एका चौकात उभा असताना
समोर दिसणारे विखुरलेले
अरुंद असे रस्ते
कुठे जात असतील हे रस्ते
हा सतत पडणारा प्रश्न
कुठेतरी जातच असतील
हे या प्रश्नाच माझं मला
मी दिलेलं उत्तर
कोणाच्या तरी घरी
कोणाच्या तरी स्वप्नात का होईना
नक्की जात असतील हे रस्ते
किंवा कोणाचं तरी
स्वप्न देखील पूर्ण करत
असतील हे रस्ते
तर मन आणि हे रस्ते
या दोघांत खूप साम्य आहे
दोघेही विखुरलेले आहेत
दोघेही कुठे कुठे ना कुठे जात असतात
समजत नाही मन या रस्त्यांसारखं झालंय
की रस्ते मनासारखे
-- मिहीर
समोर दिसणारे विखुरलेले
अरुंद असे रस्ते
कुठे जात असतील हे रस्ते
हा सतत पडणारा प्रश्न
कुठेतरी जातच असतील
हे या प्रश्नाच माझं मला
मी दिलेलं उत्तर
कोणाच्या तरी घरी
कोणाच्या तरी स्वप्नात का होईना
नक्की जात असतील हे रस्ते
किंवा कोणाचं तरी
स्वप्न देखील पूर्ण करत
असतील हे रस्ते
तर मन आणि हे रस्ते
या दोघांत खूप साम्य आहे
दोघेही विखुरलेले आहेत
दोघेही कुठे कुठे ना कुठे जात असतात
समजत नाही मन या रस्त्यांसारखं झालंय
की रस्ते मनासारखे
-- मिहीर

No comments:
Post a Comment