा त्यातून सुहास शिरवळकरना वाचकांना द्यायचा असलेला संदेश हे सारं नीट समजलंय कि नाही यांवरच प्रश्नचिन्ह उपस्तिथ होतं. पण ते काहीही असो एक गोष्ट मात्र नक्की आहे की दुनियादारी हे पुस्तक खरोखरीच व्यसन आहे आणि हे थोडस महागडं व्यसन आहे ,यावर सुहास शिरवळकर म्हणतात की दुनियादारी हि आजवर सतत ढापलेली किंवा चोरली गेल्यामुळे तिच्या जास्ती आवृत्ती निघाल्या आहेत.. असो एकंदरीतच काय अशी ही दुनियादारी आपण एकदा तरी वाचायलाच हवी ...
खुप छान
ReplyDelete