भाग १:-
काही तरुण दिग्दर्शकांनी भारतीय चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्षे असलेल्या वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या लोकांची मक्तेदारी अक्षरश: मोडून काढून चित्रपटसृष्टीत स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलंय अश्यांपैकी एक महत्वाच नाव घ्यायचं झालंच तर ते अनुराग कश्यप या माणसाचं घेता येईल.या माणसाबद्दल लिहायचं झालंच तर एक अक्खा पुस्तक सुद्धा कमी पडेल. अनुभूती, अभिनव या भावंडांपैकी सर्वात मोठा असणाऱ्या अनुराग चा जन्म गोरखपूर मध्ये झाला. हंसराज कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना ,कॉलेज मध्ये होणाऱ्या पथनाट्यात वगरे सहभाग घेता घेता, वाचनवेड्या अनुराग ने हिंदी साहित्याच भरपूर वाचन केलं. पण अनुरागच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली असेल तर ती एका चित्रपट महोत्सवात त्याने 5-6 दिवसात जवळपास 55 चित्रपट पाहिले आणि त्यातल्या "बायसिकल थिव्ह्ज" या इटालियन चित्रपटामुळे प्रभावित होऊन अनुराग नी चित्रपटसृष्टीत पाउल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तडक मुंबई गाठली.
मुंबई मध्ये ना चित्रपटसृष्टी मध्ये कोण ओळखीचं होत ना मुंबई बद्दल फारस काही माहिती.अश्यातच मुंबई मध्ये आलेले स्त्रगलर लोकं ज्या ज्या ठिकाणी जातात अश्यापैकी एक ठिकाण असलेल्या "पृथ्वी थिएटर" कडे त्याने कूच केली ,पण गेल्या काही वर्षात पृथ्वी कडे येणाऱ्या स्त्रगलर्स चा वाढता रोख बघता पृथ्वी थिएटर नी कामाशिवाय लोकांना आत सोडायला किंवा थांबायला मनाई केली.अश्यातच कामाच्या शोधात आलेल्या अनुरागच्या पदरी निराशा झाली ,पण त्याच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून त्याने पृथ्वी थिएटर च्या कॅफे मध्ये काही काळ वेटर म्हणून सुद्धा काम केलं,तिथे येणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी ओळख करून घेतली आणि अश्यातच त्याची भेट मकरंद देशपांडे या माणसाशी झाली आणि त्याच्याकडून अनुराग ला बरच शिकायला मिळालं.अनुराग ची त्यावेळीची अजून एक खासियत सांगायची झाली तर तो खूप भराभर लिहू शकता होता तो दिवसाला 70-80 पान आरामात लिहू शकत होता ,त्यामुळे त्याला एक दोन मालिका लिहायची कामं मिळू लागली,पण अनुराग ला चित्रपटांमध्ये काहीतरी करण्यात रस होता ,अश्यातच त्याची भेट झाली तो "राम गोपाल वर्मा" या माणसाशी आणि तिथून खऱ्या अर्थाने अनुरागच्या फिल्म च्या प्रवासाला सुरुवात झाली ,या चित्रपटलेखनासाठी अनुरागने कमी मानधन मिळत असूनही महेश भट्ट यांच्या मालिका लेखनाची ऑफर धुडकावून लावली.मालिका लेखनाचे त्याला दर महा २.५ लाख मिळणार होते आणि सत्या साठी एक लाख तरीही त्याने सत्याची निवड केली कारण जे करण्यासाठी तो आला होता,त्याला कुठेतरी ते मिळायला लागलं होतं.सत्या त्याकाळी भरपूर हिट झाला.त्यानंतर अनुराग ला स्वतःची फिल्म बनवायची होती पण त्या आधी त्याने "लास्ट ट्रेन टू महाकाली" नावाची एक सिरीज बनवली.ही सिरीज शूट करायला अनुराग कडे इतके पैसे नव्हते की तो डिजिटल कॅमेरा शूटिंग साठी वापरू शकेल, त्यावेळी त्याला कळलं की त्यावेळी डिजिटल कॅमेरा फक्त "Mtv" कडे होता त्याने ,शक्कल लढवून त्या कॅमेरा च्या डिपार्टमेंट मधल्या एका माणसाला त्या मालिकेत भूमिका करायची संधी दिली.तो माणूस रात्री ऑफिस बंद झालं की कॅमेरा तिथून चोरून आणायचा आणि रात्री शूटिंग करून शूटिंग संपलं की परत पहाटे तो जागच्या जागी नेऊन ठेवत.अश्यातच अनुराग ने साधा कॅमेरा वापरून "पांच" नावाचा चित्रपट बनवला पण दुर्दैवाने चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. "जोशी-अभ्यंकर" खून खटल्यावर आधारित हा चित्रपट होता.
उर्वरित माहिती पुढील भागात
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment