Friday, 31 March 2017

अनुराग कश्यप भाग २

भाग २:-

       पांच तयार झाल्यानंतर तो रिलिज होण्यात अनंत अडचणी आल्या आणि शेवटी तो रिलिज होऊ शकला नाही.त्यानंतर त्याने "हुसैन झैदी" यांच्या पुस्तकावर आधारित असलेला "ब्लॅक फ्रायडे" चित्रपट बनवला पण या चित्रपटातील काही दृश्यांमुळे हा चित्रपटही रिलिज होऊ शकला नाही ,अखेर २००७ साली हा चित्रपट म्हणजे तब्बल ४ वर्षांनी हा चित्रपट रिलिज झाला पण त्या आधीच हा चित्रपट लीक झाल्याने चित्रपटगृहात हा चित्रपट सपशेल आपटला. त्यानंतर अनुरागने कॉलेज मधल्या राजकारणावर आधारित असणारा "गुलाल" हा चित्रपट बनवायला सुरु केला पण हा चित्रपट बनवताना सुद्धा अनंत अडचणी आल्या ,हा चित्रपट पूर्ण व्हायला जवळजवळ ७ वर्षे लागली,२००९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला पण अपेक्षित अश्या प्रकारचे यश हा चित्रपट मिळवू शकला नाही.त्या दरम्यान अनुराग कश्यप ने "नो स्मोकिंग" नावाचा चित्रपट काढला हा चित्रपट पण सपशेल आपटला,या सततच्या अपयशामुळे अनुराग काहीच खचल्यासारखा झाला आणि याच दरम्यान त्याचा घटस्फोट देखील झाला.पण अपयश हि यशाची पहिली पायरी असते असे म्हणतात आणि अनुराग च्या कारकिर्दीत यश त्याची वक्त बघत होत पण त्याला यशापर्यंत पोहोचायला बराच वेळ लागत होता.

        अनुराग च्या यशाची पावती मिळाली ती "देव-डी" या चित्रपटामुळे,या चित्रपटासाठी अनुराग ने एक हि रुपया मानधन घेतलं नव्हतं,त्यानंतर आलेल्या "दॅट गर्ल इन यलो बुट्स" या चित्रपटाने समीक्षकांची बरीच वाहवाह मिळवली. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर यश अर्थातच "गॅंग्स ऑ वासेपुर " त्याची वाट बघत होता,दोन भागात बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षक या दोन्हींची वाहवा लुटली.अनेक वर्षांपासून त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला "बॉम्बे वेल्वेट" पण त्याने न भूतो असा बनवला पण हा चित्रपट मात्र प्रेक्षक आणि समीक्षक यांच्या पसंतीस उतरला नाही.त्यानंतर त्याने अलीकडेच "रमन राघव २.०" या चित्रपटाची निर्मिती केली हा चित्रपट हि बऱ्यापैकी यशस्वी झाला.अनुराग कश्यप ने जितक्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नाही त्यापेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केली.मसान,अय्या,यांसारख्या तब्बल ३५ पेक्षा जास्त चित्रपटांची त्याने निर्मिती केली.अश्या या चित्रपट बनवण्यासाठी पैसे नाही तर पॅशन लागते हे सांगणाऱ्या अनुराग कश्यप बद्दल लिहिलं तितकं थोडं आहे.

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...