सूर्य कमालीचा डोक्यावर आल्यावर होणाऱ्या अंगाच्या लाही लाही ला क्षमवण्याचा एकच उपाय लहानपणी ठाऊक होता तो म्हणजे अंगावर असणाऱ्या तोडक्यामोडक्या कपड्यानिशी शरीरातली सारी ऊर्जा एकवटून पळत पळत जाऊन नदीत जोरदार डुबकी मारणे. त्यानी एका क्षणार्धात लाही लाही दूर होई आणि वर पाण्यात मनसोक्त खेळण्याचा आनंद तो काही वेगळाच .. पुढे जसजसे मोठे होत गेलो तस तस हे सगळं नकोस वाटायला लागलं कदाचित "शिंगं फुटण्यामुळे" असेल..आजही कधी नदीवर गेलो तर त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात आजही सगळी परिस्थिती तशीच आहे अगदी ते पात्र तप कठडा आणि सगळं सगळं फक्त तो निरागस आनंद उपभोगायच समाजमान्य "वय" हि गोष्ट मात्र नाहीये....
#असच_लिहिण्यातून
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment