"मुरांबा" खरंतर जेव्हा पोस्टर प्रदर्शित झालं, तेव्हा अस वाटलेलं की इतर लव्ह स्टोरीज प्रमाणे ही देखील एक लव्ह स्टोरी असेल,पण जसा जसा टिझर,ट्रेलर आले तसे तसे या सिनेमा मध्ये काहीतरी वेगळं आहे हे जाणवू लागलं.
दिग्दर्शक वरूण नार्वेकर चा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा असला तरी सिनेमा बघताना ही गोष्ट तसूभरही जाणवत नाही. चित्रपटात ४ जण मुख्य भूमिकेत असल्यामुळे कधी कधी पात्रांना मिळणार स्कोप वगरे यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात ,पण या चित्रपटात ४ ही कलाकारांचं काम चोख झालंय. अमेय वाघ ,सचिन खेडेकर त्यांची छाप सोडतात,आणि आपल्या लक्षात राहतात. चिन्मयी सुमित यांनी साकारलेली आई सुद्धा अत्यंत जवळची वाटते. कोणताही चित्रपट लोकांना आवडायला महत्वाचा घटक असतो तो म्हणजे त्या गोष्टीचा "Emotional Connect" आणि नेमकी हीच गोष्ट मुरांबा मध्ये वरून नार्वेकर ला परफेक्ट जमलीय. हा चित्रपट बघत असताना किमान एखाद्यातरी गोष्टीशी आपण रिलेट झाल्याशिवाय राहत नाही. यामुळे वरून नार्वेकर नी चित्रपट लिहिताना केलेला समर्पक विचार दिसून येतो.
या चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे या सिनेमाचं,संगीत आणि पार्श्वसंगीत. सिनेमाची गाणी अत्यंत उत्कृष्ट झालेली आहेत.सिनेमामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक चा केलेला योग्य वापर चित्रपटातील दृश्यांना चार चांद लावतो यात शंका नाही..मिलिंद जोग यांचा कॅमेरा आपल्याला मुरांबा अतिशय नेत्रसुखद पद्धतीने सारी सफर घडवून आणतो.एकंदरीत काय हा मुरांबा चांगलाच मुरलाय,त्यामुळे आपण एकदा का होईना तो चाखून बघितलाच पाहिजे,पण या मुरंब्याची चटक अशी आहे की एकदा खाल्लं तरी आपलं समाधान होणं अवघड आहे..
©मिहीर कुलकर्णी

Yes... Must watch movie...
ReplyDeleteBackground muzic kharach bhari aahe
ReplyDeleteBackground muzic kharach bhari aahe
ReplyDelete