Saturday, 25 March 2017

पार्टनर-व.पुं ना पत्र

आज २५ मार्च म्हणजे व.पु काळेंची जयंती ,या त्यांच्या जन्मदिनाच औचित्य साधून आपल्या लाडक्या "पार्टनर" ना म्हणजेच व.पुं ना मी लिहिलेलं पत्र.
................................................
प्रिय व.पु

        खरंतर तुम्हाला व.पु असं संबोधायच माझं वय ही नाही आणि मी तितका श्रेष्ठ ही नाही.माझं वर्णन तुमच्या भाषेत करायचं झाल्यास "मी एक सामान्य माणूस आहे, सुख भेटण्याअगोदर ज्या माणसाला कायम तडजोड भेटत आली असा ठिगळं जोडणारा मी एक". आजच्याच दिवशी म्हणजे साधारणपणे १९३२ साली तुमचा जन्म झाला आणि साहित्य क्षेत्राला ज्याचा उल्लेख केल्याशिवाय मराठी साहित्य अपूर्ण च असेल असा एक लेखक मिळाला. असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी तुमची एखादी कथा किंवा विचार वाचला किंवा ऐकला जात नसेल. तुमच्या साहित्याचं गारुड वाचकांच्या मनावर इतकं आहे की त्याच शब्दात वर्णन करणं म्हणजे निव्वळ अश्यक्यच आहे. तुमची साहित्य संपदा इतकी आहे की प्रत्येकविषयी बोलायचं म्हणलं तरी त्यावर एक पुस्तक लिहून होईल. आज प्रामुख्याने मी पार्टनर या पुस्तकाचा उल्लेख करतोय.

        पार्टनर ही एक प्रेम कथा असली तरी ती व.पु तुम्ही लिहिलीय हे त्याच वैशिष्ट्य असल्यामुळे ती आम्हाला कदाचित जवळची वाटते.कथेचा नायक हा खरतर अत्यंत सामान्य माणूस आहे याच वर्णन तुम्ही " सुख भेटण्याअगोदर ज्या माणसाला कायम तडजोड भेटत आली असा ठिगळं जोडणारा" असं केलंय म्हणूनच कि काय आम्हाला तो आमचाच एक प्रतिनिधी वाटतो.कधीकधी प्रेमकथा या फारच गुलाबी पद्धतीने सांगितल्या अथवा लिहिल्या जातात पण त्या कथांचा उद्देश हा फक्त एकमेकांना प्रेमात जिंकणे हाच असतो पण खऱ्या आयुष्यात फक्त जिंकून भागत नसतं,प्रेमाव्यतिरिक्त पण अनंत अडचणी असतात. नेमक्या याच अडचणी आणि या अडचणी काढ्या सोडवायच्या यावर उपाय सांगणारा आणि बिनधास्त पणे वागणारा "पार्टनर" आम्हाला या कथेत भेटतो. खरतर आपल्याला आयुष्यात अनेकदा तिसऱ्या माणसाची गरज भासते पण हाच तिसरा माणूस जेव्हा आपल्याला हवा असताना जात नाही किंवा हवा असताना येत नाही तेव्हा नरक वाटतो हे विधानही मनाला अत्यंत स्पर्शून जातं.

        एखादी मुलगी आवडणं आणि तिला प्रेमाने जिंकून घेणं ,प्रसंगी त्यासाठी घरच्यांची मनधरणी करणं असो किंवा अजून काही,हि कथा एवढ्यावरच थांबत नाही तर इथेच हि कथा सुरु होते असं म्हणायला हरकत नाही.संसार करताना येणारे असंख्य अडथळे असोत मग त्यावर पार्टनरच्या रुपी व.पु तुम्ही सांगितलेले उपाय असोत किंवा "प्रेम" आणि "अफेअर" यामधला सांगितलेला "प्रेम हा प्रकार निष्क्रीय बनवणारा. माणूस तासचे तास त्याच्या आठवणींच्या उजळणीत घालवतो. अफेअर हा प्रकार तसा नाही" हा फरक असो सगळं कसं आपल्याच आयुष्यात या सगळ्या गोष्टी घडतायेत असं भासवत राहतं आणि हेच कुठेतरी तुमच्या लेखनाच श्रेय असं म्हणता येईल.

       आज जरी तुम्ही आमच्यात नसलात तरी तुमचं अस्तित्व हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आमच्यात सदैव आहेच कारण ज्याप्रमाणे बारशाला नाव ठेवतात ते देहाचं त्याप्रमाणे मृत्यू दिवशीही अस्तित्व संपतं ते हि देहाचंच.

      "As You Write
      More and More
      Personal
      It Becomes
      More and More
      UNIVERSAL"

म्हणून हे पत्र .

©मिहीर कुलकर्णी

4 comments:

  1. खूप मस्त उत्कृष्ट लिखाण आणि विचार
    खूप खूप शुभेच्छा 😍😍😍✌️✌️

    ReplyDelete

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...