ऑनलाइन बिनलाईन
त्याच कसय ना जेव्हा आपण नवीन नवीन हे व्हाट्सअप्प वगरे इन्स्टॉल केलेलं असत आणि त्यातही आपली पहिल्यांदाच एका मुलीशी वगरे ओळख होते ,किंवा एका मुलीची मुलाशी ओळख होते,तेव्हा आपण बहुदा जेव्हढा वेळ आपल्याला शक्य आहे तेवढा वेळ ऑनलाइन राहून तिच्या किंवा त्याच्या मेसेज ची वाट बघत असतो आणि दरवेळी उगीचच त्याचा किंवा तिचा मेसेज विंडो उघडून मेसेज वगरे आलाय का ते चेक करत असतो ,मेसेज तर सोडा कधीकधी तीच किंवा त्याच साधं "लास्ट सीन" सुद्धा दिसत नसतं,तरी आपण विंडो चेक करायचं सोडत नाही अश्याच बऱ्याच काळानंतर आपल्याला तिथे ऑनलाइन असं दिसतं तेव्हा मात्र आपल्या आनंदाला काही पारावर राहत नाही पण हा पारावरचा आनंद फार काळ टिकत नाही हे हि खरं..
कारण अनेक वेळा ऑनलाइन असून सुद्धा आपल्याला मेसेज तर सोडाच साधा एखादा "स्माईली" सुद्धा येत नाही ,आणि अश्यातच आपण अलरेडी आधी पाठवून ठेवलेल्या मेसेज ला रिप्लाय न देता जेव्हा फक्त सीन दिसतो तेव्हा तर आपला पारावरचा आनंद केव्हा जमिनीत गाडला जातो हे कळतच नाही...
मग आपण पुन्हा बराचसा विचार करून "जेवण झालं का?" वगरे असे आपल्याला ज्याची उत्तर माहित असतात असे प्रश्न विचारतो ,आणि आपल्याला माहिती असल्याप्रमाणे तेच ठरलेले रिप्लाय येतात आणि एकदम च आपण पुन्हा काय बोलायचं या पेचात पडतो आणि पुन्हा विचार पुन्हा मेसेज पुन्हा रिप्लाय हे चक्र असच चालू राहत ,काहींच्या या चक्राच प्रेमात वगरे रूपांतर होत असे ऐकलय ,होत हि असेल,ती गोष्ट वेगळी आहे..
कित्येकदा तर एक वेगळीच गंमत होते ,ती जर संदीप खरे यांच्या शैलीत सांगायची झाली तर...
नसतेस ऑनलाइन तू जेव्हा
मोबाईल सुना सुना होतो
जेव्हा येशी तू ऑनलाइन
नेमका तेव्हाच मोबाईल
हँग हा होतो।
सो हे असं आहे एकंदरीत ऑनलाइन बिनलाईन च सगळं चक्र ,प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे या चक्राला समोर जातच असेल..
(कृ.ह.घ्या. आणि हा तुझा अनुभव का असं विचारू नये कारण खाली निरीक्षणातून असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे)
#असच_निरीक्षणातून
©मिहीर कुलकर्णी
असंच काहीसं झालेलं माझं सुरुवाती ला
ReplyDelete