ज्या सरांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी ११ वि ते बीकॉम अकाउंटन्सी विषयात प्राविण्य मिळवलं ,त्या गणेश जोशी सरांना सेन्डऑफ निमित्त मी लिहिलेले पत्र..
..............................................
प्रिय सर,
गेली ५ वर्ष ,जवळपास आपण रोजच भेटतोय,पण अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या सांगायच्या राहून गेल्या , म्हणून हे पत्र. खरंतर ही पाच वर्षे कशी निघून गेली ते कळलंच नाही,अगदी काल परवाच ११ वीला ऍडमिशन घेतल्यासारखं वाटत.एक तो दिवस आणि हा आजचा शुभेच्छा समारंभाचा दिवस.
कॉमर्स मधला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे अकाउंट्स आणि अश्या या कॉमर्स मधल्या आणि दैनंदिन जीवनात उपयोगी असणाऱ्या अकाउंट्स विषयाची गोडी जर कुणामुळे लागली असेल,तर सर ती तुमच्यामुळेच. केवळ पुस्तकापूरत न ठेवता अकाउंट्स विषयाचा दैनंदिन जीवनामध्ये असणारा उपयोग आणि त्याची माहिती तुम्ही वेळोवेळी दिली.त्या माहितीचा बाहेरच्या जगात वावरत असताना,मोठ्या प्रमाणात उपयोग होतो हे आमच्यातल्या बऱ्याच जणांनी ते अनुभवलं देखील आहे.
तुम्ही दिलेल्या सुचनांकडे ,दिलेल्या होमवर्क कडे आम्ही बरेचदा आम्ही दुर्लक्षच केलं असेलही ,पण पेपर सोडवताना आलेल्या अडचणींमुळे आम्हाला तुमच्या सुचनांचं महत्व पटलं मग त्यानुसार वेळोवेळी आमच्यात सुधारणा केल्या.वेळोवेळी तुम्ही आम्हाला जस आम्ही चुकल्यावर ओरडलात तसं तुम्ही अनेकदा आम्हाला संभाळूनही घेतलेत.सर तुमचं सामाजिक भान सुद्धा आम्ही वेळोवेळी अनुभवलं आहे मग ते दुष्काळग्रस्तांना मदत करताना असो किंवा अजून कोणाला मदत करताना,याच सामाजिक भानाचा आमच्यापुढेही आदर्श राहीलच आणि भविष्यात आम्ही देखील समाजासाठी काही न काही करण्याचा प्रयत्न नक्कीच करू याची ग्वाही मात्र द्यायला काहीच हरकत नाही.
या अशा अनेक चांगल्या आठवणींना अकाउंटच्याच भाषेत सांगायचे झालंच तर सगळ्या चांगल्या गोष्टी "डेबिट" करून आम्ही त्या आमच्या स्मरणात ठेवल्या आहेत.चांगल्या आठवणीसुद्धा इतक्या आहेत की या पत्रात त्या मांडायच्या म्हणल्या तरी ते शक्य होणार नाही.अशा या स्मरणातल्या गोष्टींचा आम्हाला भविष्यात निश्चितच उपयोग होईल याची आम्हाला खात्री आहे.
कालच्या कार्यक्रमात अनेक जणांनी भावना व्यक्त केल्या,त्यातल्या प्रत्येकालाच भरभरून बोलायचं होत, काहींना ते शब्दात मांडता आलं काहींना नाही ,पण प्रत्येकाला ती गोष्ट खूप मनापासून बोलायची होती आणि खूप जणांनी ती बोलली देखील.खरतर कालच मनोगत असो किंवा हे पत्र यातल्या शब्दांना जितकं महत्व नाही तितकं हे लिहिण्यामागच्या भावनांना आहे,आणि भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळेला शब्दांची गरज असतेच असे नाही,तरी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ती मांडायचा प्रयत्न करतो , भावना तर तश्या सगळ्यांच्याच आहेत पण प्रामुख्याने सुयोग पत्की,ओंकार पोंक्षे,मी आणि हरीश सोलापूरे यांच्या वतीने मी त्या शब्दात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतोय.
तुमचेच विद्यार्थी
भावना :- ओंकार पोंक्षे,सुयोग पत्की,हरीश सोलापुरे,मिहीर कुलकर्णी
लेखन :- मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment